व्योमकेश (ब्योमकेश) बक्षी...



स्वप्नात दिसलेला एकदा... खूप प्रयत्न केला त्याने मला 'कलक्त्याला ये एकदा!' वगैरे सांगून, पण नाही... पुणे सोडवेना, इथे खून वगैरे ते पण रहस्यमय वगैरे अशक्यच, झोपेच्या वेळेत १-४दुपारी शक्य आहे, पण कोण सोडणार दुपारची झोप, आणि झालाच जर खून, तर कोण ठेवणार लक्ष... असो विषय भरकटत आहे!

तर सांगायचं असं की हा रजीत कपूर! जणू ह्या रोल साठीच बनलेला, त्यानंतर च्या सर्व भूमिका त्याने केल्या असतील खास, पण... पण ही व्योमकेश मधली सरलता, सहज पणा... त्याचं ते हसणं, गूढता खुलवणं, जरा फारच भारी! त्यात लहानपणी पाहिलेली मालिका, आठवत नाही म्हणून परत पाहिलेली दूरदर्शन वरच, मग आता युट्युब वरून, म्हणजे एक एपिसोड निदान ३दा तरी नक्कीच पाहिलाय... सुरुवातच काय खास शीर्षक वादनाने, कोणीतरी झपाटलाय खुनी ला पकडायला, पण प्रत्यक्षात मात्र थंड डोक्याचा, उंच, शिडशिडीत... कमालीचा हुशार आपला देशी जासुस!

व्योमकेश नंतर खूप आले गेले... त्यावर हिंदी सिनेमा पण आला... वेगळा होता, छान संगीत, जरा हटके... पण मालिकेतली सरलता गाठता आली नाही, 'एक्शन' ला बाजूला ठेऊन व्योमकेश बक्षी मालीकेनी जी मजल मारली त्याला सलाम!

#सशुश्रीके | २ डिसेंम्बर २०१८




Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!