Posts

Showing posts with the label rupees

न फिटणारं कर्ज... एक रुपयाचं

स्कूटर होती माझ्याकडे , हवा कमी झालेली , हवा भरली मग घाटाजवळच्या पंचरवाल्याकड़े , सुट्टे नव्हते , म्हणाला नंतर दे...त्यात काय एवढं,  २-३महिन्यानी त्याच रोड वरुन गेलो , आता स्पेंडर होती हातात न कानात हेडफोन , सुट्टे असून पैसे न देता , घाइत होतो , अर्थात दुर्लक्ष करत , मग अनेकदा गेलो त्याच रोड वरून , त्या गोष्टीला आता दीड दशक होईल , अजुन ही जातो आता सैंट्रो असते , कर्ज वाढत चाल्लैय!  तो रुपया अजुन दिलेला नाहिये , २-३ वर्षा पूर्वी मुद्दामून त्या रोड वर जरा स्लो झालो , खंत अजुनही होती मनात , पण दूकान नव्हतं ते , निराश झालो!  वेळ असून वेळ गेलेली , आयुष्यभर सतावणार ती हवा!  अजुन ही जेव्हा जेव्हा तो हवेचा पाइप हातात घेतो , एक रुपया आठवतो तो!  न दिलेला...  एक रुपया  श्या... वेळीच परतफेड करा रे! वाट नका बघू... नाहीतर प्रत्येक पाइचं न फिटणारं कर्ज फेडावं लागतं... ते पण आयुष्यभर! ‪#‎सशुश्रीके‬ | १६ नोव्हेंबर २०१४ । रात्रीचे १.१२