एक मोठा शेवटचा दिवस!


एक मोठा दिवस शेवटचा दिवस!


दुसऱ्या दिवशी दुबईला जायची गडबड उरलेली २ महत्वाची कामे ... होतो कोथरूडला आणि २ पर्याय होते. एक काम होतं पौड रोड वर आणि एक पेठेत!


पेठेत ६ नंतर म्हणजे महाभयंकर ट्रॅफिक, त्यात तिळक रोड वर जायचं होतं, काम होतं मित्रासाठी तबला हातोडी विकत घेणे आणि दुसरं काम होतं मिलिंद देशपांडे नावाच्या कॉलेज वर्गमित्राला भेटून त्याकडून त्याने केलेले संस्कृत भाषेतले खेळायचे पत्ते घेणे, (संस्कृत भाषेत पत्ते म्हणजे एक वेगळेपण आहेच पण त्याने केलेले त्यावरचे काम पण खास! लिंक शेर करीन कामाची त्याची लेखाच्या शेवटी)


तर ह्या २ कामांपैकी १च काम होणे शक्य होते, मी सजीव माणसाचा विचार केला .. निर्जीव हातोडी घेण्यापेक्षा सजीव माणसाला भेटून त्याला/त्याच्या कलेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. 


त्याने पाठवलेला मॅप चालू केला, १-२ दा डियो (दू-चाकी वाहन) थांबून मॅप पाहिलाही... एके ठिकाणी शेवटचे मुख्य वळण आले आहे का हे पाहायला डावा हात खिशात घातला, मोबाईल हातात घेतला, वळण अगदी समोरच पण सिग्नल पण, त्यात समोरची तीन चाकी मालवाहतूक रिक्षा थांबली! मी ही त्याच प्रयत्नात, पण मेट्रोचे काम चालू असलेल्या त्या नवीन पण खडकाळ सिमेंट रोड वर उजव्या हाताने मारलेल्या पुढच्या ब्रेकने आपले काम केले, जरासे हॅन्डल डावी/उजवी (नीट आठवत नाही) कडे करून असफल प्रयत्न केला थांबायचा ... आणि व्हायचं ते झालच. 


डियो पडली उजवी कडे, मी डावीकडे... सुपरमॅन पोज, त्याच्या त्या घट्ट मुठीच्या ऐवजी माझ्या हातत होता फोन, घट्ट पकडलेला... त्याच्या कॉन्फीडेंट चेहऱ्याच्या ऐवजी होता माझा नॉट सो कॉन्फीडेंट चेहरा, नशीब हेल्मेट होते... पण जुने असल्याने लॉक तुटलेले. रस्त्यावर हेल्मेट आदळल्यावर त्याने जागा सोडली त्यात चष्मा पण त्याला साथ देत त्याबरोबर रस्त्यावर! मला फिल्डर ने डाइव्ह मारल्यासारखं वाटत होतं... हातात बॉल ऐवजी फोने होता आणि मैदान ऐवजी रास्ता! असो... 


पडलेलो नुसतेच चौघे नाही, चौघे म्हणजे मी, डियो, हेल्मेट, चष्मा... आम्हा तिघां बरोबर माझ्या पायांच्या मध्ये ठेवलेली ऑडिओ केसेट्स ची पिशवी आणि त्या पिशवीत मावल्या नाहीत त्या डिकी मध्ये घुसवलेल्या त्यापण उदबत्यांबरोबर ... तो सगळा माल पसरलेला ना रस्त्यावर, जणू जुन्या बाजारात आलोय आणि वस्तू पसरवून ठेवल्यात असलं सगळं, फक्त सतरंजी नव्हती ह्या सगळ्या माल खाली!


हातातला मोबाईल फायनली परत खिशात ठेवत त्या उंच रिक्षा खाली अडकलेली डियो बाहेर खेचण्याचा प्रयत्न करताना असं कळलं की एका खिळा - रॉड मध्ये अडकली आहे डियो! मग बघ्यांपकी एकाने रिक्षा चालकाला कळवले ओरडून की रिक्षा पुढ् नेऊ नका, हे सगळं झालं, १ दीड इंची भोक पडलेली डियो काढली मी एकट्याने, मग एकाने मदत केली उभी करायला, २-३ जण कॅसेट आणि उदबत्त्या गोळा करून डिकीत भरत होते, एकाने विचारले ही 'जास्त लागले नाही ना' मी सांगत होतो, मी ओके आहे... थ्यांक्स वगैरे काही तरी बडबडत मी आभारप्रदर्शन उरकले आणि घेतले ते शेवटचे उजवे वळण 


आता मित्राला कॉल केला... पुढची मजा त्याने लिहिली तर जास्त मजा येईल!


थोडक्यात काय दुबईतून पुण्यात जाण्या आधी सायकल ने पडलेलो तेव्हा डावे ढोपर फोडून घेतलेले आणि पुण्याहुन दुबईत येण्याच्या आदल्या दिवशी तेच ढोपर पण त्याबरोबर त्याच बाजूचा हात आणि हाताच्या करंगळी ने ह्यांनी मैत्री केली! 


#सशुश्रीके ०२/०३/२०२२


Link to PLAYING CARDs by Milind Deshpande - https://www.chitranganart.com/playing-cards/ 

And you cab buy them on flipcart for Rs 387 - https://www.flipkart.com/chitrangan-art-mohin-playing-cards/p/itmd66ab3c8c0690?pid=CDGG8VZNEZUFHS3P&cmpid=product.share.pp&_refId=PP.f16fce7a-9057-4521-b719-557b3b0c5c67.CDGG8VZNEZUFHS3P&_appId=CL

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!