Posts

Showing posts from April, 2018

The Americans, TV Series Review

Image
The Americans ह्या अमेरिकन टेलिव्हिजन सिरीजचा पहिला एपिसोड 2013 मध्ये FX चॅनेलवर आला. १०पैकी ८.३ रेटिंग मिळवणाऱ्या या सिरीजचे प्रत्येकी १३ भागांचे पाच सीझन झालेले आहेत. आता शेवटचा, सहावा सीझन मागच्याच महिन्यात सुरु झालेला आहे, गेल्या ५वर्षात ह्या मालिकेची लोकप्रियता वाढत गेली आणि आता ती शीगेला जाऊन पोचली आहे. विश्वासावरचा अविश्वास आणि अविश्वासावरती विश्वास किव्वा जो आहे तो कशावरून तोच, जो तुम्हाला वाटत आहे? असं काही तरी अजब कोडं घेऊन ह्या मालिकेची सुरुवात होते. एका रशियन गुप्तहेराला पकडून त्याला 'किडनॅप' करायचे काम आटोपल्यावर कळते की त्याला पकडणारे स्वतः २ रशियन्स गुप्तहेर आहेत, नुसते रशियन्स नाहीत ते एक जोडपं आहे, १९६० मध्येच रशियन्स ने अश्या जोडप्यांना 'तयार' करायला सुरुवात केलेली, त्यापैकीच एक गुप्तहेर जोडपं म्हणजे 'फिलीप' आणि 'एलिझाबेथ', कथानकाचे २ प्रमुख नायक, त्यांची दोन मूलं आणि त्यांच्या शेजारीच राहणारा FBI एजेंट त्याचे कुटुंब ह्यांच्या आजूबाजूला ही सर्व मालिका रंगवण्यात आलेली आहे. फिलिपची ट्रॅव्हल अजेंसी आणि एलिझाबेथ 'हाऊस ...

आनंद गानू.

Image
जगातली सर्वात आवडती व्यक्ती कोण, असा कोणी प्रश्न विचारला तर नक्कीच डोळ्यासमोर काही चेहरे येतात, पहिला चेहरा असतो, नेहमी पहिला तो म्हणजे आनंद काका आनंद गानू.   कपाळावर गंध, कानात वाळा जंन्नत-ए-फिरदौस किंवा अशाच कुठल्यातरी अत्तराचा कापूस, कोपर्याच्या आणि मनगटाच्या मध्ये फोल्ड केलेला फुल शर्ट, पॅन्ट, हातात अंगठ्या, कोल्हापुरी किव्वा बाटा चप्पल असा साधा आमचा आनंद काका, आणि सतत हसतमुख 😊 म्हणजे आनंद काका ला कोणी पाहिलं तर तुमचा मूड कसा ही असो, तुमच्या चेहऱ्यावर नकळतच एक आनंद छटा उमलणारच, बर मी ही अतिशयोक्ती करत नाहीये, आनंद काका माहीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून मी लिहिलेल्या वर्णनाला १०१% पाठिंबा मिळणार हे नक्की! 👌 तर, असा हा बाबांचा मित्र पण, त्यांचं बालपण एकत्रच गेलं... ब्राम्हण वाडीत काका राहायचे जवळच्याच एका इमारतीत माझे वडील, अरुण-आनंद अशी जोडी. बाबांबद्दल खूप नवीन नवीन काय काय सांगायचा काका, हो.. माझ्या साठी नवीनच ना, तुझे बाबा गाड्या काय छान काढायचे, सरळ रेश तर पट्टीविना वगैरे, बाबा असे तसे, आणि मी पण हे सर्व ऐकून आपण किती नशीबवान आहोत, असे बाबा आणि काका...

सही कशाला हवी, सही माणसं हवीत!

Image
बोरीवलीत असतानाची गोष्ट, गोखले विद्यालयात होतो, ३/४ थीत असेन, शाळेत आम्हाला एक फॉर्म दिला, हेल्पेज इंडिया संबंधित, घरोघरी जायचं आणि पैसे गोळा करायचे, सगळ्यांनाच एक एक कागद दिलेला, नाव / पत्ता / सही आणि पुढे रक्कम वगैरे तक्ता असलेला कागद. मला तर खरं हे करायला आवडायचं नाही, पण प्रत्येकाला करणं भाग होतं, मी ओळखीच्या लोकांना आधी भेटायचो, मग घरी आलेल्या पाहुण्यांना, मग सोसायटीची अनोळखी दारं असं आठवडा भर तरी चाललं असेल, तो फॉर्म कधी एकदा पूर्ण भरतोय असं झालेलं. शेवटी आजूबाजूच्या बिल्डिंग मध्ये पण गेलो, एका अनोळखी दरवाज्याची बेल वाजवली, एका आजोबांनी उघडला दरवाजा, मी त्यांना फॉर्म दाखवला, त्यांनी चष्मा नीट अड्जस्ट करून फॉर्म पाहिला, आणि हसत हसत ५ रुपयांची नोट दिली, मी त्यांना त्यांचं नाव वगैरे लिहायला सांगितलं, त्यांनी हातानेच नको नको केलं, म्हणाले तू तुझ्या नावाने देशील का? (किव्वा असच काही तरी बोलले, मला नक्की आठवत नाहीत त्यांचे शब्द) त्यांचा हात थरथरत होता, वयामुळे असेल... असो, मी काही बोललो नाही, फॉर्म वर त्यांचं नाव लिहिलं... त्यांची सही नाही मिळाली! तो दिवस आहे आणि आजचा, म...