'कोंस्टीपेशन'
आज 'पिकू' पाहिला... सदर लेख ज्यांना पिकू आवडला नाहीये त्यांनी वाचू नये, अथवा सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ज्यांना 'शी' ह्या विषयावर बोलायला/ऐकायला आवडत नाही त्यांनी सरळ सरळ ह्या लेखावर बहिष्कार टाकावा! 'शी' हा विषय लोकांना बोलायला आवडत नाही, आणि जेवणाच्या टेबल वरती जेवताना तर नाहीच नाही! त्वरीत अपचन झाल्यासारखा चेहरा करून तुमच्या कडे असे बघतील लोक की जसं काही तुम्ही स्वर्गात आवडता टीव्ही प्रोग्राम पहात बसले आहात आणि बेल वाजत्ये… तुम्ही दरवाज्याच्या पीपहोल मध्ये बघता तर रेड्यावर विराजमान यम तुमची वात बघतोय! मध्ये मी पादणे ह्या विषयावर 'लगी रहे आनी जानी' हा लेख लिहिलेला!… पादतात सगळेच!… पण जे मान्य करतात त्यांच्या कडे पब्लिक असे बघतात जसे, 'मी नाही त्यातली न कडी लाव आतली!' हे सगळं का लिहावसं वाटतंय सांगू का!… एखादा चित्रपट आवडला तरच मी त्या चित्रपटाबद्दल लिहितो, एखादा चित्रपट नाही आवडला तर त्याबद्दल न बोलणे/लिहिणे टाळतो, कारण मग तोच चित्रपट ज्यांना आवडलेला असतो त्यांबरोबर वाद होतात, असो… आज पिकू बद्दल २ओळी चांगल्या लिहिल्या… तर २-३ रिप्लाय...