Posts

Showing posts from December, 2018

धडक धधक...

Image
धडक धधक... धक धक खंड खुड खुड कखीच धुक... धडक धडक... धडक धधक  रूळ बदलते ना रेल्वे... त्याचा आवाज, जेव्हापासून ऐकला तेव्हा पासून इतका डोक्यात कोरला गेलाय विचारू नका! ज्या डब्यात बसलोय त्याचा वेगळा, बाजूने जाणाऱ्या रेल्वेचा वेगळा.. संथ ... जोरात जाणाऱ्या रेल्वेचा वेगळा, काही तरी खास आहे ह्या आवाजात! संगीत आहे ह्यात... एक आकर्षण आहे... उगाच नाही द जेंटलमन च्या चीकबुकरैले किंवा दिल से वाल्या छईया छईया मध्ये रहमान ने वापरलं... वापरलं पण असलं खास! अरे हो... लकी अली ने पण वापरलं आहे 'कहा से तू आती है...' भोपाल एक्सप्रेस नावाच्या चित्रपटात, अजून पण आहेत... पण आता तरी ह्या ३गाण्यांची आठवण धडकली कानात. जाम भीती वाटायची लहानपणी त्या क्षणी जेव्हा रूळ/ट्रॅक बदलायची रेल्वे, आणि तो क्षण आठवून अजून आता मजा येते, मोठा प्रवास असेल तर रात्री झोपेत पण तो आवाज ऐकून कसं 'लै भारी' आवाज अशी स्वतःलाच एक दाद देतो मी.. तो दोन/तीन सेंटीमीटर का काय असेल तो गॅप दोन रुळांमधला, इतका इम्पॅक्ट करून जातो ना 😊 अजून ही रमतो मी त्यात, डोळे बंद करायचे आणि... धडक धधक धक धक खंड...

व्योमकेश (ब्योमकेश) बक्षी...

Image
स्वप्नात दिसलेला एकदा... खूप प्रयत्न केला त्याने मला 'कलक्त्याला ये एकदा!' वगैरे सांगून, पण नाही... पुणे सोडवेना, इथे खून वगैरे ते पण रहस्यमय वगैरे अशक्यच, झोपेच्या वेळेत १-४दुपारी शक्य आहे, पण कोण सोडणार दुपारची झोप, आणि झालाच जर खून, तर कोण ठेवणार लक्ष... असो विषय भरकटत आहे! तर सांगायचं असं की हा रजीत कपूर! जणू ह्या रोल साठीच बनलेला, त्यानंतर च्या सर्व भूमिका त्याने केल्या असतील खास, पण... पण ही व्योमकेश मधली सरलता, सहज पणा... त्याचं ते हसणं, गू ढता खुलवणं, जरा फारच भारी! त्यात लहानपणी पाहिलेली मालिका, आठवत नाही म्हणून परत पाहिलेली दूरदर्शन वरच, मग आता युट्युब वरून, म्हणजे एक एपिसोड निदान ३दा तरी नक्कीच पाहिलाय... सुरुवातच काय खास शीर्षक वादनाने, कोणीतरी झपाटलाय खुनी ला पकडायला, पण प्रत्यक्षात मात्र थंड डोक्याचा, उंच, शिडशिडीत... कमालीचा हुशार आपला देशी जासुस! व्योमकेश नंतर खूप आले गेले... त्यावर हिंदी सिनेमा पण आला... वेगळा होता, छान संगीत, जरा हटके... पण मालिकेतली सरलता गाठता आली नाही, 'एक्शन' ला बाजूला ठेऊन व्योमकेश बक्षी मालीकेनी जी मजल मारल...