मानाचा मुजरा!
घाण पाऊस होता, दुकानाच्या पायरी वर कसाबसा उभा होतो, हवा तर इतकी होती की पाऊस वरून पडतोय की खालून कळेना, इतका भिजलेलो की विचारू नका, समोर टपरी वर कंदीलातला दिवा जेमतेम दिसत होता, डोळ्यांच्या झापडांचा वापर जणू गाडीच्या काचेवरच्या व्हायपर सारखा झालेला.. २-३दा उघड झाप केल्याशिवाय काहीच धड दिसत नव्हतं, त्यात गडगडाट... हे सगळं होत असताना पोटातून ही तोच प्रकार! प्रचंड गडगडाट आणि छोट्या स्वयंपाक घरात मांजरीची भांडणं झाल्यावर त्यांच्या आवाजाबरोबर भांडी जशी आपली जागा सोडतात आणि जो काही आवाज येतो तसं फ्युजन आणि हे सर्व डॉल्बी लेव्हलला, एरवी न ऐकता येणारे लांबचे कुठले तरी आवाज पण ह्या धो धो पावासात ऐकू येत होते, कारण आभाळाबरोबर कान ही फाटलेला, ते आपलं मोठा 'आ...आ' करून कानाचे पडदे मोकळे करायचा प्रयत्न अखंड चालू होता. 😣 तितक्यात एक यामाहा RX100 थांबली, म्हणजे तीच असावी, कारण त्या बाईकचा आवाज अफाट युनिक आहे, पाऊस अजून ही त्याच जोमात कोसळत होता... टायरला आणि टेकलेल्या पायांना टशन देत पाणी मात्र रस्त्यावरून वाहात होतच, तरी तो इसम माझ्याकडे पाहात मला काहीतरी सांगत होता, खुणावत होता, २०-२५ फुट