आज सायकल चालवताना फूटपाथ वर एक किचेन मिळाली.. #Lego ची - शार्क माश्याची किचेन! . . मागच्या वर्षी पार्कात चालतांना एक खेळण्यातली टॅक्सी मिळाली ती पण मरसिडीज! . . दोन्ही गोष्टी माझ्या प्रचंड आवडीच्या, म्हणजे स्केलमॉडेल गाड्या आणि लेगोचे मिनी फिगर्स. . . त्यात मर्सेडिज ची टॅक्सी आणि लेगो मधला मिनिफिगर शार्क! दोन्ही दुर्मिळच, अगदी ऑनलाईन ही आऊट-ऑफ-स्टॉक वाला प्रकार असो आपल्याला कशाची ओढ आसेल तर तुमच्या कडे ती गोष्ट येते कधी ना कधी, कधी लगेच कधी उशीरा पण येतच! . . तर आज हे असं झालं, खुश होतो मनातून, घरी आल्या आल्या सांगितलं अमृताला "काय मिळालं बघ!" तर तिने तोंड वाकडे करून सांगितलं... "आता ज्याने ती कीचॆन पाडली असेल तो शोधायला गेला त्याच फूटपाथ वर तर त्याला मिळणार नाही ती!" मग मला राग आला... पण अमृता म्हणाली ते ही चुकीचे नाही ते जाणवले! पण काय आता उशीर झालाय... परत सायकल चालवत तिथे जायचा उत्साह नाही माझ्यात असो . . अजून एक सांगावस वाटत ते असं की, ज्या वस्तूची तुम्ही काळजी घेत नाही किंवा लक्ष देत नाही ती गोष्ट 'गायब / हरवू' ही शकते . . जसं माझं ड्रायविंग लायसन्स...