Posts

Showing posts from February, 2016

आबा... सुपेकर आबा

Image
Supekar Aba - All parts (Including the last one The 5th) आबा, सुपेकर आबा (भाग-१) त्यांना 'आबा' म्हणालो कारण त्यांना पाहिले पहिल्यांदा तेव्हा अन्वया (माझी माझी साडे तीन वर्षाची मुलगी) होती कडेवर, मला म्हणाले अरे तुझ्याबद्दल खूप ऐकले आई कडून, आज भेट झाली… आनंद झाला :) ३ महिन्यापुर्वीच आलेत आमच्या '११२ श्रीयोग' मध्ये भाडेकरू म्हणून, घरी मुलगा, मुलगी आणि बायको,  मुळचे परभणीचे! त्यामुळे भाषेला मस्त तिखट फोडणी, मजाच त्यांच्याची गप्पा मारायच्या म्हणजे! जुनी गाणी, हिंदुस्तानी क्लासिकल, अध्यात्म… आणि त्यांच्या तरुणपणाच्या आठवणी… बास! मस्त खरपूस खमंग थालीपीठच जणू हातात आणि साथीला त्यांच्या हावभावांची सोलकढी! त्यांचं बोलून पोट भरायचं नाही आणि माझं ऐकून! मोजून एकवीस दिवस असेन, त्यात मधले २-३ दिवस सोडले तर रोज सकाळी / दुपारी / संध्याकाळी भेट व्हायचीच. ह्या २१ दिवसांत माझा सकाळचा ठरलेला पोग्राम होता ह्यावेळी घरी, आई आणि मी चालायला जायचो आल्यावर मस्त चहा पोहे झाले की हातात लांब हिरवा पाइप घेऊन झाडांना पाणी घालणे, वरच्या मजल्यावरून आबा हाक माराणे, चहा झाला का? विचारणे वगैरे… मग मी

'सुका मेवा'

Image
पंधरा वर्ष झाली असतील... हो आरामात पंधरा वर्ष ! तेव्हा परदेशी 'काका' होते, मस्त पिळदार मिश्या आणि शरीरही, वय साठ असून तरुणाला लाजवेल असे, त्यांनी नक्कीच त्यांची 'जवानी' गाजवली असणार ह्यात वाद नाही! राहायचे.. राहायचे कशाला, अजूनही राहतात, सहकार नगर २ मध्ये, चंद्रकांत गानू. (माझ्या वडलांच्या बालमित्र आनंद गानू ह्यांचे चुलत बंधू) त्यांच्या घरी भाड्याने एका खोलीत राहतात. घरात, घरात म्हणजे त्या एका खोलीत त्यांची बायको, पलंगावरच... म्हणजे त्यांना चालता फिरता यायचं नाही, जे काही करायचं ते सर्व बेड वरच. त्या दोघांना जेव्हा पहिल्यांदा पाहिले तेव्हा लहान होतो... त्यामुळे त्यांच्या ह्या परिस्थितीचा फारसा 'सीरियसनेस' नव्हता. मला ते आठवतात ते त्यांच्या 'सुका मेवा' साठी! मी जेव्हा जेव्हा गानू कुटुंबीयांकडे जायचो, तेव्हा तेव्हा परदेशी काकांच्या दरवाज्या पाशी आलो की, "समीर, ये बेटा..." असा आवाज यायचा, माझे चपला/बूट काढून झाले की पाय थेट त्यांच्या घराच्या फरशीवर, मला बघून 'जिलेबी' मधल्या त्या जाहिरातीतल्या मुलाच्या चेहऱ्यावर जसे हावभाव अ