जेल...
जेल... (टीझर) जेल मध्ये आहे तो! गेले कित्येक वर्ष सकाळी कोणी ना कोणीतरी काठी वाजवतो कोठडीच्या सळयांवर, हा अलार्म असावा बहुतेक! पण कशाला हवाय अलार्म, तो झोपलेलाच नाहीये कित्येक वर्ष, डोळे उघडतो... बंद असले की झोपायचं समाधान. जेमतेम १X१ फुटाच्या खिडकीतून येणारा प्राकाशा कडे तो तासंतास पाहात बसे, त्यावरची कडेला आलेली जळमटं काढतो तो अधून मधून, रात्री घु घु आवाज करत वारा खेळायचा त्या छोट्या पण जाड भिंतीच्या किडकीत, तोच काय त्याला विरंगुळा, त्याला निरनिराळी गाणी ऐकू यायची... हसायचा मग, स्टीलचा पेला त्यावर नखाने ठेका देत सकाळ व्हायची, मग सकाळ झाली की तो शांत, पण बाहेरचे आवाज त्याला मुळीच आवडायचे नाहीत, दिवसभर कानात बोट घालून असायचा तो, शांततेशी जणू करार केलेला त्याने, एकाही कैद्याशी एक शब्द बोलला नव्हता तो, त्याबरोबरचे कित्येक कैदी आले न गेले, हा मात्र तिथेच राहिला. कोणी १खून कोणी २ कोणी १०... पण ह्या बिचार्ऱ्याने कोणाचाच खून केलेला नव्हता! . . . . . पण एके दिवशी तो ज्याची वाट पाहात होता तो आला... क्रमश: #सशुश्रीके । १० सप्टेंबर २०१६ –––––––––––––––––––––––––––––––––––...