गोलमाल

गोलमाल आजपर्यंत नक्कीच ६०-७०वेळा पाहिला असणार! अगदी म्यूट वर जरी पाहिला तरी मनात डब्बिंग सेट आहे, शब्द न शब्द सिनेमपतल्या सीनच्या आधीच प्लेबैक होतो! चेहऱ्यावर स्मितहास्य का काय ते चालूच असतं अखंड!!! अमोल पालेकरचं घर पण काय मस्त आहे, त्या वर्षाच्या मानानी खुपच मॉडर्न, आणि उत्पलचा तर बंगलाच, प्रचंड आवडणारा प्रसंग - उत्प्लच्या ओफ्फिस मधला -वर्क इज गॉड- त्यानंतरचे इंटरव्यूजचे सीन्स,छोटा कुर्ता... 'मुछ तो मन का दर्पण' 'ये बॅलन्स शीट किस घमंड ने बनाई है सर?' ह्या डायलॉग नंतरचे सम्भाषण, त्या नंतरचा नोकरी मिळाल्याचा दुखःद-आनंद, बडे बाबुंचा कानमंत्र 'आज का काम कल करो कल का काम परसो, इतनी भी क्या जल्दी है... जब जीना है बरसो!?' एकूणच नुसती नॉन स्टॉप धमाल आहे! आणि सोने पे सुहागा, स्टारकास्ट किती परफेक्ट आहे, अमोल पालेकरची बहिण, हेरोइन, त्याची खोटी आई, तीचा इमरजंसी मोड मध्ये किचनच्या छोट्या खिडकीतून आत येणे, अमिताभ रेखा धर्मेन्द्र वगैरेंचा 'स्पेशल अप्पेरिअन्स' सर्व गाणी हीट! खरच काय नशीब काढलेलं अमोल पालेकरनी! ...