Posts

ते तीन बांबू

Image
काय मस्त होते ते लांब लचक भुंग्यांनी प्रेम केलेले उन्हात वाळलेले रात्री पहारा देणारे आमच्या अक्षीच्या फाटकाची भूमिका बजावणारे त्यावर बसून कित्येक आंबे खाल्लेत माझी मूर्ती होती इतकी लहान सहज दोघांच्या मधून जायचो पलीकडे रास्ता काळा कधी वितळलेला कधी ओला सदैव माझी वाट पाहणारा तेव्हाच्या अनवाणी आठवणी  अजून ही आहेत ओल्या आहे एक फोटो अजून ही बाबांनी काढलेला बघतो अधून मधून  चाळता अल्बम दिसतो मी मला आठवणींतला असतील कुठे आता ते ते तीन बांबू! #सशुश्रीके १२ जून २०२२

आजी आजोबा आणि मी...

काय पुण्य केलं आहे मी मागच्या जन्मी काय माहीत... दोन्ही बाजूंच्या आजी आजोबांचं प्रेम मिळालं, खूप छळलो त्यांना आणि त्यांनी तितकेच लाड करून परतफेड केली 😊 'आण्णा' बाबांचे वडील, आण्णा म्हणायचे सगळे त्यांना, एक दिवस खूप ठसका खोकला आला, पुढचं आठवत आहे मी थेट माझ्या शेजाऱ्यांकडे होतो, परत घरी आलेलो तेव्हा अण्णांच्या नाकात कापूस आणि ओठांवर तुळशीचे पान होते, आणि मला त्यांना प्रदक्षिणा घालायला लावलेली. त्या दिवसाआधी यांबरोबर रोज मंदिरात जायचो, त्यांच्या मित्रांबरोबर खेळायचो, त्यांच्या मांडीवर जणू सिंहासनावर बसल्या सारखं वाटायचं, पेपर रेडिओ टीव्ही पाहात असताना माझा व्यत्यय नेहमीचा होता त्यांना, पण हसतमुख चेहरा, हे सगळं मला आठवत आहे, मी बालवाडीत वगैरे असून आठवत आहे म्हणजे खरच कमाल आहे! तरी कधीतरी हावरट पणा म्हणून काही किस्से आठवतात का हा प्रयत्न चालू असतो. पण शेवटी माणूसच आहे, असं इतकं कसं आठवेल!  आठवलं की लगेच लिहायचं... पुन्हा आठवेल का? का नाही...ह्या भीतीने का होईना! जास्त किस्से आठवतात ते आईच्या वडिलांचे,  'आप्पा' आप्पा म्हणायचो सगळे त्यांना... भयंकर कडक स्वभाव. उठ म्हंटलं की

एक मोठा शेवटचा दिवस!

एक मोठा दिवस शेवटचा दिवस! दुसऱ्या दिवशी दुबईला जायची गडबड उरलेली २ महत्वाची कामे ... होतो कोथरूडला आणि २ पर्याय होते. एक काम होतं पौड रोड वर आणि एक पेठेत! पेठेत ६ नंतर म्हणजे महाभयंकर ट्रॅफिक, त्यात तिळक रोड वर जायचं होतं, काम होतं मित्रासाठी तबला हातोडी विकत घेणे आणि दुसरं काम होतं मिलिंद देशपांडे नावाच्या कॉलेज वर्गमित्राला भेटून त्याकडून त्याने केलेले संस्कृत भाषेतले खेळायचे पत्ते घेणे, (संस्कृत भाषेत पत्ते म्हणजे एक वेगळेपण आहेच पण त्याने केलेले त्यावरचे काम पण खास! लिंक शेर करीन कामाची त्याची लेखाच्या शेवटी) तर ह्या २ कामांपैकी १च काम होणे शक्य होते, मी सजीव माणसाचा विचार केला .. निर्जीव हातोडी घेण्यापेक्षा सजीव माणसाला भेटून त्याला/त्याच्या कलेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला.  त्याने पाठवलेला मॅप चालू केला, १-२ दा डियो (दू-चाकी वाहन) थांबून मॅप पाहिलाही... एके ठिकाणी शेवटचे मुख्य वळण आले आहे का हे पाहायला डावा हात खिशात घातला, मोबाईल हातात घेतला, वळण अगदी समोरच पण सिग्नल पण, त्यात समोरची तीन चाकी मालवाहतूक रिक्षा थांबली! मी ही त्याच प्रयत्नात, पण मेट्रोचे काम चालू असलेल्या त्य

अनोळखी ओळख

खुप वर्षे झाली आज लिहीन नंतर लिहीन असं म्हणता म्हणता आज योग आला लिहायचा हे... अनोळखी ओळख बोरिवलीच्या 'श्री गणेश' बिल्डिंग मधला तळ मजला, बंद घर... काचा फुटलेल्या, त्या घरा समोर खेळायचो आम्ही मुलं, चेंडू जायचा आत एका घरात, कित्येकदा तो गेलेला चेंडू मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न, ते प्रयत्न करत करत आत डोकावायचो... पूर्वी दरवाज्याच्या वर एक आडवी खिडकी असायची त्यातून की कुठून तरी आठवत नाही पण आत शिरलेलो, प्रचंड धूळ जळमटे वगैरेंनी श्रीमंत झालेलं ते घर!  मालक आर्किटेक्ट किंवा तसल्याच काही क्षेत्रात असावा. सुबक टुंबदार (फोम बोर्ड / थर्माकोलचे) बंगले आठवतात! आजूबाजूला छान छोटी छोटी झाडे, पार्किंग मध्ये गाडी...  आणि चेंडू हातात... बाहेर मित्र वाट बघतायत न मी त्या छोट्या बंगल्यांकडे बघत बसायचो. कोणालाही सांगितलं नाही की मी काय पाहायचो आत, आत चेंडू जायची वाट बघायचो! गेला की मी जाणार आत हे ठरलेलं. नंतर कळलं की मालक अमेरिकेत वगैरे असतो, फ्लॅट आहे पडूनच. नंतर आम्ही मुंबई सोडलं, आता ह्या गोष्टीला २९/३० वर्ष होतील. ते घर आहे तसेच राहीलं आहे मनात, ती धूळ बंगल्यावरची... काय कडक फिनिश! तो जो काय माण

वाट बघा

वाट बघा... सकाळी अलार्मची अलार्म नंतर पाण्याची मग सुरूच दूध वाल्याची पेपर वल्याची नाश्त्याची चहा/कॉफीची गरम पाण्याची गरम इस्त्रीची रिक्षाची बसची ट्रेनची त्या मिळाल्या की नीट उभं / बसायला मिळायची स्टेशनसच्या स्टेशनची लिफ्टची लंच टाईमची वरकिंग अवर्स संपण्याची परत उलटा प्रवास.. अशी वाट बघत बघत ५/६दिवस संपायचे मग लगेच वाट... वीकेंडची! आज नो वाट जस्ट थाट! जस्ट रिलॅक्स... सगळं कसं आरामात असा तो १ दिवस कोणाचे तर २! त्या १/२ दिवसासाठी अख्खा आठवडा बघायला लागायची वाट अशोक मामाने तसेही म्हंटलच आहे बनवाबनवीत म्हणजे काय... वाट बघा! अश्या वेगवेगळ्या वाटा येत जात असतात! त्याशिवाय काय आहे म्हणा! वाट बघण्याशिवाय हातात काय असतं म्हणा? बघतो आता वाट कंमेटची न लाईक्स ची 😂 दुसरं काय हातात आसतं म्हणा! हा एक फोन सोडलं तर तुमच्या हातात ही काहीच नाहीये! 😆 #सशुश्रीके २०२०/०२/१०

राम आणि श्याम दोन साबण असतात...

 राम आणि श्याम दोन साबण असतात माझ्या न्हाणीघरात, एक आवडता एक नावडता, दोन्ही असतातच, एक संपायला लागला की त्याच्या पाठीवर दुसरा अगदी *विक्रम वेताळ* टाईप्स... हे लिहायचं विशेष कारण म्हणजे आज हे दोघे संपले! पहिल्यांदाच वेळ आली ही माझ्या ३८ वर्षांच्या स्वच्छ चकचकीत कारकिर्दीत!!! ब्रेक मिळतो दोघांना जेव्हा दिवाळी येते मोती किंवा म्हैसूर नावाचा आडदांड भाऊ येऊन त्यांना आराम देतो... पण ह्यावेळी हे दोघे माझ्या आळशीपणा मुळे शहीद झाले! हातात घेताच काही क्षणातच ह्या निष्ठुर जगात गायब आता नवीन साबण येणार उद्या न्हाणीघरात... नवीन दिवस नवीन सगळं... नवीन राम नवीन श्याम ची वाट बघणार आणि मग दोघे नवीन रामची! स्वच्छ राम-श्याम भक्त #सशुश्रीके 🤣

जुनं ते सोनं

आक्षी बद्दल किलोभर लिहून झालंय... काही सोडलं असेन असं वाटत नाही, पण तरी इतका जीव अडकलाय तिथं काय विचारायची सोय नाही, असं वाटतं एक पेरेलल जग असावं तिथं आपलं, म्हणजे कसं पटकन डोकावता यावं कधी ही कुठून ही.. अशी एक खिडकी नाहीतर दरवाजा. घरी कधी नावडती भाजी किंवा काही खास मेनू नसेल की लगेच त्या दरवाज्यातून हळूच आत जायचं की वर्तमान बंद न भूतकाळ सुरू... आजी मला बघणार... हसणार! "आली का माझी आठवण, आज काय करू... पानगी की दडपे पोहे!?"मी मला बघणार... डोळ्यात माझ्या असली चमक जणू आजी नाही कुठला तरी तारा बघतोय!!!   आजी... आजी काय सुंदर होती माझी आजी काय सांगू, किती सांगू! आई शप्पत सुंदर होती, अतीशयोक्ती नाहीच... ती बोलत नसली तर तिच्या बांगड्या बोलत असायच्या, विळीवर भाजी चिरताना... अंगणात शेण सारवताना... म्हशीला पेंढा घालताना... अखंड बांगड्यांचा आवाज... 'अगदी सराऊंड साउंड / डॉल्बी डिजिटल' कधी पुढून कधी बाजूने! त्या बांगड्या कधी थांबलेल्या आठवत नाहीच. अशी ही ऑडिओ स्वरूपातली चरचरीत आठवण झोपेचा अलगद गोड खून करते. हे आठवण प्रकरण, स्पेशली आजी आणि आक्षी... हे वाईट्ट कॉम्बिनेशन आ