Posts

Showing posts from August, 2014

इटर्नल सनशाईन ऑफ द स्पोर्ट्लेस माइंड

Image
इटर्नल सनशाईन ऑफ द स्पोर्ट्लेस माइंड माझी पहिलीवहिली चित्रपट समीक्षा, नवीन चित्रपटांची करण्यापेक्षा मला आवडलेल्या काही निवडक चित्रपटांची करतो, तुम्हाला वाईट आठवणींपासून कायमची सुटका हवी आहे का? तुम्ही एखाद्या व्यक्तीला व त्या व्यक्तीशी निगडीत सर्व आठवणींना 'टाटा बाय बाय' करायच्या मनस्थितीत आहात काय? तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता…  'लकुना इन्कॉर्पोरेशन' ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास, उत्तम प्रायोगिक मांडणी, बारकावे + प्रेम कथा ह्यांचा संगम पहायचा असेल तर * ईटर्नल सनशाईन ऑफ द स्पोटलेस माइंड * नावाचा इंग्रजी चित्रपट नक्की पहावा. जिम कैरी आणि केट विन्स्लेटचा अगदी हटके स्वरूपातला चित्रपट; २००४ साली प्रदर्शित झालेला एक अप्रतीम पण खूप न गाजलेला / प्रसिद्धी न मिळालेला चित्रपट!   माझा एक मित्र आहे… नाव मिहीर आपटे, इंग्रजी चित्रपटांचा चाहता… मला नेहमी त्यानी उद्गारलेलं एक वाक्य आठवत असतं, म्हणे "आयुष्यात चित्रपटांसारखं काहीच नसतं!" तो म्हणाला अरे येड्या हा बघच… बघच तू! आणि त्या दिवसापासून त्यांनी जे काही पहायला सांगितलं ते बिनबोभाट पाहिलं! असे मित्र मिळायल...