Posts

Showing posts with the label marathifood

वाल

Image
आत्ता घरी हातसडीचे पोहे खात असताना एक किस्सा आठवला... आईने सांगितलेला 'वाला' बद्दल एक किस्सा... आम्ही आक्षी गावातून जात होतो, आम्ही म्हणजे मी बायको मुलगी आणि आई, समुद्रावर जाता जाता शेतजमिनी दिसत होत्या, आई आम्हाला सांगत होती... "ह्या ज्या जागा दिसत आहेत ना, त्या आम्ही भाड्याने घ्यायचो, वालाच्या शेतीसाठी." मग मी कुतूहलतेने विचारलं "मग तुम्ही विकायचे का ते!?" तर आईचं उत्तर "नाही रे, घरच्यासाठीच!" हे ऐकून मला काय बोलावं कळेच ना, म्हणजे जागा भाड्याने घेऊन मेहेनत करून पिकवलेले अन्न स्वतः च्या घरापूरते वगैरे! थोडक्यात काय *आता पैसे कमावतात...* *पूर्वी अन्न कमवायचे लोकं* म्हणून अन्नाला *चव* आणि *किंमत* दोन्ही होती! #सशुश्रीके १४/११/२०१७ (वाल*- कोकणात ह्याच वल्याची उसळ खूप प्रसिद्ध आहे) Dalimbi Usal, Val Usal, Maharashtrian Vaal by Tarla Dala - https://www.tarladalal.com/Dalimbi-Usal-Val-Usal-Maharashtrian-Vaal-4379r  

मानाचा मुजरा!

घाण पाऊस होता, दुकानाच्या पायरी वर कसाबसा उभा होतो, हवा तर इतकी होती की पाऊस वरून पडतोय की खालून कळेना, इतका भिजलेलो की विचारू नका, समोर टपरी वर कंदीलातला दिवा जेमतेम दिसत ह...

काही लोकांना शिक्रण आवडते...

🍌 लोकांना काय आवडेल काय नेम नाही, बघा ना काही लोकांना शिक्रण आवडते, काय आहे ना मला एक तर दूध आवडत नाही त्यात केळं तर अजिबात नाही, ह्या दोघांची ती शिक्रण... 😑 आणि "कोकणस्थ असून शिक्रण आवडत नाही असं कसं!" मग माझा प्रतीप्रश्ण... "तुला मटकी उसळ / कारल्याची भाजी / आळूचं फदफदं आवडतं का?" उत्तर हो आलं तर आलिंगन आणि  "नाही" आलं तर "तसच मला शिक्रण नाही आवडत" ... सोपं आहे गणित! 😉 लहानपणी दादा / काका / मामा मंडळी तोंडाने  फुरsssफूरsss  आवाज करत पोळ्यांबरोबर खायचे, त्याने तर अजूनच आवडेनासं झालं ते प्रकरण! त्यात काही लोकं त्यात तूप ओततात... बाबो भलतेच शौकीन चामारी! लिहितानाच कसं तरी होतंय!!! 🙄 शेवटचं एक: आयुर्वेद सांगतं, दुधात फळ 'मिक्स' करू नयेत, कोणीही ऐकत नाही बघा आयुर्वेदाचं पण 😟 #सशुश्रीके २६/०९/२०१७

पान!

Image
पान म्हणालं की कलकत्ता सादा आठवतं, मग मसाला मग मगई... त्यापलीकडे कधी मजल गेली नाही! पण ह्या पाना आधी एक महत्वाचं पान म्हणजे आपलं... केळीचं पान! आठवतं का केळीचं पान, आता त्यावर जेवण मिळवणे म्हणजे जरा "नशीब वान आहेस लेका!" वगैरे म्हणावं लागतं! पारंपरिक गोष्टींचा रितिरिवाजांचा जसा ऱ्हास होत चाललाय, तसाच ह्या पानांवर जेवण केरण्याचा ही, बरोबर आहे म्हणा! आता जागा नसते ना, जिथे जागा असते तिथे भलत्याच गोष्टींनी जागा घेतलेली आहे आज काल! असो... केळीच्या पानावरचे जेवण लहानपणी खूप अनुभवले, त्यावर तरंगणारे पाणी, अगदी बरोब्बर मध्ये असलेल्या लांब देठाचा मोठेपणा! मोठेपणा म्हणजे... त्यामुळेच तर ते पान टिकतं ना, मस्त सांभाळून घेते २ही बाजू, जणू काही पुस्तकाची बांधणीच. खाद्यपरार्थ स्वरूपात मांडलेल्या त्या हिरव्या गडद पाना वरची ज्ञानाची भूक काही औरच! त्या पानावर जेवण असले की त्या गर्द हिरव्या रंगावर जो काही पदार्थ उठून दिसतो, त्याला तोडच नाही... पांढरा शुभ्र भात त्यावरचं नाजूक पिवळं वरण आणि त्याहून नाजूक साजूक तूप! मस्तच कॉन्ट्रास्ट, आजूबाजूला कोशिंबीर, आळूच्या वड्या, चटण्या, बटाटा भ...