किस्सा किंगसर्कलचा
⛔ किस्सा किंगसर्कलचा ⛔ . रात्रीचे २ वाजले असतील, टैक्सीने मी आणि माझा मित्र निशांत ऑफिस पार्टी हून किंगसर्कलला आलो खुप दंगा आणि उन्हाळयातली रात्र त्यामुळे घामाघुम.. त्यात मी म्हणजे वातानुकूलित वातावरणातही ही घाम येणारा, पार भीजलेलो घामानी! त्यामुळे त्या गुलाम मधल्या आमिर खान सारखा रुमाल वगैर बांधून होतो, फुल फिल्मी मवाली दिसत असेन ह्यात शंका नाही! निशांत रहायचा बोरीवलीत त्यामुळे म्हणालो रहा रूम वर उद्या जा निवांत! त्याआधी ज़रा गप्पा मारू वगैरे म्हणून किंगसर्कल जिमखन्याच्या आजुबाजुला टाइम पास करत आमच्या गप्पा चाल्लू. ऑफिस मधल्या आणि इतर फालतू बडबड, खिदळणं वगैरे चालू होतं नेहमी प्रमाणे, वेळेचं वगैरेचं भान छ्या छ्या… ते काय असतं, असे ते दिवस! तीतक्यात मागुन एक पोलिसांची बाइक एका बंगल्यापुढे येउन थांबली, मित्र म्हणाला 'समीर भाय, चल घर निकलते है!' मी म्हणालो आपण कुठे काय केलय का पोलिसांना घाबरायला! ५मिनिटांनी ते पोलिस आमच्या जवळ आले. संवाद असा... "काय चाललैय... तुझं नाव काय.. ह्याचं नाव काय..." मी मराठी त्यामुळे उत्तरं मीच पुरवत होतो... पुढचा प्रश्न येत होताच ...