Posts

Showing posts from April, 2019

ऐकता ही येईल असा एक सिनेमा!

Image
तर काय ना आज सकाळी ऑफिसला जाताना गाणी ऐकायचा मूड नव्हता गाणी ऐकायचा मूड नसला की मी कथाकथन ऐकतो, पूलं/वपु वगैरे पण आज तो पण मूड नव्हता. एक कल्पना सुचली, काही हिंदी चित्रपट आहेत आवडते ज्याचे संवाद न संवाद पाठ आहेत. त्यातलाच एक म्हणजे 'आनंद' ( Anand movie ) आपल्या सर्वांच्या आवडत्या गुलज़ारांचा, ऋषिकेश मुखर्जी साहेबांचा... एक न एक सीन प्युअर गोल्ड राव! तर मी काय केलं... ब्लूटूथ ला लावला फोन न सुरु केला मूवी... टायटल पासून राजेश खन्ना - रमेश देव च्या घरी राहायला येई पर्यंतचे संवाद ऐकले.. ऑफिस ला पोहोचे पर्यंत. सगळे प्रसंग रस्त्यावर ... सिग्नलवर जणू प्रोजेक्ट होत होते! अगदी जेव्हा पहिल्यांदा १९९० च्या आसपास पाहिलेला हा चित्रपट, मावशी कडे राहायचो मी तेव्हा, दूरदर्शन वर लागलेला दुपारी, जेवणाची वेळ होती, माझी मावशी स्वभावाला जामच कडक, तिने रागावून बघीतलं तरी तळहाताला घाम येईल असली कडक! जाम घाबरायचो मी तीला... हा पिक्चर लागला आहे हे बघताच तिने रिमोट बाजूला ठेवला आणि म्हणाली समीर हा सिनेमा बघ... आयुष्यात कुठल्याही बाईला रडताना पाहिलं नव्हतं, त्यात माझ्या मावशी सारखी

Second track

आपण मनातल्या मनात विचार करताना बोलत असतो ना काहीतरी, त्या संवादाला सेकंड ट्रॅक ... म्हणजेच आपला दुसरा आवाज म्हणतात म्हणे. लिहिताना पण येत असतो, किंवा काही विचार करताना. पण माझ्या बाबतीत आता हा आवाज केटेगराईजड झाला आहे आजकाल, उदाहणार्थ, गाडीत असताना राग / आनंद नुसार मित्रांच्या आवाजात 'सेकंड ट्रॅक' येतो ऐकू! एखाद्या ठरावीक संगीताबद्दल ज्या व्यक्तीला कळतं त्या व्यक्तीच्या आवाजात दाद देतो! असे बरेच आवाज भिन्न भिन्न विषयानुसार सेव्हड झालेत 'सेकंड ट्रॅक' च्या यादीत. मज्जा येते, व्हॉइस ओव्हर टाकल्याचा फील...   काय काय रसायन दडलेलं असतं बघा मेंदूत! #सशुश्रीके । १७ एप्रिल २०१९