डिट्टो!
माणसाचं असं असावं, जे त्याच्याकडे नाही त्याकडे लक्ष, म्हणजे ज्याचा कडे भरपूर पोट असेल तो सपाट पोटाकडे पाहत राहील, ज्याचं नाक नकटं तो तरतरीत नाकाकडे, माझ्याबाबतीत माझ्या घाऱ्या डोळ्यांकडे पाहून बरेच लोकं 'मला पण आवडले असते असे डोळे मला असते तर' वगैरे म्हणतात. आणि मी त्यांच्या भरघोस केसांकडे पाहून म्हणतो आणि मला तुझ्या/तुमच्या सारखे केस असते तर! असो... तर सलून मध्ये गेल्यावर केस कापायला आलेल्या केशसंपन्न लोकांकडे मी नेहमीच फार हेवायुक्त दृष्टीने पहात बसतो! २-३महिने तरी लागतात मला केस कापवून घेई पर्यंत वाढवायला, मागच्या वेळी अडीच महिन्यांपूर्वी पुण्यात कापलेले केस त्यानंतर आज इथे दुबईत, नेहमीप्रमाणे ३-४लोकं आधीच बसलेले असतात स्कुठल्याही सलून मध्ये जा, पण सुदैवाने आज गर्दी नव्हती अगदी थेट पायलट जाऊन बसतो विमानात तसा थेट जाऊन बसलो, बाजूच्याकडे लक्ष गेलं न उडालोच! McBc डिट्टो कोहली ... काही न विचार करताच त्याला म्हणालो, भाय तू तो सेम कोहली जैसा दिखता है! (हल्ली जी काही टी नवीन स्टॅईल निघाल्ये, भांग पाडतात न एका बाजूचा भाग कमी केसांचा दुसर्या बाजूला केसांचा पुंजका......