अमृता समीर केतकर.

 

॥श्री॥


उद्या वैलेंटाइन डे म्हणे! 😂

मला काय, आम्हाला...दोघांना कौतुक नाही, असे डे वगैरे मध्ये! 

पण लेख लिहितोय अमृतावर असं सम्याला (मित्राला) सांगीतलं तेव्हा तो म्हणाला, वाह वेलेंटाइन निमित्त सप्रेम भेट की काय, तेव्हा त्याला म्हणालो! कावळा बसायला न फांदी तुटायला, म्हण जरी चुकीची असली तरी काय झालं, भापो झाला की आलं त्यात सगळं! ☺


असो... आता मुद्द्यावर येतो! 


सौ. अमृता समीर केतकर.

हे आत्ताचं नाव...

सात फेरों के पहले का नाम बोले तो...

कु. अमृता अविनाश गोगटे.

गोरी पान, सडपात्तळ बांधा... (आत्ता नाही) 😝

अगदी छान नाटकात सुंदर मुलीचा अभिनय करणाऱ्या पात्रा सारखी! 😍 जवळून फार कमी पाहिली, एकूणच मुलींच्या पासून लांब... त्यामुळे लांबुनच प्रेम वर्षाव करायचो, त्यात आमोद ज्याला आम्ही 'गोट्या' सगळे म्हणायचो तो तीचा चुलत भाऊ माझा क्लास मेट, त्यामुळे जरा अजुनच लांब. हमारा बजाजच्या स्पिरिटवर यायची... १दीवस तीची स्पिरिट मग १दीवस सुरश्रीची (तीची क्लासमेट) असं काहीतरी गणित होतं, त्यांचा ४-५ जणींचा ग्रुप होता, अमृता मला आवडते... हे जवळपास सगळ्यांना माहीत होतं, अमोदला सोडून! नंतर कळालं त्याला, मग अगदी बड़े भैया स्टाइल मध्ये 'तू सीरियस आहेस का!?' वगैरे बोलणं झालं आमचं... मी सीरियस आहे अमृता बाबतीत ह्याची खात्री झाल्यावर साहेबांनी बिंदास सपोर्ट सुरु केला मग... 

मग एके दीवशी तो दीवस आला... 👇


स्केचिंग साठी मी आणि आमोद यूनिवर्सिटीला, का!? 

तर अमृता आणि तीची मैत्रीण प्रियंका जाणार होते, का!? 

तर त्याचं यूनिवर्सिटीचं आउटडोर 'मिस' झालं होतं म्हणे, 

अमोद म्हणाला आम्ही कंपनी द्यायला येतो, असं सगळं सेटिंग झालं... 

आम्ही भेटलो, तीला भेट म्हणून एक छान पेंटिंगचा फोटो दीला... पण काय मनातलं बोलायचं धाडस होईना! साधारण एक दीड तासानी कँटीन पाशी आलो, अमोदनी मला तिच्या समोरच विचारलं, 

"काय रे बोललास का!?" 

माझ्या चेहऱ्यावर हवालदाराने लायसंन मागितल्या सारखे हावभाव बघुन, अमोदनी "प्चक काय तू पण..." असं काहीतरी बडबडला.. मग मी जरा धाडस करून "अमृता मला तुला काहीतरी सांगायचे..."

अमृताला माहीत होतच... २१अपेक्षित पैकी एक प्रश्न सोडवल्याचा आनंद लपवत, ती माझी स्कूटर पाहुन, प्रियांका कडून कायनेटिकची किल्ली घेत... "चल आपण जरा चक्कर मारून येऊ..." मी तडीक मागे बसलो... मी सांगून टाकलं... म्हणालो "मला तू खुप आवडतेस" तीचं उत्तर 'ओके' पुढे म्हणाली, "आता आपण खुप लहान आहोत... बघू पुढे..."

जरा मैचुअर मुलींचा जो काय डायलॉग असतो तो तीन फेकला, मी मनात विचार केला... ओके काय!? तीतक्यात झाली आमची 'राइड' 😏


मग यूनिव्हर्सिटीला बाय बाय करताना त्या कंफ्यूज 'ओके'च्या आसपास प्रेमाची फुलपाखरं माझ्या स्कूटरच्या आजुबाजुला भीरभीरत होती... मी क्लाउड नाईन का काय ते... त्यावर होतो! गजब का है दीन... सोचो जरा (अनुभवो जरा) वगैरे... एकूणच मी स्वत:ला जिंकलेलो, घरी जाऊन नीलमला (माझा अजुन एक मित्र) सांगितली झालेली रम्यकथा... त्याला 'ओके' खटकला! म्हणाला 'ओके'काय!? स्पष्ट 'हो' का 'नाही' ते सांग!... मग ती फुलपाखरं आणि क्लाउड नाइन परत गोळा करत फोन मारला... तीला विचारलं, उत्तर 'अरे हो रे!' मग काय परत फुलपाखरं न क्लाउड नाइन्ना फिरसे आमंत्रण! 😘


लपून छपुन फोन, 

एकमेकांना बघायचं, 

हसायचं, जमेल तेव्हा फीरायचं...

फूल ऑन नाना पाटेकर च्या 'राजू बन गया जेंटलमेन'चा 'धीनक धीन धा' टाइप्स रोमांस... स्कूटरची लाज वाटायला लागली, मग बाइक घेतली... खुप फीरलो आम्ही, 

कधी!? 

कॉलेज च्या वेळेत! उन्हात... 

मग त्या उन्हाचा तीला त्रास! 

संध्याकाळी भेटणे अशक्य कारण 'संस्कार' 

अन मी बेजार! 😔


शेवटचं इयर... आता तीच्या घरीही कल्पना अली होती, माझ्या लास्ट इयरला बाबांची तब्येत खराब झाली, म्हणाले तू सीरियस असशील अमृतामध्ये तर बोलाव तीला मला बोलायचे आहे तिच्याशी...

त्यासाठी नार्मल वार्ड मधून सेमी प्राइव्हेट मध्ये येऊन 'मीटींग' झाली... त्याच वर्षी बाबा गेले, पण बाबांनी अमृताला पाहीले, पोरगी पसंत आहे असं न सांगता त्याच्या चेहर्यावरचं समाधानच सगळं सांगून गेलं. 😊


त्यानंतर खुप किस्से घडले, वैलेंटाइन डेच्या दीवाशी तीला एक सैग दिलेली, गिफ्ट! घरी अमृतानी तीच्या बहिणीला सांगितले! अश्विनी नाव तीचं, अश्विनी म्हणाली हे काय, असं कोणाकडून काही गिफ्ट वगैरे घेत जाऊ नकोस, हा सगळा प्रकार मला अमृतानी सांगितला, माझी फाटलीच! ताड़कनी सुरश्रीला गाठलं, काय करायचं काय करायचं... एक युक्ती सुचली... गिफ्ट शॉप मध्ये जाऊन सैग ची प्रतिमा असलेली की-चैन घेतली आणि नेउन दिली अमृताला, म्हणालो ही घे कीचैन आणि मी दीलेली ओरिजिनल सैग दे आता... वपरतो मीच! काय पोपट झालेला... असे अनेक फ़ालतू-काही दर्जेदार किस्से घडत गेले... हळू हळू करत सर्वांन्ना जेव्हा कळालं की समीर आणि अमृता एकमेकांशिवाय जगु शकत नाही वगैरे, तेव्हा बात रिश्तों मै बदल गई...

शुगरबॉक्स झाला, 

आता कशाला थांबताय करूनच टाका लग्न,

लग्न झालं! 

हल्लीच्या जमान्यातला बालविवाहच हो... 

मी २४ (धावतं२५)न ती २२(पळतं२३) 😑


'लग्न काय असतं रे भाऊ?' असा प्रश्न विचारण्या आधीच, 'लग्न झालं की रे भाऊ!' असे काहीतरी झाले! 😅


कु.अमृता अविनाश गोगटे आता सौ.अमृता समीर केतकर. एक 'समजुद्दार' सुन आणि 'सुगरण' बायको म्हणून ती घडत गेली, आणि अजुनही घडत्ये, माझ्यासाठी मुंबईत रहायला आली, मी दुबईत आलो, लगेच २महिन्यात तीलाही जॉब मिळाला... बारा साली अन्वयाचा जन्म... आता आम्ही एका बालकाचे पालक होऊन अडीच वर्ष झाली पण! ☺


खरच नजर लागू नये असा प्रवास..

' • ' (शाब्दीक टीळा)


आता सांगतो हीच्या स्वभावाबद्दल... 

एक नंबर घाबरट...

अंधार, फास्ट किव्वा रैश गाडी चालवली कोणी की पायात नसलेले ब्रेक दाबणार हमखास, दरवाज्याच्या 'भोक्क्'ला सुद्धा बंदुकीची गोळी लागल्यावर घाबरल्या सारखे हावभाव! 

खायच्या बाबतीत म्हणाल तर... 

चायनीज तर ईतकं आवडतं जीतकं ईटालिएन! कुरकुरीत पेक्षा चांबट खायला जास्त आवडतं... चहा (कोमटही चालतो), 

पुणे बेकरीचे प्याटीस म्हणजे म्याडम खुश! 

आंबट मुळीच झेपत नाही... 

थोडक्यात मी आहे त्याच्या अगदी उलट! 😛


पण फूल ऑन रिस्पेक्ट...

रोज डबा देते हो मला! आणि पोळ्याही देते!

अह्हो नाही देत आजकाल बायका डबा... 

दीला तरी पोळ्या! 

तीने ह्या बाबतीत लग्न झाल्या झाल्याच् जिंकलेलं!!! 

आईच्या पेक्षा सोल्लीड फुल्के!... 

आनंद तव्यावर मावेना माझा... आपलं... 

गगनात म्हणायचं होतं! 😜


असो तर ही अशी सर्व गुण संपन्न, 

'मेड इन पुणे' फॉर 'बॉय फ्रॉम ना इधर का ना उधर का'... बाकी जाम भांडतो ही आम्ही, 

पर थोड़ा मिर्च डालेगा तो खाना लाजवाब होता है वैसेईच अपुन का वाइफ अपुनके अच्छे के लिए भांडता है असा बोलायचं अन सोडून द्यायचं! 

सोडून दीलं की इन्द्रधनुष... 

छान चेहरा फुलतो तीचा...

पण चीडली की गोड दिसतं आमचं फूलपाखरू.


कपडे खरेदीची खुप आवड, 

नुस्तीच खरेदी नाही तर स्वतःच्या माझ्या... अन्वयाच्या, 

सर्व कपड्यांना नीट इस्त्री घड्या मारून 

'रेड़ी टू वेर'...हैंगर नैय तो कपाट मै घडी मारके!

आणि कमालीची स्वच्छता...

आता मात्र हे सर्व लिहिताना जाणवतय की लग्न होऊन घरी आलेल्या स्त्रीला लक्ष्मी का म्हणतात! त्यात अन्वया आणि मला सांभाळणं म्हणजे! तौबा तौबा...

खरच बायको आहे म्हणून नाही, किंवा 'गर्लफ्रेंड' होती म्हणून ही नाही, शी डीजर्वज् एव्हरीथिंग शी एवर ड्रीम्ड ऑफ़!

लग्न झाल्या झाल्या सासरेबुआंना आमच्या जस्ट झालेल्या हीला खुश ठेवण्याची हमी दीली...

आहे हो... खुश आहे!

आहेस का नाही गं!? 


#‎सशुश्रीके‬ | १३ ते १४-०२-२०१५

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!