काही लोकांना शिक्रण आवडते...

🍌 लोकांना काय आवडेल काय नेम नाही, बघा ना काही लोकांना शिक्रण आवडते, काय आहे ना मला एक तर दूध आवडत नाही त्यात केळं तर अजिबात नाही, ह्या दोघांची ती शिक्रण... 😑

आणि "कोकणस्थ असून शिक्रण आवडत नाही असं कसं!"

मग माझा प्रतीप्रश्ण... "तुला मटकी उसळ / कारल्याची भाजी / आळूचं फदफदं आवडतं का?" उत्तर हो आलं तर आलिंगन आणि  "नाही" आलं तर "तसच मला शिक्रण नाही आवडत" ... सोपं आहे गणित! 😉

लहानपणी दादा / काका / मामा मंडळी तोंडाने  फुरsssफूरsss  आवाज करत पोळ्यांबरोबर खायचे, त्याने तर अजूनच आवडेनासं झालं ते प्रकरण! त्यात काही लोकं त्यात तूप ओततात... बाबो भलतेच शौकीन चामारी! लिहितानाच कसं तरी होतंय!!! 🙄


शेवटचं एक: आयुर्वेद सांगतं, दुधात फळ 'मिक्स' करू नयेत, कोणीही ऐकत नाही बघा आयुर्वेदाचं पण 😟


#सशुश्रीके २६/०९/२०१७



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...