फैंटम!
फैंटम हा नवीन बॉलीवुडपट आपटलाय म्हणे! त्याचा ट्रेलरवरूनच तो काही कमाल करू शकणार नाही ह्याबद्दल खात्री होती! असो ह्याच चित्रपटाचा एक 'रिव्यु' (चुकून) पाहिलेला पर्वा... तो रिव्यु बघताना काही क्षणांतच कळालं की एक पाकिस्तानी 'फैंटम' मूवी बद्दल बोलतोय (बडबडतोय)... म्हणाला बलूचिस्तान मध्ये भारतीय(RAW) फुट पाडण्याचे काम कर्तायत म्हणून आम्ही बोटं घालतो सीमारेषेवर, आणि भारत काही करू शकत नाही कारण भारतात 'दम' नाही... आणि बरच काही.. मध्ये मध्ये मी आयएसआय नाही किंवा आर्मीतला किंवा गवर्नमेन्ट मधला नाही हे वारंवार सांगत सुटलाय, म्हणजेच मी जे बोलतोय त्यात तथ्य किती ते तुम्हीच ठरवा असा भाव! बॉलीवुडचे चित्रपट आम्ही पायरेटेडच बघणार... का तर म्हणे आमचा पैसा आम्ही तुम्हाला का देऊ (आवरा) मग मोदींचा एक इंटरव्यू काय दाखवलाय ज्यात ते गुजरात दंगलीबद्दलचा प्रश्न येताच मोदी इंटरव्यू थांबवतात... त्या इंटरव्यूच्या जोरावर तो आपल्यालाच उत्तरं विचारतो म्हणतो, तुम्ही अमच्यावर टेरेरिस्ट बाळगण्याचा आरोप करताय.. स्वतःचा पधानमंत्री टेरेरिस्ट आहे हे तुम्हाला माहित आहे का अस...