राजू भैया!

काही लोकं कधीच विसरू शकणार. त्यातला एक म्हणजे... राजू भैया! युपी/बिहार वाला पिळदार मिश्या आणि भटजी शेंडी वाला, मे महिन्याच्या सुट्टीत आक्षीला जायचो तेव्हा दुपारी आणि संध्याकाळी ह्याच दर्शन व्हायचच, कधी घरातून, कधी अंगणातून, तर कधी थेट रस्त्यावर, मी जिथे असेन तिथून. तोडकं मोडकं मराठी बोलायचा, अमिताभला अजून ही येत नाही मराठी उच्चार नीट अगदी तसच. असो शेवटी युपी/बिहार वालाच! पिळदार मिश्या आणि भटजी शेंडी वाला, 'गोला ले लो गोला... गोळा शरबत गोलाsssss' घरी असलो की हातातला उद्योग टाकून रस्त्यावर धावत जायचो, आजी-आजोबा जाम रागवायचे.. घसा खराब होइल, आई रागवेल! पण मी कसला ऐकतोय!!!

जीभ लाल काळी नीळी... माझा आवडता 'काला खट्टा' - दोनेक गोळे संपवल्या शिवाय जाऊ द्यायचो नाही त्याला! काही नतद्रष्ट कोळी पोरं खुप त्रास द्यायची बिचार्‍याला! उगाच गोळे खात एक्स्ट्रा सरबत वगैरे.. त्यावर सब्जा दे, बर्फ दे... मला खुप राग यायचा त्यांचा! पण काय करु शकलो नाही कधी, त्या भैयाला पैसे देऊन परत घरी यायचो! कधी नसले तर 'बाद मै दे दे ना याद से!' असं म्हणत मागेल ते द्यायचा अगदी प्रेमाने.

काही वर्षापूर्वी त्याची गाडी दिसलेली नागावला... कोणीतरी म्हणाले तो नसतो हल्ली गाडीवर, त्याची मुलं चालवतात आता गोळा गाडी.


आता तो कधी दिसेल असं वाटत नाही, दिसला तर नक्की आठवणी सांगणार.

#सशुश्रीके । २ जुलै २०१७





Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!