Posts

Showing posts from September, 2017

काही लोकांना शिक्रण आवडते...

🍌 लोकांना काय आवडेल काय नेम नाही, बघा ना काही लोकांना शिक्रण आवडते, काय आहे ना मला एक तर दूध आवडत नाही त्यात केळं तर अजिबात नाही, ह्या दोघांची ती शिक्रण... 😑 आणि "कोकणस्थ असून शिक्रण आवडत नाही असं कसं!" मग माझा प्रतीप्रश्ण... "तुला मटकी उसळ / कारल्याची भाजी / आळूचं फदफदं आवडतं का?" उत्तर हो आलं तर आलिंगन आणि  "नाही" आलं तर "तसच मला शिक्रण नाही आवडत" ... सोपं आहे गणित! 😉 लहानपणी दादा / काका / मामा मंडळी तोंडाने  फुरsssफूरsss  आवाज करत पोळ्यांबरोबर खायचे, त्याने तर अजूनच आवडेनासं झालं ते प्रकरण! त्यात काही लोकं त्यात तूप ओततात... बाबो भलतेच शौकीन चामारी! लिहितानाच कसं तरी होतंय!!! 🙄 शेवटचं एक: आयुर्वेद सांगतं, दुधात फळ 'मिक्स' करू नयेत, कोणीही ऐकत नाही बघा आयुर्वेदाचं पण 😟 #सशुश्रीके २६/०९/२०१७

कोथरूडचा व्हाइट वॉकर... निपुण धर्माधिकारी.

Image
निपुण एक कोडं होतं आता ते पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही जोक्स अपार्ट... पण ह्या लहान मूर्तीला मी लहान असल्यापासून ओळखतो. (तो आणि मी दोन्ही बद्दल बोललोय, माझं सोडा तो नक्कीच मोठा झालाय 😂 ) परवाच त्याचा टेड एक्स बीएमसीसी टॉक पाहिला, मी जोक्स अपार्ट असं का म्हणालो ते कदाचित तुम्हाला टेडएक्स चा विडिओ पाहिल्यावर कळेल. असो... युट्युबची लिंक जेव्हा पाठवली त्याने तेव्हा नेमका घरी किंवा ऑफिस मध्ये नव्हतो, त्यात ही मूर्ती विडीओत इंग्लिश मध्ये बोलत होती, जवळ हेडफोन नव्हते. काय कशाबद्दल बोललाय, स्टँडअप कॉमेडी वर बोलतोय की तसच काही अशी उत्सुकता होती, कारण हा माणूस जेव्हा पासून वेबविश्वात आलाय तेव्हापासून एक नवीन मराठी विनोदलाट घेऊन आलाय, पण बघतो तर काय... व्हीडिओ वॉज ऑल अबाऊट सिरीयस टॉपिक कॉल्ड 'स्ट्रगल'... अवघड शब्दात सांगायचं झालं तर 'संघर्ष' ... जो आपण रोज कधी ना कधी थोड्या फार प्रमाणात करत असतो, बोललाय ह्यावर जवळपास १५-२०मिनिटं . चला तर माझ्या काही आठवणी ह्या 'कोड्या'बद्दल... आम्ही मुंबईतून पुण्यात आलो ९२-९३साली रहायला मॉडेल कॉलोनी मध

माझ्यातला ड्रायव्हर...

सध्या माझ्या कर्मभूमीत सगळीकडे नवीन पाईपलाईन, नवीन ब्रिजेस वगैरेसाठी खोदकाम वगैरे चालू आहे काही लेन्स बंद, काही रस्ते बंद, ह्या सर्व कारणांमुळे प्रचंड ट्राफिक वाढलं आहे, आणि त्यात कोणी अती फास्ट कोणी अती स्लो चालवलं की डोकं फिरतं 😠  (म्हणजे फिरायचं... आता नाही फिरत 😁 का ते सांगतो!) अश्या खूप प्रसंगानंतर ही मी शांत... डोक्यावर बर्फ़ाची लादी ठेऊन वाहन चालवतो जणू! 😇 असो, वर्तमानात येतो... सिग्नल सुटला, ३लेन मध्ये सर्वात शेवटच्या लेन मध्ये मी आणि माझ्या समोर ५लोकांनी भरलेली... मागची बाजू ३जणांच्या वजनाने टेकून पुढची बाजू वरच्या दिशेला गेलेली एक ९०ज वाली डार्क रेड सदान. अगदी हमरस्ता येई पर्यंत इंडिकेटर देऊन ही पाहिजे त्या दिशेला वळे ना 😐 अर्थात माझा वेग कमी झाला आणि इतका जवळ गेलो की मला त्याला ओव्हरटेक ही करता येईना, डोळे 🙄 असे होणार तितक्यात बायकोचा हात हॉर्न वर गेला...मी तिला प्रेम+राग अश्या विचित्र नजरेने पाहिलं! ती म्हणते "अरे मग काय... हलतच नाहीये तो!..." मी मनातल्या मनात म्हणालो 'काय उपयोग नाही अश्या लोकांना अजून घाबरायला होतं!' माझ्यातला ड्रायव्हर जिवंत आह