अमृता समीर केतकर.
॥श्री॥ उद्या वैलेंटाइन डे म्हणे! 😂 मला काय, आम्हाला...दोघांना कौतुक नाही, असे डे वगैरे मध्ये! पण लेख लिहितोय अमृतावर असं सम्याला (मित्राला) सांगीतलं तेव्हा तो म्हणाला, वाह वेलेंटाइन निमित्त सप्रेम भेट की काय, तेव्हा त्याला म्हणालो! कावळा बसायला न फांदी तुटायला, म्हण जरी चुकीची असली तरी काय झालं, भापो झाला की आलं त्यात सगळं! ☺ असो... आता मुद्द्यावर येतो! सौ. अमृता समीर केतकर. हे आत्ताचं नाव... सात फेरों के पहले का नाम बोले तो... कु. अमृता अविनाश गोगटे. गोरी पान, सडपात्तळ बांधा... (आत्ता नाही) 😝 अगदी छान नाटकात सुंदर मुलीचा अभिनय करणाऱ्या पात्रा सारखी! 😍 जवळून फार कमी पाहिली, एकूणच मुलींच्या पासून लांब... त्यामुळे लांबुनच प्रेम वर्षाव करायचो, त्यात आमोद ज्याला आम्ही 'गोट्या' सगळे म्हणायचो तो तीचा चुलत भाऊ माझा क्लास मेट, त्यामुळे जरा अजुनच लांब. हमारा बजाजच्या स्पिरिटवर यायची... १दीवस तीची स्पिरिट मग १दीवस सुरश्रीची (तीची क्लासमेट) असं काहीतरी गणित होतं, त्यांचा ४-५ जणींचा ग्रुप होता, अमृता मला आवडते... हे जवळपास सगळ्यांना माहीत होतं, अमोदला सोडून! नंतर कळालं त्याला,...