Posts

Showing posts from June, 2016

भूल आया था घडी...

बडी फुरसत थी उस दिन, भूल आया था घडी इंतजार किया था बहोत, अचानक!... दिन में रात हो गई लगा जैसे छीन गई हो रोशनी, आँखो से मेरी! वो आई थी बिना दस्तक, नाम था उसका, कंबख्त 'निंद' कलाइयोंपे फिरसे गई नजर... भूल आया था घडी. #सशुश्रीके । १४ जून २०१६

भूतकाळ सुरु होतो...

Image
मोकळं आकाश मोकळा तो रस्ता सकाळची वेळ कोवळ्या उन्हाचा तो खेळ सदा सडा प्राजक्ताचा त्यांवर राज्य ते दवाचं कंसात काळजी त्या फुलांची बळी जाई पावली नकळत मागे अंगणात वृंदावनं मुंग्या जणू देती पहारे कधी साखर कधी नारळाचे कधी ताट नैवेद्याचे मागे विहीर दगडी अखंड थंडगार त्यात पाणी काठावर शेवाळं सुंदर जणू सांगे विहिरीची कहाणी गोठ्यात जीव काळे हंबरती तहानेने जोरात साखळी सोडता हळूच वाट जाई थेट हौदात त्यात ठप्प-ठप्प आवाज कधी कैऱ्या कधी नारळ कधी पक्षांचा जीर्ण पानांचा असं शांत ते वादळ अश्या ह्या आठवणी आता झाली ती स्वप्न भूतकाळ सुरु होतो वर्तमान ठेऊन गहाण #सशुश्रीके । ८ जून २०१६

सगळे व्हाट्सअप वर व्यस्त…

Image
"घ्या कादंबरी मस्त पहा तरी हातात घेऊन सगळे व्हाट्सअप वर व्यस्त…" आणि पुढे बरच काही सांगत होता आणि विकत होता एक 'राज ठाकरे' सारखा दिसणारा माणूस, मी नेमका मोबाइलवरच होतो तेव्हा, संध्याकाळची ट्रेन होती, पुणे-मुंबई. त्याचं ते 'Advertising' ऐकून खूप लोकांचे कान त्याने आकर्षले असणार ह्यात वाद नाही, आईने त्याला हात केला, नेमाडेंचा 'हिंदू' पासून इनामदारांच 'राउ' अशी १०-१२ पुस्तकांना कडेवर घेऊन लोकांना तो आवाहन करत होता… "पहा तरी हातात घेऊन… पैसे नाही हो पडत बघायला! घ्या घ्या… वाचन वाढवा!" आईने 'राउ' घेतलं हातात, मी म्हणालो आईला हळूच "आई हे ओरिजिनल नाहीये…" आणि हेच त्याला ही सांगितलं, तो म्हणाला अहो हेच आहे ओरिजिनल, झेरोक्स वालं पण असतं! पण सध्या नाहीये माझ्याकडे!" मी किंमत विचारली, "अडीचशे फक्त!" मी मनात विचार केला की आता काय ह्याचाशी हुज्जत घालून उपयोग! ह्या प्रिंटींगच्या क्षेत्रात्लाच मी, मला काय हा अम्जाउन सांगतोय! पण असो… आईने भाव करण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यात मी अडीचशे त्याला देऊ केले. ...