Father's day
Father's day होता म्हणे काल, काय आहे ना... माझ्यासाठी जवळपास रोजचं आहे हे, आजूबाजूला इतक्या वस्तू आहेत, मनात आठवणी इतक्या आहेत... त्यात तो गाड्यांचा / छायाचित्र काढायचा छंद! अगदी पदोपदी आहेत बाबा माझ्याबरोबर... कळत नकळत अखंड बाबांच्या आजूबाजूलाच असतो मी, काल नेमका हा जागतिक दिवस असताना बाबांबद्दल काही लिहिलं नाही ह्याची रुखरुख नको म्हणून लिहितोय आता. जे आहे ते आहे.. विसरलो! त्यात मॅच होती... हो हो मॅच च्या पण आठवणी आहेत. काय लिहू काय नको असं झालय आता. असो... बाबा सगळ्यांनाच असतात, कोणी जवळ असतात कोणी लांब असतात, शेवटी बाबा ते बाबाच... आपण लहान असतानाचे बाबा आणि मोठेपणातल्या बाबांचा आपला प्रवास कसा घडतो ह्याबद्दल विचार केला की प्ले बटण आणि पुढे सरकणारी कैसेट आठवते... ती A साईड आणि मग B साईड! काय तुम्ही समजायचात त्यांना आणि काय त्यांचा मनात असेल, हे सगळं आता बाप झाल्यावर कळतं, कैसेट संपल्यावर! 😢 आणि ती कैसेट परत ऐकायची असेल तर इजेक्ट नावचं बटण देवाने काढून घेतलेलं असतं, आली का पंचाईत! 😤मग काय करा रिवाईंड... ऐका ती साईड B! द रिअल साईड ऑफ लाईफ. रट्टा मारून डोळ्यातून पाणी काढणारे...