Posts

Showing posts from September, 2018

लघुव्यथा

Image
बॉर्डर पार करून आम्ही आता हवे तिथे नको त्यावेळी आलेलो, गोळ्या संपत चालल्या असतानाही रिस्क घेऊन आणि नशीबाला बोलवत, आयुष्यात कमावलेली सर्व हिम्मत हातात गोळा करून मी पुढे लोळत लोळत सरकत होतो, आजूबाजूला शत्रू कुठूनही मला टिपू शकतो आणि मी त्यांना...   अंधार, शेत त्यात अमावस्या, रातकिडे, बेडकं, पाऊस चिखल आणि काळेभोर आकाश ह्यासर्वात एक धपाटा बसला माझी तंद्री लागलेली बहुतेक... आईचा आवाज पाठीमागून, अरे बसलायस काय नुसता ताटातले संपव, परत काही हवं असेल तर सांग मी अंगणात तांदूळ निवडायला जात आहे... ताट पाहिलं तर पूर्ण संपलेलं, प्रचंड झोप येत होती. आयुष्यात पहिल्यांदाच भर दुपारी मस्त पडी मारली. अचानक भूकंप आल्यासारखं वाटलं... घाबरायच्या ऐवजी 'काय कटकट आहे' असा विचार करत करत... आता मात्र फटाक्यांच्या आवाजाने जाग आली... "दुपारी कसले फटाके!" प्रयन्त केला डोळे उघडण्याचा... सर्व आवाज बंद झाले... आवाज येत होता तो आमच्या रेजिमेंट प्रमुख साहेबांचा,  माझ्यानावाने भाषण देत होते... मग लक्षात आलं एम नो मोर. जय हिंद. #सशुश्रीके 

"अरे दुष्काळ पडला आहे भाषण काय देतोस तांदूळ दे"

Image
भारतात न राहता तू का बडबड / पोस्ट करतोस *पेट्रोल* दरवाढी बद्दल असा प्रश्न विचारला एका मित्राने आणि पुलंचा एक संवाद ही चिकटवला... अंतू बर्वा म्हणाला ... "अरे दुष्काळ पडला आहे भाषण काय देतोस तांदूळ दे" तसच "अरे जुन्या सरकार ने काय केले ते काय सांगतोस पेट्रोल स्वस्त कर." हे पटलं ही! 😁 शेवटी सामान्य माणसाला जो फटका बसतो तो कोणाला नाही. आणि भारतात राहून तो हे बोलत आहे, त्यामुळं त्याला जे वाटत आहे त्याबद्दल मी काहीही बोलणे चुकिचेच, ही गोष्ट वेगळी की आता कित्येक वर्षे दुबईत दिरहाम १.२ ते १.४ असलेले पेट्रोल गेले काही महिन्यातच महाग होत होत आता दिरहम२.४८ ला आलेले आहे. म्हणे जागतिक बाजारपेठे नुसार रोज कमी जास्त होत राहणार, स्थिर राहणार नाही आकडा, पण हा आकडा वाढत जात आहे हे नक्की. बॅरल रेट $१५० चा $७५ वगैरे झाला असेल तरी. असो ... सध्या पेट्रोल दरवाढ का थांबत नाही किंवा स्वस्त का होत नाही ह्यावर मोर्चे संप बाचाबाची ओढाताण मतभेद सगळं होत आहे, अमुक अमुक देशात स्वस्त आहे, आपल्याकडे का नाही? सरकार ने दिलेल्या अश्वसनाचे काय झाले! • लग्ना आधी तुमच्या मुलीला सर्व सुख-

गेले ते दिवस.. राहिल्या त्या शिव्या! 😋

मॅच मध्ये रनौट व्हायचे किस्से सांगत होते मित्र एकमेकांना तेव्हा आठवलं 😆 मॅच असताना रन्स काढताना काय धडधडायचं छातीत! फुफ्फुस बाहेर येईल आणि शांत हो म्हणेल असं वाटायचं चायला... भलतच थ्रिल होतं ते! आणि धावून श्वास घेई पर्यंत तो मरतुकडा पण लै फास्ट बॉलर दुसरा बॉल घेऊन धावत येताना दिसायचा, तेव्हा पळून जावसं वाटायचं अक्षरशः 😣 एकदा गोट्यांवर फुलटॉस आलेला... थेट गेलो टीचर्स रूम मध्ये ... असला आडवा झालो विव्हळत ... तेव्हा तो सिलिंग वरचा पंखा हेलिकॉप्टर च्या पंख्यासारखा वाटत होता! फिल्डिंग च्या वेळी तर हातात बॉल आणि बळ दोन्ही आलं तर ठीक नाही तर ह्या शिव्या! गेले ते दिवस.. राहिल्या त्या शिव्या! 😋   #सशुश्रीके ०९.०९.२०१८