कहाण्या WW2 च्या
• नाझींनी केलेल्या लाखो लोकांच्या अत्याचारा पैकी ही एक बाई , सुदैवाने वाचलेली, तिचे अनुभव आणि तिच्या मुलांकडून आणि मग नातवंडांकडून तिच्या बद्दल झालेले कौतुक खरच पाहण्यासारखं आहे! एके दिवशी आपल्या मुलाला तिने ही कहाणी सांगितली, 'मला सर्वात छान वाढदिवस भेट काय मिळाली असेल!?' मुलगा सांगत होता, काय असेल नेमकं... एखादा ड्रेस, अमुक तमुक. तर तिने हा किस्सा सांगितला... ती होलोकोस्टच्या एका कैंपात असताना तिची एक मैत्रण दिवसभर गायब होती, त्यावेळी एखादं ओळखीचं असणं म्हणजे फारच दुर्मिळ, आई वडील बहिणी भाऊ सगळे वेगळे झालेले असायचे, असो... दिवसभर गायब असलेल्या आपल्या मैत्रिणीबद्दल तिला काळजी वाटू लागली, आणि त्यावेळी कुठलीही व्यक्ती अशी गायब होणे म्हणजे 'मरणे' असाच अर्थ असायचा, पण ६च्या आसपास ती मैत्रीण भेटली, म्हणाली 'आज लेबर कॅम्प मध्ये जास्त काम केलं, आणि एक जास्तीचा ब्रेड मिळवला, तुझा वाढदिवस होता ना, तुला ब्रेड द्यायचा होता मला...' अस म्हणत तिने ब्रेड हातात दिला माझ्या. हे बघताना ऐकताना खड्डा पडला हो! लोकांना काय काय पाहावं करावं लागतं आयुष्यात, आपण खरच कि