हल्ली सर्वच स्मार्ट फोन वापरतात, अगदी आजी-आजोबाही!

हल्ली सर्वच स्मार्ट फोन वापरतात, अगदी आजी-आजोबाही! "किती सोपे आहे वापरायला!" आईला मी अगदी असेच सांगितलेले! पण "मला गरज नाही… तुम्हा मुलांसाठी सोपे असेल. मला आपला साधा फोन चालतो, आणि काय करू मी स्मार्टफोन वापरून? माझं फोन करायचं आणि घ्यायचं काम होतं ना!" ... तरीही मी बळजबरीने आईला एक छानसा स्मार्टफोन घेऊन दिला, आता ३ वर्ष झाली वापरत आहे, सुरुवातीला १-२ महिने कुरकुर केली, आता ईतका छान वापरते की ती आता तिच्या मैत्रिणींना एप्प डाउनलोड वगैरे करून देते, त्यांच्या शंकेचे निरसन करते, पर्वा चुकून तिच्या हातून मराठी टायपिंगचं एप्प डीलीट झाले!, मी विचारलं असे कसे डीलीट झाले!? म्हणाली 'अरे, फोन खूप स्लो झालेला म्हणून नको ते एप्प्स उडवत असताना ते एप्प पण उडालं!' मग मी चीडचीड न करता, तिला .apk फाईल पाठवली, तिने ती इंस्टोल करून एप्प परत वापरते ही केले! हे सगळं सांगायचा उद्देश… नवीन तंत्राद्यान आणि वाढतं वय ह्यांचा काही संबंध नसतो! जरा वेळ लागतो, आणि उद्या माझी लहान पोर शिकवेल काही नविन तंत्राद्याना बद्दल ह्यात तर काहीच शंका नाही! #सशुश्रीके । १ सप्टेंबर २०१५ । ...