मुंबईत राहिलो नाही जास्तं... पण कूलर ऐंड कंपनी सारखी इराणी हॉटेलं... क्या बात है टाइप फीलिंग! उरल्येत फारच कमी म्हणा... अगदी बोटांवर मोजता येतील इतकीच्! त्यातली डुगडुगणारी जुनी लाकडी टेबलं/खुर्च्या... जुने पंखे, जुने आरसे, जीर्ण मेनुकार्ड, जुने सॉसचे लाल खंबे, गल्ल्यावर विराजमान जुना मालक... त्याचा जुना 'अती'ट्यूड... जुन्या टेबलवरच्या जुन्या काचेच्या खालचं जूनं कापड... जूना ऐशट्रे, जूने जुळे सॉल्टपेपर, जुन्या मधुबाला पासून जुन्या ऐर्नोल्डचे रैंडम जुने पोस्टर्स, जूना फिडोडीडो नी जुन्या चार्ली चैप्लिनचे जुने स्टीकर्स, ताज्या अंड्यांच्या जुन्या क्रेटची इमारत, बाजूला फ्रेश स्लाइस-पावांच्या लाद्यांचे डोंगर, काउंटर वरची जुनीच 'स्टील्ल'बेल्ल, कोपऱ्यातली नीळी कैडबरीची जुनी तिजोरी, जुन्या शोकेस मधला जूना हुक्का... जुन्या छतावरचे काचेचे चंबूयुक्त जुनेच प्राकाशलट्टू... 'आज नगद कल उधार' ह्याची पाटी नसलेले जुने दरवाजे, जुन्या खांद्यावर रुमाल आणि कपाळावर घाम असलेले जुने 'वेट'र्स... भेजा न खीमा न डबलफ्राययुक्त जूना पदार्थफलक, बऱ्यापैकी जुनी पांढरीजाड कपबशी, त्यात साय...