भूतकाळ सुरु होतो...

मोकळं आकाश
मोकळा तो रस्ता
सकाळची वेळ
कोवळ्या उन्हाचा तो खेळ

सदा सडा प्राजक्ताचा
त्यांवर राज्य ते दवाचं
कंसात काळजी त्या फुलांची
बळी जाई पावली नकळत

मागे अंगणात वृंदावनं
मुंग्या जणू देती पहारे
कधी साखर कधी नारळाचे
कधी ताट नैवेद्याचे

मागे विहीर दगडी
अखंड थंडगार त्यात पाणी
काठावर शेवाळं सुंदर
जणू सांगे विहिरीची कहाणी

गोठ्यात जीव काळे
हंबरती तहानेने जोरात
साखळी सोडता हळूच
वाट जाई थेट हौदात

त्यात ठप्प-ठप्प आवाज
कधी कैऱ्या कधी नारळ
कधी पक्षांचा जीर्ण पानांचा
असं शांत ते वादळ

अश्या ह्या आठवणी
आता झाली ती स्वप्न
भूतकाळ सुरु होतो
वर्तमान ठेऊन गहाण

#सशुश्रीके । ८ जून २०१६


Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!