Posts

Showing posts from January, 2017

पान!

Image
पान म्हणालं की कलकत्ता सादा आठवतं, मग मसाला मग मगई... त्यापलीकडे कधी मजल गेली नाही! पण ह्या पाना आधी एक महत्वाचं पान म्हणजे आपलं... केळीचं पान! आठवतं का केळीचं पान, आता त्यावर जेवण मिळवणे म्हणजे जरा "नशीब वान आहेस लेका!" वगैरे म्हणावं लागतं! पारंपरिक गोष्टींचा रितिरिवाजांचा जसा ऱ्हास होत चाललाय, तसाच ह्या पानांवर जेवण केरण्याचा ही, बरोबर आहे म्हणा! आता जागा नसते ना, जिथे जागा असते तिथे भलत्याच गोष्टींनी जागा घेतलेली आहे आज काल! असो... केळीच्या पानावरचे जेवण लहानपणी खूप अनुभवले, त्यावर तरंगणारे पाणी, अगदी बरोब्बर मध्ये असलेल्या लांब देठाचा मोठेपणा! मोठेपणा म्हणजे... त्यामुळेच तर ते पान टिकतं ना, मस्त सांभाळून घेते २ही बाजू, जणू काही पुस्तकाची बांधणीच. खाद्यपरार्थ स्वरूपात मांडलेल्या त्या हिरव्या गडद पाना वरची ज्ञानाची भूक काही औरच! त्या पानावर जेवण असले की त्या गर्द हिरव्या रंगावर जो काही पदार्थ उठून दिसतो, त्याला तोडच नाही... पांढरा शुभ्र भात त्यावरचं नाजूक पिवळं वरण आणि त्याहून नाजूक साजूक तूप! मस्तच कॉन्ट्रास्ट, आजूबाजूला कोशिंबीर, आळूच्या वड्या, चटण्या, बटाटा भ