'वाट'
एसटी स्टैंडवर, बस अर्धा तास वगैरे थांबल्यावर करणार काय!? माझं 'लक्ष्य' र्र्स वर.. आणि खारे शेंगदाणे. त्यात एकटा वगैरे असलो की, वडापाव / मिसळ / शाम्पल पर्यंत मजल जायची! एकदा काय झालं... मी जात होतो रेवदंडा बसनी आक्षीला, अलीबागला थांबली लाल परी, अर्धा तासानी निघणार, आईने विचारलं थांबायचय की निघायचय टमटमनी!? पण मग आइनेच निर्णय बदलला, सामान काढा परत उतरा टमटम पर्यंत चालत जा, मग काय माझ्या मागण्या सुरु झाल्या, ३तासांच्या प्रवासात घरुन आणलेला ऐवज संपलेला, आईने ५का१०ची नोट टेकवली, मी अलीबाग स्टैंडच्या मेन रोड वर, भाजीपाला, गजरे, शहाळी, ताडगोळे, भाजलेला मका, शिंगाडे... काय घेऊ काय नको झालेलं! शेवटी पोटावर दगड ठेऊन 'चाचा चौधरी' घेतलं! त्यात पण कन्फ्यूजन 'ठाकठक' न 'चम्पक' पण होतं! असो... ह्या सर्व आकर्षणांमध्ये ऐसटीतुन आलोय आपण!!! ताडकन पाय ज्या दिशेला एसटी त्या दिशेला वळाले, एसटी नव्हती! आईचे डायलॉग आठवले, 'उगाच इकडे तिकडे भटकत बासू नकोस, लवकर ये!' झालं डोळे डबडबले... जवळच कोणा दूसऱ्या एसटीचा कंडक्टर न ड्राइवर तम्बाखू कू...