शेवटची ट्रेन शेवटची ट्रेन होती वाटतं, मनगटावरचं घड्याळ स्पष्ट दिसत नव्हतं, अगदी प्लेटफार्म वरचं मोठं घड्याळ ही! मी ट्रेन मधून बाहेर पाहिले… काहीच हाल-चाल नाही, माझ्या समोर एक प्रचंड वयस्कर माणूस बसलेला, जाड भिंगाचा चश्मा, पांढरी दाढी, डोक्यावर लोकरीची टोपी, काळं हाफ-ज्याकेट...मळलेला लेंगा, एका पायात स्लीपर, दुसऱ्या पायात चप्पल, तेवढ्यात ट्रेन सुटली... ट्रेननी जसा वेग पकडला तसा एक माणूस ट्रेनमध्ये चढला, अगदी माझ्यासमोर बसलेला म्हातारा आणि तो जसे जुळे भाउच... इतके साम्य!!! तो दरवाज्यापाशीच उभा होता, मी माझा चष्मा लावला... त्याच्या पायाकडे नीट पाहिले, त्याच्या पायातही एक स्लीपर आणि दुसऱ्या पायात चप्पल! मला काही कळेना.. इतके साम्य कसे!? तेवढ्यात पुढचं स्टेशन आले, माहिम... ह्यावेळी माझ्या समोरचा माणूस उठून त्या मागच्या माणसाच्या बाजूला जाऊन उभा राहिला, त्याला कदाचित बांद्र्याला उतरायचे असेल, माझ्या डोक्यात मात्र एकच विचार... २माणसं इतकी कशी सारखी असू शकतात? बान्द्रा आलं, त्या दोघांपैकी एक उतरला.. आता ...