Posts

Showing posts from 2019

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

Image
बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं! काय आहे ना झोप नसेल येत की मी जुन्या फोल्डर्स मध्ये घुसतो.. आणि मग सब फोल्डर्स बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!... म्हणजे जास्त शोधाशोध न करता, त्यात मुंबई-अलिबाग-आक्षी... अशी फोल्डर्स तर खचून भरलेली, उघडलं की जणू आतमध्ये स्प्रिंगांनी फेकल्यासारखी, उसळून थोबाडावर आपटतात, कधी जळमटं किंवा गंज चढलाच नाही, चकाचक अजूनही... 'वेल मेन्टेड यु नो!' काय काय आहे त्यात, दणकट झोपाळा... २-३ म्हशी आहेत आहेत काही रेडिओ काही छोटे काही मोठे टीव्ही बेहिशोबी पेन्सिल सेल्स...  काही नाणी मातीत लपवलेली, काही सायकली - काही मित्रांच्या काही माझ्या गोळ्या लिमलेटच्या, काही कॉफी बायटा काही मेलड्या खूप सारे पेप्सीकोले... ग्लास च्या ग्लास आरींज - काला खट्टे तुटलेल्या स्लिपरा, फाटलेले बूट पिवळे झालेले आणि आंब्यांचा वास (सुवास) असलेले बनियन्स फुटलेले ढोपर, खरचटलेले कोपरे... थंड पाण्याने भरलेल्या, विहिरीतून खेचलेल्या कष्टी बादल्या... शेवाळ्यातून कधी चुकून कधी जाणूनबुजून झालेली धड्पड छोट्या हौदात मारलेले मोठे सूर! पायऱ्यां

Father's day

Image
Father's day होता म्हणे काल, काय आहे ना... माझ्यासाठी जवळपास रोजचं आहे हे, आजूबाजूला इतक्या वस्तू आहेत, मनात आठवणी इतक्या आहेत... त्यात तो गाड्यांचा / छायाचित्र काढायचा छंद! अगदी पदोपदी आहेत बाबा माझ्याबरोबर... कळत नकळत अखंड बाबांच्या आजूबाजूलाच असतो मी, काल नेमका हा जागतिक दिवस असताना बाबांबद्दल काही लिहिलं नाही ह्याची रुखरुख नको म्हणून लिहितोय आता. जे आहे ते आहे.. विसरलो! त्यात मॅच होती... हो हो मॅच च्या पण आठवणी आहेत. काय लिहू काय नको असं झालय आता. असो... बाबा सगळ्यांनाच असतात, कोणी जवळ असतात कोणी लांब असतात, शेवटी बाबा ते बाबाच... आपण लहान असतानाचे बाबा आणि मोठेपणातल्या बाबांचा आपला प्रवास कसा घडतो ह्याबद्दल विचार केला की प्ले बटण आणि पुढे सरकणारी कैसेट आठवते... ती A साईड आणि मग B साईड! काय तुम्ही समजायचात त्यांना आणि काय त्यांचा मनात असेल, हे सगळं आता बाप झाल्यावर कळतं, कैसेट संपल्यावर! 😢 आणि ती कैसेट परत ऐकायची असेल तर इजेक्ट नावचं बटण देवाने काढून घेतलेलं असतं, आली का पंचाईत! 😤मग काय करा रिवाईंड... ऐका ती साईड B! द रिअल साईड ऑफ लाईफ. रट्टा मारून डोळ्यातून पाणी काढणारे

निवांत गरीब स्वच्छ जॉर्जिया

Image
निवांत गरीब स्वच्छ जॉर्जिया - भाग १ माझ्या बाबतीत सिनेमा नाटक असो किंवा कुठला काँसर्ट... तिकिटं घ्यायची आणि प्रत्यक्षात टायटल / सुरुवात आल्याशिवाय जे तिकीट घेतलय त्या इव्हेन्टचा विचारच करायचा नाही, कारण काय!? वेळच नाही... असं काहीसं ह्या जॉर्जिया ट्रिप बद्दल पण घडलं. बायकोने अचानक मित्रांशी बोलता बोलता ईद सुट्ट्यांना दर वर्षी प्रमाणे दुबईतच बसण्या पेक्षा कुठेतरी जाऊ ह्यावर चर्चा झाली आणि मी आणि नीलम सुरश्री पण "हो हो जाऊ की" चा 'मिले सूर मेरा तुम्हारा' सारखं केलं न लगेच आणि बघता बघता जॉर्जियाचा प्लान झाला पण... तिकिटं, रहायचे प्लॅनिंग... कुठे फिरायचं काय बघायचं सगळं काही बायको न सुरश्री नीलम ने ठरवलं, मी आपला हं हं करत संभाषण / काहीही निर्णय घ्यायचे टाळत होतो... आणि मग तो दिवस आला! आता उद्या जायचं आहे, मला कधीची फ्लाइट आहे हे पण माहीत नव्हतं, लाज वाटली म्हणून गूगल वर 'माय नेक्स्ट फ्लाइट' असे शोधले तेव्हा कळलं सकाळी ९:५०ला उड्डाण आहे आणि त्यासाठी लवकर उठून शार्जाला निघायचं आहे, ह्या विचाराने झोप येईना, मग काय सकाळी उठायच्या वेळेला झोपायची स्वप्न