लघुव्यथा
बॉर्डर पार करून आम्ही आता हवे तिथे नको त्यावेळी आलेलो, गोळ्या संपत चालल्या असतानाही रिस्क घेऊन आणि नशीबाला बोलवत, आयुष्यात कमावलेली सर्व हिम्मत हातात गोळा करून मी पुढे लोळत लोळत सरकत होतो, आजूबाजूला शत्रू कुठूनही मला टिपू शकतो आणि मी त्यांना...
अंधार, शेत त्यात अमावस्या, रातकिडे, बेडकं, पाऊस चिखल आणि काळेभोर आकाश ह्यासर्वात एक धपाटा बसला माझी तंद्री लागलेली बहुतेक...
आईचा आवाज पाठीमागून, अरे बसलायस काय नुसता ताटातले संपव, परत काही हवं असेल तर सांग मी अंगणात तांदूळ निवडायला जात आहे... ताट पाहिलं तर पूर्ण संपलेलं, प्रचंड झोप येत होती. आयुष्यात पहिल्यांदाच भर दुपारी मस्त पडी मारली. अचानक भूकंप आल्यासारखं वाटलं... घाबरायच्या ऐवजी 'काय कटकट आहे' असा विचार करत करत... आता मात्र फटाक्यांच्या आवाजाने जाग आली... "दुपारी कसले फटाके!"
प्रयन्त केला डोळे उघडण्याचा... सर्व आवाज बंद झाले... आवाज येत होता तो आमच्या रेजिमेंट प्रमुख साहेबांचा, माझ्यानावाने भाषण देत होते... मग लक्षात आलं एम नो मोर.
जय हिंद.
#सशुश्रीके
Comments
Post a Comment