आजी आजोबा आणि मी...
काय पुण्य केलं आहे मी मागच्या जन्मी काय माहीत... दोन्ही बाजूंच्या आजी आजोबांचं प्रेम मिळालं, खूप छळलो त्यांना आणि त्यांनी तितकेच लाड करून परतफेड केली 😊 'आण्णा' बाबांचे वडील, आण्णा म्हणायचे सगळे त्यांना, एक दिवस खूप ठसका खोकला आला, पुढचं आठवत आहे मी थेट माझ्या शेजाऱ्यांकडे होतो, परत घरी आलेलो तेव्हा अण्णांच्या नाकात कापूस आणि ओठांवर तुळशीचे पान होते, आणि मला त्यांना प्रदक्षिणा घालायला लावलेली. त्या दिवसाआधी यांबरोबर रोज मंदिरात जायचो, त्यांच्या मित्रांबरोबर खेळायचो, त्यांच्या मांडीवर जणू सिंहासनावर बसल्या सारखं वाटायचं, पेपर रेडिओ टीव्ही पाहात असताना माझा व्यत्यय नेहमीचा होता त्यांना, पण हसतमुख चेहरा, हे सगळं मला आठवत आहे, मी बालवाडीत वगैरे असून आठवत आहे म्हणजे खरच कमाल आहे! तरी कधीतरी हावरट पणा म्हणून काही किस्से आठवतात का हा प्रयत्न चालू असतो. पण शेवटी माणूसच आहे, असं इतकं कसं आठवेल! आठवलं की लगेच लिहायचं... पुन्हा आठवेल का? का नाही...ह्या भीतीने का होईना! जास्त किस्से आठवतात ते आईच्या वडिलांचे, 'आप्पा' आप्पा म्हणायचो सगळे त्यांना... भयंकर कडक स्वभाव. उठ म्हंटलं की ...