Posts

Showing posts with the label uae

Those 2 nights of ARRahman's LIVE IN CONCERT by Matrubhumi in Sharjah, UAE 18th March 2017

#Rockstar नंतर सुफी कॉन्सर्ट आता मी इथे दुबईत २००७ मध्ये आल्या पासून साहेबांचा हा तिसरा कॉन्सर्ट... नेहमीप्रमाणेच उत्सुकता! आमच्या #ARRahman फॅन ग्रुप्स वरती हीच चर्चा, त्यात ३ आठवड्यापूर्वी दिनेश वैद्य नामक ग्रेट फॅन्स पैकी एका, त्यांचा पर्सनल मेसेज... जाणार आहेस का / तिकीट काढलेस का? लिंक आहे का... मी लगेच चौकशी सुरु केली, मातृभूमी नावाच्या ग्रुप ने आयोस्जईत केलेला... तिकिटाचे रेट्स म्हणजे 'अग्ग बाबॉ' भारतीय रुपयांच्यात सांगायचं झालं तर ३५,६५३ पासून ८९२ पर्यंत. मला प्लॅटिनम गोल्ड परवडणार नव्हतं आणि मागून पाहायची इच्छा नव्हती, सुवर्णमध्य साठी सिल्वर वगैरे काढायची इच्छा झालेली पण उशीर झालेला निर्णयाला, शो पर्वा आणि सिल्वर पण आता जवळपास संपायला आलेली. Anand Swamy नावाचा एक 'जबरा फॅन' आहे आमच्या रहमानचा! (लिंक चिकटवतोय युट्युबची - https://www.youtube.com/watch?v=APg8MPre92g ) तो म्हणाला "आपण काही तरी 'जुगाड' करू तिकिटांचा, तू काळजी करू नकोस!"... हे ऐकल्यावर मी मनातल्या मनात कॉन्सर्ट पाहण्याची स्वप्न रंगवू लागलो!... पण त्याआधी अजून एक महत...

आज उशीर झालेला मला वाटलं गर्दी नसेल म्हणून गोल्ड क्लास (उच्च श्रेणी) न घेता सिल्वर क्लास (दुय्यम श्रेणी) मध्ये चढलो, पण दुर्दैव!

Image
दुबई मेट्रो! आज उशीर झालेला मला वाटलं गर्दी नसेल म्हणून गोल्ड क्लास (उच्च श्रेणी) न घेता सिल्वर क्लास  (दुय्यम श्रेणी) मध्ये चढलो, पण दुर्दैव! नेमकी आज मेट्रो मध्ये तोबा गर्दी, त्यात इथे मुंबई सारखं वरती पकडायला काही नसतं, त्यामुळे मेट्रोनी पिकअप घेतला की सगळे टेन्शन मध्ये येतात! ज्यांना बाजूच्या स्टील बार्सचा आधार असतो किंवा जे टेकून उभे असतात त्यांचं चालून जातं हो, पण ज्यांना कसलाच आधार नाही त्यांचे वांदे, मग ह्याच्यापायावर पाय, त्याच्या कंबरेत/पोटावर हात, कुठेतरी(कोणालातरी) पकडून उभे राहायचा सभ्य प्रयत्न! आणि मग मेट्रोला एकदाची स्थिर गती प्राप्त झाली की मग पूर्ववत अवस्थेत येउन कोणी जोक झाल्यासारखं हस्तं, कोणी शरीराला भोक पडल्यासारखं तोंड करतं, कोणी अशी खुन्नस देतात की विचारू नका! सगळे आपल्या आपल्या स्वभावा नुसार 'रीएक्ट' होतात. #सशुश्रीके । २१ ऑक्टोबर २०१५