आबा... सुपेकर आबा
Supekar Aba - All parts (Including the last one The 5th) आबा, सुपेकर आबा (भाग-१) त्यांना 'आबा' म्हणालो कारण त्यांना पाहिले पहिल्यांदा तेव्हा अन्वया (माझी माझी साडे तीन वर्षाची मुलगी) होती कडेवर, मला म्हणाले अरे तुझ्याबद्दल खूप ऐकले आई कडून, आज भेट झाली… आनंद झाला :) ३ महिन्यापुर्वीच आलेत आमच्या '११२ श्रीयोग' मध्ये भाडेकरू म्हणून, घरी मुलगा, मुलगी आणि बायको, मुळचे परभणीचे! त्यामुळे भाषेला मस्त तिखट फोडणी, मजाच त्यांच्याची गप्पा मारायच्या म्हणजे! जुनी गाणी, हिंदुस्तानी क्लासिकल, अध्यात्म… आणि त्यांच्या तरुणपणाच्या आठवणी… बास! मस्त खरपूस खमंग थालीपीठच जणू हातात आणि साथीला त्यांच्या हावभावांची सोलकढी! त्यांचं बोलून पोट भरायचं नाही आणि माझं ऐकून! मोजून एकवीस दिवस असेन, त्यात मधले २-३ दिवस सोडले तर रोज सकाळी / दुपारी / संध्याकाळी भेट व्हायचीच. ह्या २१ दिवसांत माझा सकाळचा ठरलेला पोग्राम होता ह्यावेळी घरी, आई आणि मी चालायला जायचो आल्यावर मस्त चहा पोहे झाले की हातात लांब हिरवा पाइप घेऊन झाडांना पाणी घालणे, वरच्या मजल्यावरून आबा हाक माराणे, चहा झाला का? विचारणे वगैरे… मग मी ...