Posts

Showing posts with the label hero

'लाईट हाऊस' - अविनाश गोगटे

Image
अवी म्हणतात त्यांना, अन्वया आबा म्हणते, नाव अविनाश गोगटे , सासरेबुआ माझे आणि सुबोधचे, अश्विनी आणि अमृताचे वडील, पण नाही... मी कधी त्यांना सासरेबुआ ह्या दृष्टीने पाहिलंच नाही. माझ्या साठी पहिल्यापासूनच काका, जसे इतर काका असतात ना... मित्रांचे/मैत्रिणींचे वडील, अगदी तसेच. माझे बाबा गेल्यानंतर काकाच माझे बाबा. पण बाका/काबा म्हणण्यापेक्षा काका बरं नाही का? म्हणून काकाच. डोक्याचा जवळपास पूर्ण चंद्र, कामामुळे अखंड महाराष्ट्र भर फिरल्यामुळे प्रत्येक भागाची माहिती त्यांच्या चेहऱ्यावर... म्हणजेच रापलेले. 'बाबा गोरे होते पण टुरिंग जॉब मुळे...' असं अमृता नेहमी सांगाते. बाकी ते स्ट्रीकट् आहेत वगैरे अमृता सांगायची, पण कधी जाणवलं नाही तसं कधी. किव्वा मला जाणवून दिलं नसावं, त्यांनाच माहीत. 'समीर आयुष्यात दारू आणि बाईचा नाद करू नकोस' हा सल्ला मला अधून मधून अगदी न चुकता मना पासून देतात, त्यांच्या भावांचे, मित्रांचे... झालच तर त्यांच्या ऑफिस-टुरिंगच्या वेळचे किस्से सांगातात, महाराष्ट्रात कुठे कुठला पदार्थ उत्तम मिळतो वगैरे गप्पा नेहमी होतात. नंतर नंतर तेच तेच किस्से परत पण...