निवांत गरीब स्वच्छ जॉर्जिया
निवांत गरीब स्वच्छ जॉर्जिया - भाग १
माझ्या बाबतीत सिनेमा नाटक असो किंवा कुठला काँसर्ट... तिकिटं घ्यायची आणि प्रत्यक्षात टायटल / सुरुवात आल्याशिवाय जे तिकीट घेतलय त्या इव्हेन्टचा विचारच करायचा नाही, कारण काय!? वेळच नाही... असं काहीसं ह्या जॉर्जिया ट्रिप बद्दल पण घडलं.
बायकोने अचानक मित्रांशी बोलता बोलता ईद सुट्ट्यांना दर वर्षी प्रमाणे दुबईतच बसण्या पेक्षा कुठेतरी जाऊ ह्यावर चर्चा झाली आणि मी आणि नीलम सुरश्री पण "हो हो जाऊ की" चा 'मिले सूर मेरा तुम्हारा' सारखं केलं न लगेच आणि बघता बघता जॉर्जियाचा प्लान झाला पण...
तिकिटं, रहायचे प्लॅनिंग... कुठे फिरायचं काय बघायचं सगळं काही बायको न सुरश्री नीलम ने ठरवलं, मी आपला हं हं करत संभाषण / काहीही निर्णय घ्यायचे टाळत होतो... आणि मग तो दिवस आला!
आता उद्या जायचं आहे, मला कधीची फ्लाइट आहे हे पण माहीत नव्हतं, लाज वाटली म्हणून गूगल वर 'माय नेक्स्ट फ्लाइट' असे शोधले तेव्हा कळलं सकाळी ९:५०ला उड्डाण आहे आणि त्यासाठी लवकर उठून शार्जाला निघायचं आहे, ह्या विचाराने झोप येईना, मग काय सकाळी उठायच्या वेळेला झोपायची स्वप्न पडायला लागलेली, असो तर रडरड करत कसं बसं आवरलं, त्यात अन्वया.. माझी ती ६वर्षाची छकुली मात्र प्रचंड उत्साहात! माझं टेंशन आणि तिचा आनंद गगनात मावेना 藍
असो टॅक्सी मागवली अमृताने ती गेली अन्वयाच्या शाळेपाशी, त्यामुळे चिडचिड... मग काय खाली उतरलो आणि रस्त्यावरच्या मिळालेल्या टॅक्सीने शार्जा विमानतळावर वेळेत पोचलो खरा पण तो टॅक्सी चालक रापारप जोरात गाडी चालवत असल्याने मी खुश पण अमृता आणि अन्वयाची तंतरलेली, काही विचारू नका... मग ह्यासर्वांमुळे अमृताला 'कसं तरी होतंय' हे सुरू, हे असं का होतंय हे अन्वयाला समजावण्यात माझी चिडचिड, सुदैवाने नीलम सुरश्री आले १०मिनीटांनी आणि मग ही चिडचिड शिथिल झाली, पुढे नेहमी प्रमाणे इमिग्रेशन बॅग चेकिंग हे सगळे सोपस्कार विना अडथळे पार पडले! नशिब
विमानात बसलो, छान झाला प्रवास त्यात नीलम म्हणाला की विमान वेळेच्या अगदी १०मिनिटे आधीच पोचले आहे, उतरायला ही उशीर नाही झाला...आणि अक्षरशः पुण्यातल्या विमानतळावर जसा निवांतपणा असतो तसा काहीसा निवांतपणा इथे जॉर्जियाच्या टिब्लिसि विमानतळावर दिसला
पण...
पण इमिग्रेशन काउंटर वर सर्व बायकाच होत्या, गर्द निळा पोशाख आणि खांद्यावर वयानुसार / अनुभवा नुसार तारे असलेल्या... सगळ्या ३०-४०शीतल्या, काहींच्या खांद्यावर ६स्टार्स तर काहींच्या ४ / २ काहीना तर एक पण स्टार नव्हते, जेव्हढे स्टार जास्त तेव्हढे चेहऱ्यावरचे गांभीर्य जास्त असं गणित होतं, आम्हाला ४स्टार वाली बाई लाभलेली, पुढचं सांगायला नको. हे सगळं झालं आम्ही एक्सिट गेट पाशी आलो, हॉटेलच्या नावाची पाटी वाला एक तरुण उभा होता त्याने नीलमचं नाव घेत आम्हाला सांगायला लागला की काय व्यवस्था आहे, सिम इथे घ्या नसेल सोय तर, कुठलं घ्या / का घ्या वगैरे... आमच्या बरोबर आलेल्या इतर लोकांना बस ने पण आम्हाला कारने जायची सोय आहे असं सांगून तो इतर पर्यटकांना शोधण्यात मश्गुल झाला.
जारावेळानी आम्ही मुख्य रस्त्यावर पीक अप पॉईंटला येऊन थांबलो, माफिया लोक्स जसे एक हात बाहेर ठेऊन, तोंडात अखंड सिगारेट अडकवून... दुसरा हात स्टेरिंग च्या अगदी वरती मधोमध ठेऊन जशी गाडी चालवतात, तशी मंडळी आम्हाला टॅक्सी आणि इतर गाड्यांमधून जाताना दिसत होती, पोलीस त्यांच्या गाडीत अगदी समोरच होते जणू काही राडा झालाच की सुरू ऍक्शन! असा फिल्मी सीनच डोळ्यासमोर येत होता.
काही वेळातच डब्लूडब्लूएफ मधल्या हिटमॅन आणि शॉन मायकलचं कॉम्बिनेशन असलेला आमचा ड्रायव्हर / गाईड आला... मी पुढे बसलो. नीलम, सुरश्री अमृता आणि छोटी अन्वया सुरश्रीच्या मांडीवर, आमच्या ब्यागा सगळ्यात मागे आणि आम्ही सगळे हॉटेलच्या दिशेने... एअरपोर्ट च्या रोडचं रुंदीकरणाचं काम त्यामुळे जरा ट्राफिक आहे असं त्या गाईडने सांगीतलं, मग त्याला नाव विचारलं, मला म्हणाला की जोर्जियन पद्धतीनं अमुकअमुक नाव आहे आणि इंग्रजीत हरक्युलस म्हणतात, मी म्हणालो 'हो का वाह वाह माझी ह्या नावाची सायकल होती', मागून लगेच सुरश्रीपण, 'हो हो माझी पण ह्याच नावाची सायकल होती' हे असलं बेसिक निम विनोदी जोक मारत आमचा प्रवास सुरू झाला... आणि माझी नजर जुन्या रशियन गाड्यांकडे केंद्रित व्हायला लागली, मनात विचार आला की आता ही संधी पुढच्या ३दिवसात रोज येईलच त्यामुळे आता फोटो काढण्यासाठी मोबाईल घेऊ नयेच! हा विचार आणि आळस ह्याचं भलतच कॉम्बिनेशन मी हॉटेल येई पर्यंत पाळलं! पण ते हॉटेल निघालं चुकीचं, ब्रिज नावाच्या हॉटेल ला आलो आणि ते निघालं नेमकं ज्यात आमचं बुकिंग नव्हतं, हरक्युलस ने माफी मागितली... हसत खेळत परत ब्रिज हॉटेलचा मॅप टाकत स्वारी निघाली, आता तो आम्हाला टिब्लिसि शहर, जॉर्जिया देश बद्दल थोडी कल्पना द्यायला लागला, आम्हाला कळालं की आपण चुकून भलतीकडेच गेलेलो आणि जिथून गेलेलो त्याच्या वाटेतच हॉटेल ब्रिज होतं!
ह्या सर्व प्रकरणात काहीतरी विषय आपल्या बाजूनेही काढावा म्हणून हरक्युलसला म्हणालो की माझा एक पोलिश मित्र आहे तो आलेला इथे ४दिवस राहून गेला म्हणाला मजा आली खूप पण काही आठवत नाही, तर हर्क्युलस ने विचारलं का असं? मी म्हणालो तो 'स्टोन्ड' होता चारही दिवस, त्याला कळलं नाही मला काय म्हणायचं आहे, मग त्याला सांगितलं की आमली पेयांच्या नादात त्याला काही आठवत नसेल, हे ऐकून हसला आणि हळूच म्हणाला अजून ही काही कारणं असू शकतील, सांगतो नंतर!
#सशुश्रीके | ९ जून २०१९
-------- -------- -------- -------- -------- -------- -------- -------- -------- -------- -------- --------
निवांत गरीब स्वच्छ जॉर्जिया - भाग २
सहजा सहजी हॉटेल मध्ये
पोचण्याचे भाग्य नव्हते ते ठीक, खूप पुढे आलोय आपण आणि आता मागे जातोय हे
कळून चुकलं... जाताना ट्राफिक लागलं... आम्ही ज्या दिशेने जात होतो तिथे
ट्राफिक, पालिकडून फारच तुरळक 🙄 त्यात हर्क्युलस म्हणाला बघताय ना पलीकडे
ट्राफिक कमी आहे, हे अस का बोलला ह्याची प्रचीती काही वेळानी आली, दोन
रस्त्यांमध्ये डिवाईडर नसून ही यु टर्न साठी हर्क्युलस २-३ किलोमीटर
लाइनमध्ये होता! हेच जर आपण भारतात असतो तर आरामात ती पांढरी लाईन ओलांडून
यु टर्न मारला असता! हे पाहून थक्क झालो मी... हर्क्युलस काय तर सगळेच तो
रूल पाळताना दिसले.. 👌🏽 मी म्हणालो ... मानला बुआ ह्यांना! जो रूल पाळतो
त्याबद्दल आदार वाढतोच... आणि हा तर देश आहे, नंतर असं ही कळलं की लाच
देणाऱ्याला किमान ५ वर्ष आणि घेणाऱ्याला किमान १५ वर्षे शिक्षा आहे,
त्यामुळे ०% रेट आहे म्हणे भ्रष्टाचाराचा. असो...
अश्या गप्पा गोष्टी चघळत/गिळत शेवटी आम्ही आमच्या खऱ्या हॉटेलला पोहोचलो, मस्त ५ माजली बुटीक हॉटेल, हर्क्युलसने विचारलं की तुम्ही फ्रेश होऊन या मी थांबतो तुमच्यासाठी, आमचा प्लान ऍक्च्युअली वेगळा होता, म्हणजे आम्हाला ते गाईड आणि त्याबरोबर सिटी टूर वगैरे करायचं टाळायचं होतं, पण टॅक्सित शीरतानाच हर्क्युलसने हवामान दाखवलं गाडीतल्या डॅशबोर्ड मधून - ३९ होतं तापमान - त्यात इथे कोणाला इंग्लिश विशेष येत नाही - त्यात आम्ही ३तासाची फ्लाइट करून आलेलो! - कोण चालणार मग भर दुपारी! त्यामुळे त्यालाच सिटी टूर दाखवण्यासाठी सांगितले. जे पॅकेज टूर मध्ये इन्क्लुडेड होते.
१२:३० च्या आसपास पोचलेलो विमानतळावर आम्ही पण हॉटेल मध्ये पोचायला २:४५ झालेले, मग ३:३० ची वेळ देऊन मी एकटा साधारण ३:४५ ला रिसेप्शन एरियात मोबाईल वर टाइमपास करणाऱ्या हर्क्युलसपाशी गेलो, अजून ही बाकीची मंडळी खाली येत होती म्हणून त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली, माझे बेसिक प्रश्न सुरु झाले... तुझं हे मेन काम आहे की अजून ही काही करतोस, किती वर्ष करतोस वगैरे प्रश्न सुरु, तर म्हणाला गेले अडीच वर्ष करतोय हे, ह्या वर्षी जरा जोमाने करतोय, पैसे जमावायचेत खूप! मी जरा प्रश्नचिन्ह ओतलं, त्याने त्या प्रश्नचिन्हावर गुलाबी पडदा टाकला! म्हणाला, मला माझया गर्लफ्रेंड ला भेटायला जायचंय जर्मेनीत, ऐकून भारीच वाटलं, तरुणपणी ही जी काय ओढ असते गर्लफ्रेंड / पैसे मज्जा उत्सुकता सगळी गुलाबी खिचडी आठवली एका त्या उत्तराने. तेव्हड्यात आमची मंडळी आली सगळी... आम्ही सगळे बसलो एक एक करत गाडीत आणि सुरु झाली आमची सिटी टूर! वेलकम टू टीब्लिसी!

#सशुश्रीके | १० जून २०१९
-------- --------
निवांत गरीब स्वच्छ जॉर्जिया - भाग ३सिटी टूर साठी गाडीत जसे आलो होतो तसेच बसलो मी पुढे बाकी मागे, बाकी हॉटेलचा रस्ता इतका लहान की वळताना कोणी समोरून आलं की कसरतच, नशीब फार आत नव्हतं हॉटेल! एक गल्ली ओलांडताच मुख्य रस्ता मग परत तो 'यु टर्न' वाला रोड दिसला मात्र ह्यावेळी मारावा लागला नाही, कारण आम्ही होतोच विरुद्ध दिशेला.
आणि हो एक सांगायचं राहीलच... एअरपोर्टहून येतानाच सगळ्यांच्या पोटात भूकेचे कावळे बोंबलायला लागलेले त्यामुळे हरक्युलसला बजावण्यात आलेले की आधी हॉटेलात ने नंतर सिटी टूर! मग काय गाडीतून उतरल्या उतरल्या हॉटेल साठी आमची पायतोड सुरू झाली, वाटेतच चौकात एक भिंतीचा तुकडा लावलेला होता त्याच्याकडे बोट दाखवत हरक्युलस म्हणाला, की ही भिंत आम्हाला जर्मनीने शांततीचे प्रतीक म्हणून भेट दिलेली आहे मागच्याच वर्षी... तुम्ही पाहिजे तर इथे फोटो काढू शकता! मनातल्या मनात मी हसायला लागलो... फोटो काढणार नाही असं होईल का!? पण प्रामाणिक पणे सांगायला झालं तर खरच विसरलो होतो फोटो काढायला, मग काय मोबाईल कॅमेरा जो काय चिकटला मग पुढचे ३ही दिवस! विचारुच नका... १२००+ छाया/चित्रफीतींची जवळपास २५/२६जीबी मेमरी लागली हो ह्या जॉर्जियाच्या सौंदर्यापाई! असो...
त्या जर्मन वॉल च्या पुढेच काही मिनिटांवर एक जिना दिसला जो दुसऱ्या गल्लीत जात होता तो पार करत आम्ही एका हॉटेलात शिरलो (फोटो ओततो म्हणजे कळेल अजून), वतावरण मस्त असल्याने आम्ही टेरेस वर जाऊन बसणेच पसंत केलं, जिन्यात मस्त जुन्या गोष्टींचा खजिना मांडला होता म्हणजे.. जुनी कार्पेटस, फोन्स, रेडिओ इत्यादी गोष्टी... छान मस्त टेबल मिळालं, सौम्य पॉप संगीत चालू होतं, आल्या आल्या हरक्युलसने त्याच्या भाषेत वेटरना सांगितलं की आम्ही व्हेज आहोत आणि मग आम्हाला एक एक डीशचे नाव सांगत काय विशेष आहे त्यात...काय घ्यावं आम्ही, असे सर्व समजून सांगायला लागला, वाईन कुठल्या प्रकारची आवडते, मुली वाईन नाही तर काय पिणार... मग त्याने स्वतःसाठी एक हिरवं ड्रिंकही मागवलं आणि सर्व टेबल वर आल्यावर आम्ही जो काय ताव मारलाय! त्यात अन्वयाचा पिझ्झा... तो पाहिल्यावर ती खुश, त्यामुळे आम्ही खुश!
जोर्जियन जेवण कसे आहे, आणि प्रसिद्ध काय आहे ह्याची कल्पना युट्युब व्हिडीओज मुळे आलेली, पण आता प्रत्यक्षात अनुभवायचे सुख लाभणार होते... वांग्याच्या सालींमध्ये अक्रोडची पेस्ट असं काही तरी होतं एक! बद्रीजानी म्हणतात म्हणे ह्या डीश ला... कमाल केवळ कमाल... ते संपण्याच्या आधीच मी माझा एक निर्णय ठोकून दिला... रिपीट पायजेल हे!
मग तो एक पिझ्झा पण मागवलेलाना अन्वयासाठी खास, आधीच मोझेरेला टाइप चीज होतं + त्यावर अजून एक चीज ची लादी! मला ते बघवेना आणि खावे पण ना... हरक्युलस म्हणाला हे ट्राय कर की... म्हणालो जिम ला जावं लागेल! जे आज जमणार नाहीये 🤣 उगाच आपलं जसं कीय मी रोज जिमला जातो असा आव आणला मी! मग हळूच पोटावर हात फिरवला... वाढता वाढता वाढे, भेदीले शून्य मंडळा प्रकार झालाय साध्य!
३रा प्रकार होता मोमोज सारखा, इन्टरनेट माहिती नुसार 'मीट'चे असतात ते लै भारी लागतात म्हणे, खिंकाली म्हणतात, त्यात रस असतो.. ते मोदकासारखे दिसणारे जॉर्जियन मोमोज हातानेच खावे लागतात आणि आंबा चोखून रस कसा खेचतो आपण तसं ते... असो पण आम्ही शाकाहारी... शाकाहारी मध्ये २पर्याय एक तर चीज नाहीतर मश्रुम, नीलम ला मश्रुम आवडत नाहीत त्यामुळे उरलेला एकच पर्याय चीजचे मागवले मग, मला आवडले... मी पूर्ण खाल्ले! एक मात्र विसरलो, युट्युब वरती एकाने सांगितलेले की पूर्ण खाऊ नयेत ते, वरचा भाग फेकून द्यावा कारण ते पचायला जड असतात आणि असंही एक कारण की म्हणे जर ते खाल्ले तर ते नियमांच्या पलीकडले त्यामुळे तुम्ही जणू काही गुन्हा करताय किंवा अपमान असं सगळं, हरक्युलसने बोलता बोलता सहजच तो त्या 'खिंकाली'चा वरचा भाग खाऊ नये असं सांगितलं, न मला तो युट्युब वाला व्हीडिओ आठवला आणि त्याला म्हणालो की तू संगतोयस ते मला माहीत आहे पण नेमका आत्ता विसरलो हे नियम!
आता वाईन बद्दल... हरक्युलसने आम्हाला वाईन कशी आवडते वगैरे विचारायला सुरुवात केली, आम्ही आमची आवड बाजूला ठेऊन "तू काय सजेस्ट करतोस" ह्यावर भर दिला, त्याने विचारलं जास्त गोड आवडत नसेल तर 'ट्विशी' नावाची व्हाइट वाईन घ्या माझी आवडती आहे ती, मी रेड वाईन वाला माणूस पण तरी ट्राय करायला काय हरकत आहे म्हणून आम्ही ती ट्विशी मागवलेली, 'क मा ल' जास्त स्पारकलिंग नाही, जास्त गोड नाही...तुरट पण अगदी प्रमाणात, नीलम आणि मी एकमेकांकडे बघून लै भारी लुक देऊन हरक्युलसला दाद देत २ऱ्यांदा हीच प्यायची असं सांगितलं, पण दुर्दैवाने ती वाईन संपलेली असं आमच्या सुंदर वेटरणीने येऊन सांगितलं!🙄😑 असो दुरसी कुठली वाईन घ्यायाची का असं विचारलं हरक्युलसने, मी तोंड वर करून म्हणालो आता नको छान चव आहे ट्विशीची, आता मिक्स नको करायला दुसरी वाईन मागवून... हरक्युलसने त्याचं हिरवं सरबत आम्हाला दिलं, म्हणाला हे पिऊन बघाच! मिक्स नको करायला सांगणारा मी, सरबत दिसल्यावर लगेच *दे दे दे* करत ग्लास पुढे करतो! सरबत आपला वीक पॉईंट आहे ना जन्मापासून! आणि काय गम्मत... अहो वाळा आणि बडीशोप चे *लेमोनेड* होतं ते... हरक्युलस म्हणाला हे जॉर्जियातलं अतिशय प्रसिद्ध पेय आहे हे, आम्ही लहानपणापासून हेच पीत आलेलो आहे, ह्यात बाकीचे फ्लेवर्स पण मिळतात पेर, वेनीला वगैरे पण हे हिरवं आहे ते सगळ्यात लोकप्रिय... ट्रॅगों / टेरेगोंन का काय तरी म्हणतात त्या फ्लेवरला! मला काय सगळ्यांनाच आवडलं ते, मग पुढचे ३ही दिवस न चुकता दिवसातून २/३ बाटल्या ढोसल्या आम्ही सगळ्यांनी!
आणि हे सगळं चालू असताना अचानक सूर्य लपला, ढग जमायला लागले... उकडायला लागलेलं... त्या कोरड्या टेरेसच्या कठड्यांवर वर छोटे मग मोठे पावसाचे थेंब नाचायला लागले!
#सशुश्रीके | ११ जून २०१९
-------- -------- -------- -------- -------- -------- -------- -------- -------- -------- -------- --------
निवांत गरीब स्वच्छ जॉर्जिया - भाग ४
पाऊस सुरू झाला बघता बघता सगळं ओलं... काठड्यापासून रस्ता वगैरे
सगळं कसं चमकायला लागलेलं, हे सगळं काहीच मिनिटात! वाजलेले ५ पण वाटत होतं ७
वाजलेत, टेरेस चा भाग असून वर मोठं छत असल्याने त्यात उभं राहून मस्त शूट
करत होतो मी व्हीडिओ, सगळं कसं एकदम मनाला 'पैसा वसूल चामारी' टाइप्स
चाललेलं! म्हणजे तुम्ही नक्की शहरात आहात की उंच पर्यटन स्थळी असा प्रश्न
पडणारा माहौल, म्हणजे समोर रस्ता रस्त्या पलीकडे नदी... नदी पलीकडे टेकडी,
त्यावर जॉर्जियन राजाचा घोड्यावर विराजमान पुतळा मागे सुंदर ढगांनी
व्यापलेले आकाश... कैच्या काय भारी! 😍त्यात माझी काय वेगळीच चिंता... 😏 मला वाटायला लागलं की आता लवकरच अंधार वगैरे पडणार असं 'दिसतंय' तर हरक्युलस म्हणाला की साधारण ८ वाजेपर्यंत असतो उजेड इथे, काळजी नसावी, आज पावसामुळे असं वातावरण आहे! हे ऐकून जरा बरं वाटलं... 😊 आणि म्हणे आजच पाऊस आला म्हणजे आमच्या स्वागतालाच असेल असं स्वतःलाच सांगून मी कॅमेरा इकडेतिकडे फिरवत होतो, 'डीजेआय ओस्मो' नावाचा मोबाईल कॅमेरा स्टेबिलाईझर आणलेला मी मित्राचा, त्यावरून कमाल स्थिर व्हीडिओज येतात, एन्ड रिझल्ट तर सिनेमाटोग्राफी दर्जाचा! मनाचा मोठेपणा दाखवत हर्क्युलसने आमचे फोटो पण काढले. तो आमचा पहिला एकत्र वाला फोटो 👌
असो... बिल वगैरे सोपस्कार करून आता पुढे काय हा प्रश्न आम्ही हर्क्युलसकडे ओतला, तो म्हणाला बाजूलाच एक भेटवस्तूंचे दुकान आहे ते झालं मग पुढे वाइन टेस्टिंग / बोट राईड वगैरे.
आल्या आल्या लगेच भेटवस्तू म्हणजेच सुविनियर्स का घ्यायची असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला पण नंतर राहून जातात असं पण लक्षात आलं, आणि हरक्युलस इतका सांगतोय तर असेल चांगलं ह्या निरागस निष्कर्षाला कुरवाळत आम्ही त्या दुकानात घुसलो, छोटसच होतं पण भरलेलं, कुठे जागेचा अपव्यय नव्हताच, दरवाज्याला टीशर्ट होते लटकवलेले त्यावर जॉर्जिया, वाईन वगैरे विषयाचे ग्राफिक्स होते, आत कीचेन्स, मॅग्नेट्स, टोप्या, अंगठ्या काय विचारू नका... मला २छान गोष्टी मिळाल्या त्या उचलल्या एक स्टेनलेस स्टीलची जॉर्जियन झेंडा असलेली चप्पल कीचेंन आणि एक स्टीलचीच पण तपकिरी चमड्याचे आणि जॉर्जियन डिझाईनचे आवरण असलेली छोटी बाटली 😛
एक घंटा पण होती छान, म्हणजे होत्या खुप पण त्यातल्या त्यात एकी कडे लक्ष गेलं... बाई डाव्या हातात तलवार पोटाला आडवी धरून उभी आणि दुसरा हात आकाशाकडे आणि त्यात एक भांडं असं काहीतरी असलेली मूर्ती आणि तिला खाली लावलेली घंटा, मला त्या बाई बद्दल माहिती कळावी म्हणून हर्क्युलसने त्या घंटे कडे बोट दाखवत सांगितले की ही आहे *'मदर ऑफ जॉर्जिया'* जेव्हा तुम्ही युद्ध करायला याल तेव्हा मी *तलवार* घेऊन स्वागत करीन आणि जेव्हा प्रेमाने याल तेव्हा *'वेलकम ड्रिंक'* ने स्वागत करेन! असा आहे इतिहास, ती मूर्ती इथेच जवळ आहे दाखवीन तुम्हाला पुढे... हे ऐकून ती घंटा घ्यायची इच्छा होती पण अमृता म्हणाली काय करायची आहे ती घंटा घेऊन त्यापेक्षा काही तरी दुसरं घे, त्यात अन्वयाची मला हे घे ते घे चालू होतं त्यामुळे मी काय जास्त विषय वाढवला नाही, मग अन्वयाला डायरी, अमृताने अंगठी/पेंडंट सुरश्रीने असच काहीतरी घेतलं, कार्ड स्वाईप केलं न बाहेर आलो...
दरवाज्यातून पहिली पायरी उतरलो न उजव्या बाजुला बघतो तर एक आज्जी नुकत्याच घसरून पडलेल्या... दगडी रस्ता आणि उतार त्यात पाऊस त्यामुळे त्यांचा तोल गेला असावा, लगेचच जवळच्या रेस्टॉरन्ट / दुकानातून दोन तरुण आले आणि आजींना हात दिला, तीने उठून 'बरी आहे मी, जास्त लागलं नाही' असं वगैरे सांगितलं असेल आणि पुढे जे हे काय घडलं ते मी आमच्या मंडळींना सांगायला लागलो. "अय्या / अरेरे" वगैरे शब्द कानावर पडले पण मी 'चला आता, पुढे जाऊ, काय प्लान आता...' असं म्हणत संपलेल्या पावसाची आणि परतलेल्या उजेडाची -वाह वाह- करत डाव्या बाजूने चालायला सुरुवात केली.
#सशुश्रीके | १३ जून २०१९
-------- --------
निवांत गरीब स्वच्छ जॉर्जिया - भाग ५
२मिनिटांवरच होतं ते शॉप, मध्ये मध्ये हातात ब्रोशर/पेम्फलेट घेऊन सुंदर मुली जॉर्जियाच्या इतर भागात जाणाऱ्या टूर्स बद्दल जाहिरात करत होत्या, आमच्याकडे बघून मग हर्क्युलस सांगायचा काहीतरी त्यांना आणि मग त्या हसत त्याच्याशी काहीतरी बोलायच्या, एकदा सांगितलं त्याने मला काय बोलली एक मुलगी, म्हणाली त्याला म्हणे 'कुठे गेलेलास इतका टॅन व्हायला... मस्तच दिसतोयस!' हे ऐकून मला त्याने त्याची टीशर्टची बाही वर करून त्वचा दाखवली आणि म्हणाला ही माझी खरी त्वचा न ही बाहेरची, प्रचंड उन्हात फिरलो/खेळलो आहे काही दिवसांपूर्वी! हा एक किस्सा पण तो आम्हाला घेऊन फिरत असताना सर्व अश्या पोरी त्याला बघून हाय हॅलो करत काय काय मज्जा करत होत्या, सगळं कसं एकदम लै भारी फीलिंग देणारं!
असो असो... ते वाईन शॉप/फॅक्टरी/बार आला.
ओल्ड सेलार नावाचं शॉप होतं, डाव्या बाजूला मस्त वाईन बाटल्या रॅक मध्ये ठेवल्या होत्या, खूप सुबक मेटल/ग्लास डिजाईन असलेल्या, त्यातल्या काही हॅन्डमेड पण होत्या, समोरचा भाग जिन्याद्वारे मेंन फॅक्टरीत जाण्यासाठी होता, जरा उजवी कडे काउंटर आणि लागूनच वाईन्स नी भरलेले/रचलेले शोकेस टाइप्स कपाटे पण काच नसलेले... आणि मध्ये एक टेबल, त्यावर काही वाईन्स ठेवलेल्या आणि ग्लासेस!
तिथल्या कर्मचाऱ्याने आमचे स्वागत केले, हर्क्युलस ने आमची ओळख करुन दीली, ५०लारी ला वोडका + वाईन टेस्टिंग आणि फक्त वाईन टेस्टिंग ३०लारी, मी ५०वाली आणि नीलम ने ३०वर शिक्कामोर्तब केलं, पण वाईन टेस्टिंग आधी आम्हाला त्याने त्या जिन्यातून खाली नेलं, आणि खाली जसे गेलो तस काही भलताच काळात गेल्यासारखं, विटा वगैरे दिसत होत्या जुने बांधकाम कळत होतं, वाईन बनवतात तिथे...आणि पारंपारिक जुन्या पद्धतीनेच बनवतात, जॉर्जियन पद्धत वेगळी युरोपियन वेगळी अशी माहिती तो देत होता मध्ये इंग्लिश मध्ये बोलताना अडखळायचा मग हरक्युलस त्याची वाक्य फिल्टर करायचा, खूप जुना इतिहास आहे जॉर्जियन वाईन्सचा... ८०००वर्ष जुना म्हणे! मी फोटो काढता काढता ऐकत होतो, नीलम लक्ष देऊन ऐकत होता मध्येच प्रश्न पण विचारत होता... काही वेळानी आम्ही वर आलो... त्या वाईन टेस्टिंग टेबल पाशी आलो आम्ही, बसलो खुर्चीत दोघे... हर्क्युलसला विचारलं की तू नाही का घेणार! तर म्हणाला नाही नाही, 'मी गाडी कशी चालवू मग?' असं सांगत त्याने खुर्ची मागे करत प्रस्थान केले 😁
मग काय तुरट आंबट गोड वगैरे चवींची ६/७वाईन्स त्यात मध्ये मध्ये जगातलं सगळ्यात बेस्ट 'लिक्विड' अर्थात पाणी, जसं अत्तर / परफुम्स दुकानात अधून मधून कॉफी बीन्स देतात वास रिफ्रेश करायला तसच! कुठली आवडली कुठली नाही असं करत करत वेळ आली 'चा चा' नामक स्थानिक वोडकाची, वाईनवोडका पण म्हणतात ह्याला, नीलमच्या मनात धडकी भरली! मला तेव्हा लक्षात नाही आलं, पण आता लिहिताना कळलं की मी वाईन + वोडका साठी सांगितलेलं, नीलमला का वोडका ऑफर केली कोणास ठाऊक, असो नीलम नाही नको चा सूर पकडून होता... पण मीच त्याला म्हणालो 'ठिकाय रे कर ट्राय!' मग काय चा चा नामक तो वोडका , त्याचा शॉट मी मारला आधी, डोळे ढगात घसा पाताळात! चरचरीत २/३सेकंद, आता नीलम... त्याने जे काय चेहरे केले नंतर! म्हणाला अजिबात आवडला नाहीये हा प्रकार, पण तो पर्यंत वेळ निघून गेलेली! असो...
त्या मंद धुंद
वातावरणात, मगाशी जेवणाच्या वेळेला ट्राय केलेली 'ट्विशी' नावाची वाईन आणि
अजून एक रोज रेड ड्रॅय वाईन, ४ मिनी चाचा बॉटल्स घेतल्या ऑफिस मित्रांसाठी
विकत घेतले, कार्ड स्वाईप केले... तितक्यात हर्क्युलसला व्हाट्सअप्प वर
मेसेज ही आला सुरश्रीचा की 'चौकात भेटूया आमची खरेदी संपन्न!'
#सशुश्रीके | १७ जून २०१९
-------- --------
निवांत गरीब स्वच्छ जॉर्जिया - भाग ६
असो... गाडी आली आमची जवळ, सर्व जण बसलो गाडीत... 'मदर ऑफ जॉर्जिया' च्या आधी नदी पात्रात बोट राईड करायची का? कारण जिथून आम्ही त्या टेकडीवर जाणार होतो केबल कार ने त्याच्या पायथ्याशीच नदी / बोट राइड चे ठिकाण होते, मग काय आम्ही सगळे बोट राईड साठी सज्ज झालो, ४० आणि ३० असे २ रेट्स होते, ४० मध्ये जरा मोठी राइड आणि वाईन ही असं कॉम्बिनेशन, आता आलोच आहोत इतकं लांब फिरायला तर मोठीच राईड घेऊन असा सर्वानुमते निर्णय घेतला, बोट राईड वाली बाई हे समजावून सांगत होती आणि शेवटी म्हणाली ही की मी हर्क्युलसची मैत्रीण आहे वगैरे, अर्थातच त्यामुळेच आम्ही त्या बोट राईडला आलेलो हे स्पष्ट झालं, आम्ही पोचलेलो तेव्हा नुसक्तीच राईड भरून गेलेली त्यामुळे परत यायला वेळ लागणार होता, मग त्या वेळेत परत एकदा हातात होती वाईन, पण ह्यावेळी काचेच्या ग्लॅसात नाही तर पुण्यात मुंबईत चहा मिळतो ना त्या सारख्या प्लास्टिक च्या उणे ड दर्जाच्या कपात! असो... नीलम ने तो हातात तर घेतला पण त्याला अजिबात इच्छा नव्हती तिला ढोसण्याची! आणि मी तर चहा प्यायला सारखा पीत होतो!
आली आमची वेळ आली.. तो येणार का बोटीत असं त्या मुलीने विचारल्यावर आम्ही 'हो' म्हणालो, पण तेव्हा लक्षात नाही आलं की त्याचे पैसे ही भरावे लागणार! त्यामुळे २०० झाले आमच्या ५जणांचे! हे कळल्यावर सुरश्री जरा वैतागलीच, म्हणजे सगळेच.. पण जाऊदे आता असं एकमेकांना सांगत आम्ही बोटीत जायला निघालो मागे हर्क्युलस पण आला आमच्या बरोबर, सर्व बसलो बोटीत आणि बोट राईड सुरु झाली... बोट राइड मध्ये काही मजा आली नाही आजूबाजूला बघणे, एका बाजूला रस्ता असलेली बाजू आणि एका बाजूला टेकडी त्यावर लाकडाने आधार दिलेली घरं, 'ब्रिज ऑफ पीस' नावाचा ब्रीज होता मध्ये त्याच्या खालून बोट गेली आमची.. तो एक प्रकार मस्तय, काही वर्षांपूर्वी खूप पैसे उकळून / गैर व्यवहार करून जुन्या सरकारने हा ब्रिज बांधलेला आहे असं सांगत होता हर्क्युलस, म्हणाला आताचे सरकार वेगळे आहे, चांगले आहे... पण आधीच्या सरकार ने जितका गैरव्यवहार आणि भ्रश्टाचार केला त्याला सीमाच नाही! असो... आमची बोट आता एका असया ठिकाणी आली जिथे मोठं मोठी घरटी होती झाडांच्या वरती... आम्ही जवळ गेलो त्यांच्याक्स सगळे फोटो काढत होते, अन्वयला अमृता बोट दाखवून खुणावत होती.. अन्वय पण खुश... तितक्यात हर्क्युलस म्हणाला अन्वयाला जर बोट चालवायची असेल तर मी ड्रॅयव्हरला विनंती करू शकतो, मी हो म्हणालो .. माझ्या मांडीवर अन्वया बसून स्टेरिंग व्हील चा ताबा घेत आम्ही २-३ मिनिटे आनंद घेतला बोट राईड करून!... अन्वया जामच खुश! मग बोट चालवणाऱ्याला धन्यवाद करत आम्ही परत जागेवर येऊन बसलो. आता वेळ आली उतरायची... केबल कार करून टेकडी वर जायचं होतं आणि तिथे बऱ्यापैकी रांग दिसत होती, त्यात आम्हा सगळ्यांनाच लघुशंका लागलेली.. WC हे शब्द आणि बाई पुरुष असं चित्र असलेली जागा दिसली! मग तिथे शिरलो तर कळलं की १ लिरा लागतो ही सुविधा मिळवायला! मग काय अमृताकडे विचारलं आहेत का सुट्टे, मग सुट्टे पैसे शोधात / घेत आम्ही तो प्रकार आटोपला. मस्त हलकं हलकं वाटत होतं आता! सगळी वाईन खळखळून बाहेर पडलेली...
#सशुश्रीके | १९ जून २०१९
निवांत गरीब स्वच्छ जॉर्जिया - भाग ७
भूक पण लागलेली जराशी, दाणे दिसले.. खारे दाणे! मग काय १ पुडी घेतली सुरश्रीने, सर्वांनी ताव मारायला सुरुवात केली... सर्वांचे हात १-२ मिनिटाने दे टाळी दिल्या सारखे सुरश्रीकडे जात होते, आम्ही गप्पा मारत उभे होतो... कारण बसायची सोया नव्हती आणि त्यात अन्वयाची कुरबुर सुरु झालेली, 'बोर' होतंय वगैरे, तिचे नेहमीचे छळवादी कार्यक्रम सुरु... काहीतरी हवं असेल तर तीचं हे बोर होतय हे प्रकरण शिगेला पोहोचतं! मग काय तिथे एक 'बबल पाईप' का कायतरी असतं ते घेऊन दिलं... आमचे दाणे पण संपत आलेले... नीलामच्या पुढाकाराने दाणे परत घेण्यात आले.. आता दे टाळी दिल्या सारखे सुरश्रीकडे जात असलेले हात नीलमच्या दिशेला वळत होते, अश्या प्रकारे १५-२० मिनिटाने शेवटी आमची वेळ आली केबल कार मध्ये बसण्याची.
जराश्या वेगळ्याच केबल कार मध्ये बसायची माझी.. माझी काय सगळ्यांचीच पहिली वेळ असावी, कारण ती थांबत नाही, बसायच्या ठिकाणी यु टर्न घेताना वेग मंद होतो आणि मग आपण त्या वेळेत बसून घ्यायचं! म्हणजेच केबल कार थांबताच नाही, प्रवाशांचा प्रवाह अखंड चालूच.. कोणाला जमलं नाही बसायला तर ती कोणाला न घेताच पुढे जाते, अन्वया साठी हे 'मिनि ऍडव्हेंचर'च! आम्ही सगळे बसलो.. मी माझा केमेरा चालू केला... मस्त दिसत होतं टब्लिसी शहर वरच्या बाजूने, छोटी विमान सफर केल्यासारखं दिसत होतं सगळं, मस्त रस्ते... शिस्तबद्ध वाहतूक... वळणदार नदी... शहराच्या सीमेला पसरलेल्या टेकड्या! सगळं कीसं मनमोहक , एखाद्या चित्रकाराने मनाला आवडेल तसे काढलेले चित्र जणू! खरच पाहत राहावंसं वाटणारे दृश्य... हे सगळं काही मिनिटातच संपलं! म्हणजे जवळपास २ मिनिटातच टेकडीवर पोहोचलो पण! परत तोच प्रकार, जिथे उतरायचे आहे तिथे धीमी झाली केबल कार, परत तोच रोमांच अन्वयासाठी, आम्ही उतरुन घेतलं... संध्याकाळचे साधारण ७ वाजले असावेत, अजून ही मंद प्रकाश होता... त्यामुळे जाईपर्यंत अंधार होणार आणि मस्त १८०डिग्री व्यू सिटी दिसणार दिव्यांनी लखलखलेलं हा विचार मनात आला.
तो उतरल्या नंतरचा प्रकार म्हणजे सिंहगडच जणू आपला.. म्हणजे त्या पायवाटेवर विविध प्रकारच्या खायच्या गोष्टी, सुविनीयर दुकाने थाटलेली... तिथेही सुरु झाली मग खरेदी, कलिंगड फोडी घेतल्या सुरश्रीने, अन्वयाचे बबल उडवणे सुरु झाले, असं करत करत आम्ही 'मदर ऑफ जॉर्जिया' पाशी आलो. हर्क्युलस ने सांगितलेली गोष्ट आठवली... एका हातात तलवार आणि एका हातात 'वेलकम ड्रिंक!' तो अवाढव्य पुतळा अजूनच खास दिसत होता जवळून... पण एकच खुमखुमी मनाला... तो पुतळा शहरच्या दिशेने.. आणि पुतळ्याची जागा संपल्या संपल्या पुढे काही नाही... म्हणजेच पुतळा जवळून समोरून पाहायची सोयच नाही, जवळच्या जवळ म्हणजे पुतळ्याच्या थेट खाली जाऊन वर बघणे! हे काय आवडलं नाही बघा आपल्याला, असो... पुतळ्याच्या मागेच एक खोल वाट... तिथे आहे बोटॅनिकल गार्डन, तिथे जायचा प्लान आहे, पण तो उद्या!
आज आता दमलो होतो सगळे आणि आता भूक पण लागायला सुरुवात झालेली, त्यात अन्वयापण कंटाळली होती.. उतरून जायचं की आलो तसेच परत केबल कारने जायचे? हा प्रश्न टाकत त्याचे उत्तर शोधत आम्ही परतीच्या वाटेला निघालो... शेवटी ठरवलं की आलो तसेच जाऊ परत २ मिनिटात , सुदैवाने जाताना गर्दीही नव्हती... तेच मग परत यु टर्न, सावकाश झालेली केबल कार, अन्वयाची गंमत सगळं परत अनुभवत आम्ही आलो खाली. आता मस्त अंधार झालेला... गाडीजवळ जाताना काही मस्त गोष्टी पण पाहायला मिळाल्या, जिथून केबल कार घेतली तो परिसर एका गार्डनचा होता जो 'ब्रिज ऑफ पीस' पर्यंत पसरलेला, हे सगळं उद्या दिवसातल्या प्रकाशात बघायला मिळणार होतं. हर्क्यूलस ने जाता जाता थांबवलं एके ठिकाणी, मस्त एक झाड होतं... पण लोखंडाचं... झाडामागेच एक कुत्रा... काही पक्षी, सगळं लोखंडाचं, अश्या खूप छोट्या मोठ्या गोष्टी होत्या आजूबाजूला, त्यांचे फोटो काढत गप्पा मारत आम्ही गाडीपाशी आलो, काही वेळातच हॉटेलपाशी. अश्याप्रकारे हर्क्युलसचा जॉब संपला, त्याला टाटा बाय बाय केला आणि विनंतीही केली की पुढचे २ दिवस आमची सेवा करायला तुला जमेल का? तो म्हणाला "अवघड आहे, उद्या तर मी दुसऱ्या पाहुण्यांसाठी 'बुक' आहे तआणि परवाचे माझी कम्पनी ठरवेल, पण तुम्ही माझी अशी थेट मागणी करू नका, मला प्रॉब्लेम येऊ शकेल नोकरीत... " हे सगळं संभाषण आटपून आम्ही त्याला टीप टेकवून हॉटेलमध्ये घुसलो! प्रचंड थकलेलो, त्यामुळे जेवायला बाहेर न पडता हॉटेल मेनू मधूनच काही तरी मागवू असा निर्णय घेतला... आणि मेनू कार्ड उघडले!
#सशुश्रीके २३ जुन २०१९
-----
निवांत गरीब स्वच्छ जॉर्जिया - भाग ८
मेनू कार्ड उघडलं... जॉर्जियन खाद्यपदार्थ आणि त्यांची नावं... खचापुरी आणि काय काय... ७५% गोष्टी मांसाहारी... मग काय! शाकाहारी पदार्ध मिळाले काही, ते सर्व ऑर्डर केले. प्रचंड भूक लागलेली, त्यात अमृताला बरे नाहीसे वाटत होते जरा, त्यामुळे ती तर झोपून गेली... सगळेच थकलेलो पण जेवल्याशिवाय कसं झोपायचं, मग गप्पा सुरु. अन्वयाला वेगळा बेड होता झोपायला, ती ह्याच कल्पनेने आनंदी होती, ठरल्याप्रमाणे तिला पिझा मागवलेला, गप्पा मारणार किती? तास झाला... फोन केला मग शेवटी रिसेप्शनला तेव्हा कळलं की "काही मिनिटातच येईल जेवण, कुठे जेवणार टेरेस वर की रूम वरच" पण आता आम्ही छान सेटल झालेलो... परत कोण जाणार टेरेसवर तयार होऊन म्हणून रूम मध्येच जेवण आणून द्या असं कळवलं, काही वेळानी एक वेट्रेस आली... १००% गुलाबी-लाल केस असलेली, तिने एक एक करत सर्व डीशेस मांडल्या टेबल वर.. मॅश पोटेटो आणि पिझ्झा सोडून बाकीच्या २-३ गोष्टी कधी न पाहिलेल्या होत्या, जे काय होतं ते बरं होतं, प्रचंड भूक लागलेली असली की सगळं छान लागतं, असच काहीतरी झालेलं. अश्याप्रकारे आमचा १ला दिवस.. अर्धा दिवस जॉर्जियातला संपला. आणलेली वाईन आणि खरेदी कपाटात ठेवली, एसी अड्जस्ट केला ना झोपलो, ते थेट सकाळी जाग आली.
आता टिब्लीसी शहर फिरायचा प्लान, ते पण चालत... तसेही छोटे आहे शहर, मुख्य चिंता होती अन्वयाची, दुबईत रस्त्यावर / मॉल मध्ये १०-२० मिनिटे चालल्यावर पण बोर होत आहे, बाबा कडे घे... असा पावित्रा घेणारी अन्वया! तिला दिवसभर चालवायचं ते पण वेगळ्या देशात... त्यात तिच्याकडे तिची खेळणी नाहीत, ह्या सगळ्या गोष्टींना नजरअंदाज करत आम्ही नाश्त्याला भेटलो सगळे. हॉटेलचा सकाळचा तो 'ब्रेकफास्ट' खास असतो, निरनिराळे ब्रेड... कॉर्नफ्लेक्स, सॅलेड्स... कॉफी, ज्युस... अन्वयाची चंगळच! हा सर्व महत्वाचा प्रकार झाल्यावर आम्ही सगळे निघालो सिटी टूर करता, मस्त ऊन पडलेलं, टिपीकल युरोप सारखं थंड वगैरे नव्हतं, चांगलच ऊन होतं आणि गरम पण होत होतं, अन्वयाला दिवसभर चालायचं आहे आणि कुरकुर करायची नाही असं सांगत आम्ही आमचा प्रवास सुरु केला, रस्ते मोठे आणि झेब्रा क्रॉसिंग लांब तरीही वाहनांचा अंदाज घेत आम्ही तो रस्ता पार केला आणि एका ब्रिज वरून मुख्य शहराच्या दिशेने जायला लागलो... त्या ब्रिज वर काही पुतळे होते, खूपच सुंदर! फार छान कलाकृती... ७/८ असतील, त्यातले २/३प्रेमी युगुले बाकीचे एकटे, त्यातले एक पात्र नदीत पत्रात उडी मारणारे... सर्व तांब्याचे आहेत म्हणे. प्रत्येक पुतळ्यामागे इतिहास आहे आणि त्यावरून त्या पुतळ्यांना जास्त महत्व आहे हे नुसती कलाकृती सोडून. त्यांचे फोटो काढत काढत आम्ही ब्रिज ओलांडला, नंतर लक्षात आलं की आम्ही दिवसभर पुरतील अश्या पाण्याच्या बाटल्याच घेतल्या नाहीयेत, मग एका दुकानात घुसलो, २/३बाटल्या उचलल्या, काउंटर वर गेलो... जॉर्जियन लोकांचा आणि इंग्लिशचा फारच कमी संबंध त्यामुळे हातवारे करत हिशेब झाला, दुकानाच्या बाहेरच छान फुले/फळभाज्या थाटून एक म्हातारी बाई बसलेली, तिच्याकडून फळे घ्यायचा मोह झाला होता पण ते इंग्लिश प्रकरण आठवलं, त्यात वेळ जाईल हा विचार आला मनात आणि टाळलं आणि आम्ही पुढे निघालो.
#सशुश्रीके २८०६/२०१९
-----
पाण्याच्या बाटल्या बॅगपॅक च्या २न्ही बाजूला खुपसत एका हातात अन्वयाचा हात घेत, तिला बजावत... की, *मी नाही तर कोणाचा तरी हात धरूनच चालायचं.. नाही तर हरवशील ना!* असो...
सुरश्रीकडे डाटा प्लान होता त्यामुळे गुगल मॅप काकांकडून आम्हाला रस्ता कळत होता कुठे वळायचं कुठे नाही हे सर्व! आणि डाटा नसला तरी वाया जीपीएस ही तुम्ही एकदा सेट केला पॉईंट की गुगल मॅप पोचवतं अचूक ठिकाणी, तर आमचा पहिला पडाव होता त्यादिवशीचा फनीक्युलर रेल्वे... Mtatsminda plateau नावाच्या टेकडीवर साधारण ५०-६० लोकांना ६ मिनिटात नेणारी ही जरा हटके डिजाईन असलेली रेल्वे, १९०५ साली सुरु झाली , १९३०च्या नंतर ही रेल्वे जास्त वापरायला सुरुवात व्हायला लागली कारण त्या टेकडीवर एक मस्त पार्क तयार करण्यात आले त्यानंतर मुख्य बदल झाला २०१२ साली... अत्याधुनिक रेल्वे च्या तंत्रज्ञानासह. मोनो (एकच पदरी) असलेला मार्ग बरोबर मध्य ठिकाणी विभागतो, तिथे एक जन्क्शन आहे तिथे वर जाणारी आणि खाली येणारी थांबतात, तिथून एका चर्च ला पण भेट देऊ शकता. हे सगळं बघायचं अनुभवायचं होतं पण त्यासाठी २०-३० मिनिटे पायपीट करायची होती, सकाळ होती पण ऊन ही वाढत चाललेलं, त्यात थंडीचे दिवस नसल्याने बऱ्यापैकी उकडत होतं, तमध्ये मध्ये थांबत टाइमपास करत आम्ही आमचा प्रवास चालू ठेवला, मला गाड्यांची आवड असल्याने माझा अर्धा वेळ तर त्यातच जात होता... एक गाडी दिसली की एक नाही त्याचे 360फोटो काढत, काय आहे ना ही वगैरे स्वतःशीच बडबड करत माझं चालू होतं.. त्यात माझा हा वेडेपणा पाहून एक इसम म्हणाला, पुढे जा अजून एक आहे ह्यासारखीच अजून एक! मी त्याला धन्यवाद देत पुढे गेलो... खरच होती ना एक जुनी शॉवरलेट! बाकी पण खूप जुन्या आणि विशेषतः रशियन गाड्या दिसत होत्या, मध्येच अमृता सुरश्री कपडे वगैरेंच्या दुकानात घुसत होत्या, अरे हो एक सांगायचं राहिलच, वाटेत दिसला आम्हाला एक चौक, Tavisuplebis moedani किव्वा Freedom Square म्हणतात त्याला, त्या चौकात एक उंच पिलर त्यावर एक
पाण्याच्या बाटल्या बॅगपॅक च्या २न्ही बाजूला खुपसत एका हातात अन्वयाचा हात घेत, तिला बजावत... की, *मी नाही तर कोणाचा तरी हात धरूनच चालायचं.. नाही तर हरवशील ना!* असो...
सुरश्रीकडे डाटा प्लान होता त्यामुळे गुगल मॅप काकांकडून आम्हाला रस्ता कळत होता कुठे वळायचं कुठे नाही हे सर्व! आणि डाटा नसला तरी वाया जीपीएस ही तुम्ही एकदा सेट केला पॉईंट की गुगल मॅप पोचवतं अचूक ठिकाणी, तर आमचा पहिला पडाव होता त्यादिवशीचा फनीक्युलर रेल्वे... Mtatsminda plateau नावाच्या टेकडीवर साधारण ५०-६० लोकांना ६ मिनिटात नेणारी ही जरा हटके डिजाईन असलेली रेल्वे, १९०५ साली सुरु झाली , १९३०च्या नंतर ही रेल्वे जास्त वापरायला सुरुवात व्हायला लागली कारण त्या टेकडीवर एक मस्त पार्क तयार करण्यात आले त्यानंतर मुख्य बदल झाला २०१२ साली... अत्याधुनिक रेल्वे च्या तंत्रज्ञानासह. मोनो (एकच पदरी) असलेला मार्ग बरोबर मध्य ठिकाणी विभागतो, तिथे एक जन्क्शन आहे तिथे वर जाणारी आणि खाली येणारी थांबतात, तिथून एका चर्च ला पण भेट देऊ शकता. हे सगळं बघायचं अनुभवायचं होतं पण त्यासाठी २०-३० मिनिटे पायपीट करायची होती, सकाळ होती पण ऊन ही वाढत चाललेलं, त्यात थंडीचे दिवस नसल्याने बऱ्यापैकी उकडत होतं, तमध्ये मध्ये थांबत टाइमपास करत आम्ही आमचा प्रवास चालू ठेवला, मला गाड्यांची आवड असल्याने माझा अर्धा वेळ तर त्यातच जात होता... एक गाडी दिसली की एक नाही त्याचे 360फोटो काढत, काय आहे ना ही वगैरे स्वतःशीच बडबड करत माझं चालू होतं.. त्यात माझा हा वेडेपणा पाहून एक इसम म्हणाला, पुढे जा अजून एक आहे ह्यासारखीच अजून एक! मी त्याला धन्यवाद देत पुढे गेलो... खरच होती ना एक जुनी शॉवरलेट! बाकी पण खूप जुन्या आणि विशेषतः रशियन गाड्या दिसत होत्या, मध्येच अमृता सुरश्री कपडे वगैरेंच्या दुकानात घुसत होत्या, अरे हो एक सांगायचं राहिलच, वाटेत दिसला आम्हाला एक चौक, Tavisuplebis moedani किव्वा Freedom Square म्हणतात त्याला, त्या चौकात एक उंच पिलर त्यावर एक घोडेस्वार योद्धा एका ड्रॅगनला भाल्याने मारत आहे असा पुतळा आहे, मस्तच... बघत राहावंसं वाटेल इतका सुबक आणि त्यात सोनेरी! आता असं म्हणतात की *प्युर गोल्ड* आहे म्हणे, खरं खोटं माहीत नाही, आणि असेल तर लैच भारी. आजू बाजूला ही निरनिराळे छोटे पुतळे आहेत जनावरांचे... त्यांचे फोटो काढत, ते अन्वयाला दाखवत पायपीट चालू होती, रस्त्याच्या कडेला बँका, काही कॉफी शॉप्स वगैरे टिपीकल शहरी जीवन पद्धती होती, जुन्या पेंटिंग्स, नाणी अश्या गोष्टी विकणारे पण होते अधून मधून... जरा थांबून पाहायला लागलो की आपल्याकडे पाहून आपली नजर जिथे जात असेल त्याबद्दल सांगायचे काहीतरी तोडक्या मोडक्या इंग्रजीत *#ओल्ड #रुसीया* (हो हो जाणूनबुजून रुसिया लिहिलं आहे करण ते रशियाला ह्याच नावाने संबोधत होते) असे दोन तीन शब्द सोडून काही कळायचं नाही, पण काय मस्त मस्त जुनी नाणी, नोटा... जुने बैजेस... खऱ्या असतील खोट्या असतील देव जाणे! हिटलर सारख्या स्टालिनचे पेंटिंग्स / पोस्टर्स पण होती.. हे सगळं बघायला मला जाम मजा येत होती, असं वाटत होतं आपण रशिया मध्येच आलोय की काय... काय माहीत रशिया बद्दल भयंकर आकर्षण आहे, कोणी म्हंटल की तुला दोन पर्याय देतो (फिरायला बरं का, कामाला किंवा राहायला नाही)... अमेरका की रशिया कुठे जाशील, मी नक्कीच रशियाला जाणे पसंत करीन. असो...
त्या चौकाच्या पुढेच एक म्हातारी बाई, साधारण ७०/७५वयाची तर नक्कीच असावी, ती विकत होती फुले फळे, मस्त वेगवेगळ्या रंगाची... स्ट्रॉबेरी चेरीज सारखी राजेशाही फळे! आणि तिच्या अंगावर पडलेला मस्त सोनेरी किरणांचा बिछाना... काय अप्रतिम फ्रेम होती सांगू, मी नेमका DSLR घेऊन आलो नव्हतो ह्या ट्रिपला, त्यामुळे टेली लेन्स नव्हती, जे काय होतं ते माझ्या हातातल्या मोबाईल कॅमेराने टिपलं, त्यात नंतर सुरश्रीने ही पाहिलं, ती तर थेट तिच्यापाशी गेली आणि काहीतरी बोलायला लागली नायर कळलं तिने चेरीज विकत घेतल्या, तो ही क्षण कॅमेर्यात पकडला... असं पेंटिंग मध्ये वगैरे घुसल्या सारखा फील येत होता राव! काही क्षण विसरत नाही आपण असं काही अजब होतं ते सगळं... सुरश्री आणि त्या अजीबाईच्या मधील संभाषण बघत एक बाई सुरश्री आणि मला म्हणाली... "तुम्हाला काही मदत हवी असेल तर सांगा, मी इंग्लिश मधून तुम्हाला सांगू शकते तिला काय म्हणायचं आहे." आम्ही म्हणालो "नाही नाही... धन्यवाद!" मग सुरश्रीनेच सांगितलं की त्या आजींना आम्हाला इतर गिष्टीही घ्या असं सांगायच आहे, हे ऐकून हसत हसत आम्हाला विचारलं कुठून आहात आपण, आम्ही म्हणालो इंडिया... त्या बाईने तिची ओळख दिली... म्हणाली "मी इमिग्रेशन ऑफिसर आहे." मी तिला 'ओह... वाव' करत एक आश्चर्यचकित वाली इमोजीसारखा चेहरा करत पुढे चालायला लागलो, वळून बघितलं परत, कारण मला डोळ्यात परत साठवून घ्यायचे होते ते क्षण!
#सशुश्रीके ०३ जुलै २०१९

निवांत गरीब स्वच्छ जॉर्जिया - भाग ९

----
निवांत गरीब स्वच्छ जॉर्जिया - भाग १०
नीलमच्या हातात चेरीज... माझ्या हातात कॅमेरा, अमृता आणि सुरश्रीच्या हातात अन्वयाचा हात... असे सगळे आम्ही चालायला लागलो, मुख्य शहर आणि आम्ही जिथे जात होतो ते - 'फनीक्युलर रेल्वे' ह्यामध्ये जो काही २०-२५ मिनिटाचा रास्ता होता अगदी पुण्यातल्या पेठांमधून जात आहोत की काय असा होता, जुनी २-३ माजली घरे, डागडुजीला आलेली, प्रत्येक घराखाली दुकाने, फळ-फुले, बेकरी.. मध्येच कपडे, सुविनीयर... वाईन शॉप्स असं सगळं!
हे सगळच गरीब, निवांत पण स्वच्छ ह्या तिन्ही गोष्टींची सारखी जाणीव करवून देणारे होते. अधूनमधून पार्किंग मध्ये थांबलेल्या जुन्या गाड्या माझे लक्ष वेधून घेत होती... सावली ऊन असा खेळ चालू होता अखंड, घरांच्या दरवाज्यांजवळ छान छान कुंड्या आणि त्यात विविध रंगांची फुले पण साथ देत होती आम्हाला, एक मस्त प्रसंगही दिसला मला, उन्हाळ्याचे दिवस असल्याने एक वडील घराच्या बाहेर बसलेले उघडे... त्याची दोन मुले ती पण उघडी मारामारीचा 'सराव' करत होते! मी आणि नीलम ते बघून हसत होतो... त्यांच्याच बाजूला एक जुनी गाडी पार्क केलेली होती, अश्या दोन गोष्टी केमेर्यात कैद करण्यात मी गुंतलेलो, अमृता सुरश्री अन्वय एका दुकानात शिरलेले. ते येताच आम्ही पुढे चालायला सुरुवात केली... काही इमारतींच्या बाहेर जॉर्जियाचे झेंडे पण लावलेले दिसले, चालत चालत आता चढ सुरु झाला, वेग मंदावत गेला आमचा, जुनी घरे जुन्या भिंती काही नवीन इमारतींची बांधकामे त्याच्या साठी बाहेर लावलेले पत्रे, त्यावर ग्राफिटी... इलेक्षन च्या वेळी आपल्या इथे चित्रविचित्र बॅनर पण इथे ग्राफिटी... ३-४ ठरलेल्या साच्यातून चेहरे / अक्षरे / अंक... काही मजकूर... हे सगळं छान दिसेल असे. ह्यातून काही शिकावं आपल्या लोकांनी! प्रचार करा पण तो विभित्स कसा नसावा उलट आकर्षित करणारा असावा असं काही! चालताना लक्ष जावं म्हणून फूटपाथ वरही ग्राफिटी चा छान वापर केलेला! ह्याला म्हणतात 'क्रीएटीव्हिटी'.
दिसलं... त्या रेल्वेचं स्टेशन दिसलं! पण तिथे जाण्याआधी काहीतरी थंड पिऊन आराम करायचा होता, एक छान छोटं केफे होतं त्यात पुढे गेलेले सुरश्री अमृता अन्वया आधीच जाऊन स्थानापन्न झालेले, कुकीज आणि कॉर्ड्रिन्क्स घेऊन शांत निवांत बसलेले... मी आणि नीलम ही जाऊन बसलो. गप्पा मारल्या छान.. हसणे खिदळणे चालू होतं अखंड, एकूणच धम्माल चालू होती. छान होते ते केफे ही... सेल्फ सर्वीस - कोल्ड्रिंक वगैरे बरोबर वाईन्स वगैरे पण होतीच - पक्षांचा एक पिंजरा पण होता त्यांचा मंजुळ आवाज अधून मधून कानात पडत होता... आम्ही बऱ्यापैकी 'रिकव्हर' झालेलो, बिल वगैरे भरून त्या स्टेशन वर गेलो, आमच्या ५ही जणांची रिटर्न तिकीटे घटली आणि रांगेत उभे राहिलो. टेकडी वर जाण्या साठी असलेली ही विशेष रेल्वे, त्याबद्दल माहीती आणि काही जुनी छायाचित्रे स्टेशन वर लावलेली होती, सगळी कडे असतात तसेच इथे पण एक सुविनीयर शॉप होतेच, खुले स्टेशन असल्याने वातानुकूलित नव्हते त्यामुळे गरम होत होते, जरा चिडचिड पण होत होती, जवळपास १०-१५ मिनिटाने टेकडीवरून आली रेल्वे... सर्व जण 'आली एकदाची' अश्या भावनेने रेल्वेत जायला लागले, बऱ्यापैकी गर्दी होती, अर्धे जण उभे.. त्यात मी ही... आणि मग सुरु झाला तो ६-७ मिनिटांचा प्रवास. त्या टेकडीच्या बरोबर मध्यभागावर वर जाणारी आणि वरून खाली येणारी रेल्वे यांसाठी एकपदरी असलेले रूळ दुभागून दोन पदरी होतात तिथेच एक 'थांबा'.. इथे दोन्ही रेल्वे थांबतात, इथे उतरता येते... एका चर्च ला भेट द्यायला.. पण आम्ही ना थांबता थेट टेकडीवर जायचं ठरवलं होतं, तसाही वेळ कमी होता त्यात चर्च मध्ये वगैरे वेळ न घालवता जास्तितजास्त कसं फिरता येईल शहरात हे उद्दिष्ट होते. टीब्लिसी शहर दिसत हिते मस्त आजूबाजूला. १मिनिटाच्या त्या स्टॉप नंतर काहीवेळातच आम्ही त्या टेकडीवर पोहोचलो. उतरल्या वर स्टेशन वर बाहेर पडल्यावर दिसल्या पायऱ्या ... अजून वर घेऊन जाणाऱ्या.. अम्युजमेन्ट पार्क कडे, अन्वया खुश! उजवी कडे 'हे' / डावी कडे 'ते' अश्या पाट्या... अन्वयाचं सुरु झालं, आपण इथे जाऊ तिथे जाऊ, अमृता नीलम बसले तिथल्या एका बेंच वर मी सुरश्री अन्वया पायर्या चढत काय आहे काय नाही हे बघायला पुढे ... पायऱ्यांची शर्यंत अन्वयाची.. भलतीच खुश असल्याने आणि आजूबाजूला विविध खेळ पाहून तिला काय करू काय नको झालेले, पण गर्दी अजिबात नव्हती त्यामुळे खेळ ही बंद होते, हे तिला समजावून सांगण्यात मला नाके नऊ येत होते!
#सशुश्रीके ०८ जुलै २०१९
----
काही टेबल खुर्च्या आणि छत्र्या असलेल्या हॉटेलला पाहून आम्ही तिथे जायचा निर्णय घेतला, आत घुसून ही वेटर्स आम्हाला पाहून काही हालचाल करेना!.. एक बाई आली त्यांना पाहून वैतागून काहीतरी बोलली.. मग त्यांनी तिला पाहून / ऐकून हालचाल केली आणि आम्हाला या या बसा बसा केलं!... जॉर्जियात अश्या वेटर्स लोकांना पगार खूपच कमी असावेत त्यामुळे उदासीन 'सीन' असतो पर्यटकांना 'एन्टरटेन' करण्यात असा अंदाज... असो आत मस्त होतं वातावरण... लाकडी सगळं, रूम्स होत्या फॅमिलीसाठी... लाकडी पार्टीशन्स, पण गरम इतकं होत होतं! पंखे होते पण बंद, मग शुक शुक करत वेटर्स ना बोलवून उकडत आहे असा अभिनय करत पंखा चालू कराल का वगैरे प्रयत्न सुरु झाले, लागला पंखा... एक वयस्कर बाई आलेली 'असिस्ट' करायला, तिनेच आमची 'ऑर्डर' ही घेतली... एखादी खडूस आजी कशी वागेल तशी काहीशी वागत होती.. एकतर एकमेकांची भाषा काळत नसल्याने तिची चिडचिड होत असावी किंवा तिचा मूड नसावा आज असा काहीसा प्रकार... आम्ही ऑर्डर केली, त्यात पहिला प्रकार जो ऑर्डर केलेला तो लगेच आला!.. अक्ख कलिंगड कापून आमच्या टेबलावर!!! अन्वया तर उडालीच ... तिने कधी असं पाहिलेलं नव्हतं! आम्ही पण हसायला लागलो... मग हळू हळू टेबल भरू लागलं... सूप, पिझ्झा आणि अजून अनोळखी १-२ प्रकार.. एकूणच अती झालेलं सगळं, त्यात ते चीज म्हणजे, विचारू नका.. अन्वया तर चीज ला बघूनच डोळे मोठे करून आनंद व्यक्त करत होती दर वेळी.. आणि आमचे डोळे बारीक होत होते दर वेळी! त्यात मी आणि नीलम वाईन ही पीत होतो, पोट भरण्याचा परमोच्च गाठत बिल मागवले... सर्विस फारच स्लो असल्याने मी थेट काउंटर पाशी गेलो... तिथे कार्ड स्वाईप करायला दिले... टोटल बिल ९२ झालेले त्या बाईने गडबडीत ०.९२ चे बिल केले! मग काय? मला पण कळलं नाहीच, जरा गोंधळलो बिल बघून तितक्यात त्या बाईने बोलावलं परत ... हसली आणि म्हणाली परत करते बिल मग ९१ चे स्वाईप केलं कार्ड.
सशुश्रीके । ०४ ऑगस्ट २०१९
---
निवांत गरीब स्वच्छ जॉर्जिया - भाग १२
आमची पायपीट सुरु झाली परत, 'बोटानिकाल गार्डन'ला. युट्युब वर पाहिलं होतं, त्यामुळे इतकी उत्सुकता नव्हती... गार्डन सारखं गार्डन! त्यात काय बघायचंय, पण 'गो विथ द फ्लो' वगैरे म्हणत केबल कार पाशी... हो तीच आदल्या दिवशी पकडलेली... परत सर्व तेच, न थांबता चालू राहणारी... अन्वयाची धम्माल, फोटो काढत सगळं सेम सेम पण आता भर दुपारी. जाम गरम होत होतं, आणि त्यात आता गार्डन मध्ये चालायचं होतं हा विचार करूनच थकायला झालेलं! साधारण पावणे चार वाजता आम्ही पोचलो 'मदर ऑफ जॉर्जिया' पाशी, निमुळत्या पायऱ्या उतरत एका छोट्या चेक पॉईंट पाशी आलो, तिथे तिकीट घ्यावे लागते हे माहीत नव्हतं, मग काय सगळ्यांची तिकीटे घेतली, आणि सुरु सफर... चहूबाजूला हिरवळ, आणि पायवाट... ठरावीक अंतरांवर बसायला बाकडी, काही झाडांवर त्यांची नावे, माहिती/इतिहास... आरामात ४-५ किलोमीटर चा पल्ला असावा, जवळपास ४५ मिनिटांनी आम्ही एका ठिकाणी येऊन थांबलो... चौकच होता, पण गाड्यांचा रस्ता नाही... इतकच. पर्यटक फक्त, काही समूहात आलेले काही जोडपी, कुटुंब.
"एक झरा आहे" हे अमृता आम्ही इथे आल्यापासून सांगत होती, आम्ही जिथे थांबलो तिथून काहीच अंतरावर आहे... ही माहिती ही तिने दिली, पण नीलम आणि माझा उत्साह इतका रसातळाला गेलेला की 'आता बास्स' ह्या वाक्यावर आम्ही बाकड्यावर विराजमान झालो, ते पुढचे १०मिनीटे उठलोच नाही. सुरश्री आणि अन्वयाही कंटाळल्या होत्या चालून चालून, हिरवळ होती त्यामुळे उन्हाचा तडाखा कमी होता पण पायपीट झाल्यामुळे जरा 'मोराल' कमी झालेला. पाणी, मग ते बडीशोप वालं सरबत प्यायलं... तितक्यात १५मिनिटे गायब झालेली अमृता आली, म्हणाली "जा जा.. जवळच आहे! मस्त आहे धबधबा!..." आवाज तर येत होता.. अगदी बाजूलाच प्रवाह पण दिसत होता, नीलम काही उत्साह दाखवे ना, मी मनात विचार केला इतक्या लांब आलो आहोत तर जरा अजून चालू न बघूच कसा आहे! त्यात अमृता जाऊन आलेली, माझे पाय तयार केले मी... कदम कदम बढाए जा च्या तालावर पुढचे ७-८ मिनिटे घालवली.
धबधब्याचा आवाज! मस्तच... काय ग्रेट मोठा वगैरे नव्हता... पण पुलाच्या अगदी मधोमध, सूर्याच्या किराणामधून चमकणारा तो धबधबा डोळ्यांना मस्त भावला! काही १०-१२ पर्यटक होते काही पाण्यात काही माझ्यासारखे. मुलं तर पेटलेली पाण्यात! मी ही थोडं धाडस केलं आणि पाण्यात पाय टाकला... अहाहा... काय जबरदस्त थंड पाणी! सगळा थकवा काही सेकंदात गायब!!! त्या छोट्या छोट्या थंड दगडांवर अनवाणी पाय आणि आजूबाजूचा हिरवा परिसर, दुपार आणि संध्याकाळच्या मधली वेळ! झक्कासच एकदम, मग विचार आला अन्वयाला घेऊन आलच पाहिजे! झटकन वळालो, सुखावलेले पाय कोरडे करत नीलम, सुरश्री आणि अन्वयाला सांगायला गेलो, त्यांना अक्षरश: खेचूनच आणलं, आणि त्यांनी जेव्हा तो धबधबा/झरा पहिला! अन्वया तर आनंदाने नाचू लागली... पाण्यात खेळायचं ह्या विचारानेच ती वेडी होते, इथे तर अख्खा लहान तलाव होता, आम्ही दोघे मस्त उभे राहिलो, आता गर्दी वाढत चाललेली, काही अटी उत्साही मुलं वेड्यासारखी सूर वगैरे मारत होती, काहींना लागत ही होतं, काही पर्यटक अक्षरशः मोठ्या दगडांवर झोपलेले पाण्यात पाय सोडून. एकूणच कमाल वातावरण होते. साधारण ५:३० ला 'परत जाऊ आता' असा आवाज आला... अन्वयाची 'ना ना' ही सुरु झाली मग! सगळ्यांना जावंसं वाटत नव्हतच पण जावं ही लागणार होतं, त्यात गर्दीही वाढत चालली होती, मुलांची पाण्यात सूर मारण्याची खाज आता कोपरे/घुडगे फुटेपर्यंत गेलेली, हे सर्व पाहून अमृता म्हणाली 'आता निघूच!' मग काय निराशतेचे हावभाव करत अन्वया अमृता आणि सुरश्री परतीच्या वाटेला निघाले. मी आणि नीलम जरावेळानी येतो असं सांगत 'चिल' मारत बसलो! आम्ही परत निघणार तेव्हा काही जोडपी आलेली, बरोबर फोटोग्राफर्सही... कुठल्यातरी लग्नसमारंभ आटपून वगैरे नक्कीच! कारण टिपीकल ब्लॅक सूट... पांढरा रस्त्यावर ओघळणारा मुलींचा ड्रेस वगैरे! आणि १-२ नाही चांगली ४-५ कपल्स! गर्दी होतीच आता ह्यांचीही भर पडली त्यात. आम्ही काढता पाय घेतला शेवटी. बॅक टू टॉप आता, परत पायपीट!
सशुश्रीके । ०६ ऑगस्ट २०१९
निवांत गरीब स्वच्छ जॉर्जिया - भाग १०
नीलमच्या हातात चेरीज... माझ्या हातात कॅमेरा, अमृता आणि सुरश्रीच्या हातात अन्वयाचा हात... असे सगळे आम्ही चालायला लागलो, मुख्य शहर आणि आम्ही जिथे जात होतो ते - 'फनीक्युलर रेल्वे' ह्यामध्ये जो काही २०-२५ मिनिटाचा रास्ता होता अगदी पुण्यातल्या पेठांमधून जात आहोत की काय असा होता, जुनी २-३ माजली घरे, डागडुजीला आलेली, प्रत्येक घराखाली दुकाने, फळ-फुले, बेकरी.. मध्येच कपडे, सुविनीयर... वाईन शॉप्स असं सगळं!
हे सगळच गरीब, निवांत पण स्वच्छ ह्या तिन्ही गोष्टींची सारखी जाणीव करवून देणारे होते. अधूनमधून पार्किंग मध्ये थांबलेल्या जुन्या गाड्या माझे लक्ष वेधून घेत होती... सावली ऊन असा खेळ चालू होता अखंड, घरांच्या दरवाज्यांजवळ छान छान कुंड्या आणि त्यात विविध रंगांची फुले पण साथ देत होती आम्हाला, एक मस्त प्रसंगही दिसला मला, उन्हाळ्याचे दिवस असल्याने एक वडील घराच्या बाहेर बसलेले उघडे... त्याची दोन मुले ती पण उघडी मारामारीचा 'सराव' करत होते! मी आणि नीलम ते बघून हसत होतो... त्यांच्याच बाजूला एक जुनी गाडी पार्क केलेली होती, अश्या दोन गोष्टी केमेर्यात कैद करण्यात मी गुंतलेलो, अमृता सुरश्री अन्वय एका दुकानात शिरलेले. ते येताच आम्ही पुढे चालायला सुरुवात केली... काही इमारतींच्या बाहेर जॉर्जियाचे झेंडे पण लावलेले दिसले, चालत चालत आता चढ सुरु झाला, वेग मंदावत गेला आमचा, जुनी घरे जुन्या भिंती काही नवीन इमारतींची बांधकामे त्याच्या साठी बाहेर लावलेले पत्रे, त्यावर ग्राफिटी... इलेक्षन च्या वेळी आपल्या इथे चित्रविचित्र बॅनर पण इथे ग्राफिटी... ३-४ ठरलेल्या साच्यातून चेहरे / अक्षरे / अंक... काही मजकूर... हे सगळं छान दिसेल असे. ह्यातून काही शिकावं आपल्या लोकांनी! प्रचार करा पण तो विभित्स कसा नसावा उलट आकर्षित करणारा असावा असं काही! चालताना लक्ष जावं म्हणून फूटपाथ वरही ग्राफिटी चा छान वापर केलेला! ह्याला म्हणतात 'क्रीएटीव्हिटी'.
दिसलं... त्या रेल्वेचं स्टेशन दिसलं! पण तिथे जाण्याआधी काहीतरी थंड पिऊन आराम करायचा होता, एक छान छोटं केफे होतं त्यात पुढे गेलेले सुरश्री अमृता अन्वया आधीच जाऊन स्थानापन्न झालेले, कुकीज आणि कॉर्ड्रिन्क्स घेऊन शांत निवांत बसलेले... मी आणि नीलम ही जाऊन बसलो. गप्पा मारल्या छान.. हसणे खिदळणे चालू होतं अखंड, एकूणच धम्माल चालू होती. छान होते ते केफे ही... सेल्फ सर्वीस - कोल्ड्रिंक वगैरे बरोबर वाईन्स वगैरे पण होतीच - पक्षांचा एक पिंजरा पण होता त्यांचा मंजुळ आवाज अधून मधून कानात पडत होता... आम्ही बऱ्यापैकी 'रिकव्हर' झालेलो, बिल वगैरे भरून त्या स्टेशन वर गेलो, आमच्या ५ही जणांची रिटर्न तिकीटे घटली आणि रांगेत उभे राहिलो. टेकडी वर जाण्या साठी असलेली ही विशेष रेल्वे, त्याबद्दल माहीती आणि काही जुनी छायाचित्रे स्टेशन वर लावलेली होती, सगळी कडे असतात तसेच इथे पण एक सुविनीयर शॉप होतेच, खुले स्टेशन असल्याने वातानुकूलित नव्हते त्यामुळे गरम होत होते, जरा चिडचिड पण होत होती, जवळपास १०-१५ मिनिटाने टेकडीवरून आली रेल्वे... सर्व जण 'आली एकदाची' अश्या भावनेने रेल्वेत जायला लागले, बऱ्यापैकी गर्दी होती, अर्धे जण उभे.. त्यात मी ही... आणि मग सुरु झाला तो ६-७ मिनिटांचा प्रवास. त्या टेकडीच्या बरोबर मध्यभागावर वर जाणारी आणि वरून खाली येणारी रेल्वे यांसाठी एकपदरी असलेले रूळ दुभागून दोन पदरी होतात तिथेच एक 'थांबा'.. इथे दोन्ही रेल्वे थांबतात, इथे उतरता येते... एका चर्च ला भेट द्यायला.. पण आम्ही ना थांबता थेट टेकडीवर जायचं ठरवलं होतं, तसाही वेळ कमी होता त्यात चर्च मध्ये वगैरे वेळ न घालवता जास्तितजास्त कसं फिरता येईल शहरात हे उद्दिष्ट होते. टीब्लिसी शहर दिसत हिते मस्त आजूबाजूला. १मिनिटाच्या त्या स्टॉप नंतर काहीवेळातच आम्ही त्या टेकडीवर पोहोचलो. उतरल्या वर स्टेशन वर बाहेर पडल्यावर दिसल्या पायऱ्या ... अजून वर घेऊन जाणाऱ्या.. अम्युजमेन्ट पार्क कडे, अन्वया खुश! उजवी कडे 'हे' / डावी कडे 'ते' अश्या पाट्या... अन्वयाचं सुरु झालं, आपण इथे जाऊ तिथे जाऊ, अमृता नीलम बसले तिथल्या एका बेंच वर मी सुरश्री अन्वया पायर्या चढत काय आहे काय नाही हे बघायला पुढे ... पायऱ्यांची शर्यंत अन्वयाची.. भलतीच खुश असल्याने आणि आजूबाजूला विविध खेळ पाहून तिला काय करू काय नको झालेले, पण गर्दी अजिबात नव्हती त्यामुळे खेळ ही बंद होते, हे तिला समजावून सांगण्यात मला नाके नऊ येत होते!
#सशुश्रीके ०८ जुलै २०१९
----
निवांत गरीब स्वच्छ जॉर्जिया - भाग ११
अन्वयाला काही ना काही तरी खेळायचं होतच, साहजिकच आहे म्हणा!... वय ७ तीचं... पायऱ्या चढत चढत तिला सर्व राइड्स कश्या बंद आहेत वगैरे सांगत वर गेलो, तिथे ती व्हर्च्युअल रिऍलिटी वाली एक खुर्ची होती, ज्यात बसून भयानक मनोरंजक राइड्स मध्ये बसल्यासारखा आनंद मिळतो, त्याच.. ज्या दुबईत/मुंबईत/पुण्यात पण असतात... पण आता काहीच नाही तर हे! मग काय बसवली तिला त्यात.. ५-१० मिनीट घालवली, खुश मुलगी, तिथून मग उंचावरून दिसणाऱ्या टिबलीसी शहराचे फोटो वगैरे काढत... जवळच असलेल्या एका मोठ्या कारंज्याच्या पाण्यात हात वगैरे डुंबवत आम्ही परत खाली यायला निघालो, वाटेत पैसे देऊन 'रीफ्रेशमेंट' वगैरे केली, आता सकाळपासून चालून वगैरे भूक लागलेली! परत त्या फनीकुलर च्या स्टेशन वर गेलो... खाली आलो. स्टेशन च्या बाहेर पडताच टॅक्सी मिळाली... लोकल गाडी होती एक, त्याला मीटर वगैरे काही नाही, थेट हॉटेल च्या आसपास जायचा निर्णय घेतला, परत निमुळते रस्ते काहीसे ट्राफिक, परत जुन्या वास्तू असं सगळं बघत, अनुभवत आम्ही त्या क्लॉक टॉवर पाशी आलो... मुख्य चौक. (अपेक्षित क्लॉक टॉवर भलताच अपेक्षित होता, पण आता 'असो'राहूदे आता असा पवित्र ठेवत आम्ही उतरलो) उतरल्या उतरल्या एक बांगलादेशी मेनू कार्ड दाखवत इंडियन फूड वगैरे सांगत आला.. नीलम म्हणाला, नही भाय, इधर आले इंडियन फूड नाही खाना है! हे ऐकताच त्याने बॅक फूट मारला... जरा पुढे गेलो तर तिथे आम्हाला पाहून एक सुबक ठेंगणी मेनू कार्ड घेऊन आली आमच्या जवळ, सुरश्री सगळं सांभाळत होती... म्हणजे कुठे जायचं.. शाकाहारी कुठे मिळू शकेल वगैरे, शेवटी जरासं अजून पुढे चालत गेलो... तिथे जेवायचं ठरलं.काही टेबल खुर्च्या आणि छत्र्या असलेल्या हॉटेलला पाहून आम्ही तिथे जायचा निर्णय घेतला, आत घुसून ही वेटर्स आम्हाला पाहून काही हालचाल करेना!.. एक बाई आली त्यांना पाहून वैतागून काहीतरी बोलली.. मग त्यांनी तिला पाहून / ऐकून हालचाल केली आणि आम्हाला या या बसा बसा केलं!... जॉर्जियात अश्या वेटर्स लोकांना पगार खूपच कमी असावेत त्यामुळे उदासीन 'सीन' असतो पर्यटकांना 'एन्टरटेन' करण्यात असा अंदाज... असो आत मस्त होतं वातावरण... लाकडी सगळं, रूम्स होत्या फॅमिलीसाठी... लाकडी पार्टीशन्स, पण गरम इतकं होत होतं! पंखे होते पण बंद, मग शुक शुक करत वेटर्स ना बोलवून उकडत आहे असा अभिनय करत पंखा चालू कराल का वगैरे प्रयत्न सुरु झाले, लागला पंखा... एक वयस्कर बाई आलेली 'असिस्ट' करायला, तिनेच आमची 'ऑर्डर' ही घेतली... एखादी खडूस आजी कशी वागेल तशी काहीशी वागत होती.. एकतर एकमेकांची भाषा काळत नसल्याने तिची चिडचिड होत असावी किंवा तिचा मूड नसावा आज असा काहीसा प्रकार... आम्ही ऑर्डर केली, त्यात पहिला प्रकार जो ऑर्डर केलेला तो लगेच आला!.. अक्ख कलिंगड कापून आमच्या टेबलावर!!! अन्वया तर उडालीच ... तिने कधी असं पाहिलेलं नव्हतं! आम्ही पण हसायला लागलो... मग हळू हळू टेबल भरू लागलं... सूप, पिझ्झा आणि अजून अनोळखी १-२ प्रकार.. एकूणच अती झालेलं सगळं, त्यात ते चीज म्हणजे, विचारू नका.. अन्वया तर चीज ला बघूनच डोळे मोठे करून आनंद व्यक्त करत होती दर वेळी.. आणि आमचे डोळे बारीक होत होते दर वेळी! त्यात मी आणि नीलम वाईन ही पीत होतो, पोट भरण्याचा परमोच्च गाठत बिल मागवले... सर्विस फारच स्लो असल्याने मी थेट काउंटर पाशी गेलो... तिथे कार्ड स्वाईप करायला दिले... टोटल बिल ९२ झालेले त्या बाईने गडबडीत ०.९२ चे बिल केले! मग काय? मला पण कळलं नाहीच, जरा गोंधळलो बिल बघून तितक्यात त्या बाईने बोलावलं परत ... हसली आणि म्हणाली परत करते बिल मग ९१ चे स्वाईप केलं कार्ड.
बाहेर आलो..
तिथे काही पोलीस.. काही नाहीच, चांगले अर्धा डझन पोलीस काही गरीब / भिकारी
लोकांना एका ठिकाणी गोळा करून त्यांची नावे वगैरे नमूद करत होते, आणि हा
प्रकार सुरु झालेला जेव्हा आम्ही हॉटेलात शिरत होतो.. म्हणजे गेला १ तास हा
कार्यक्रम चालू होताच... असो, प्रत्येक देशात असले काही ना काहीतरी
असतेच.. पद्धत आणि रुबाब वेगळा! फोटो कळेलच तुम्हाला... आता पुढे जायचं
होतं 'बोटानिकाल गार्डन'ला.. त्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सारख्या - मदर ऑफ
जॉर्जियाच्या पुतळ्याच्या पाठीमागेच. आमची पायवाट सुरु झाली परत!
सशुश्रीके । ०४ ऑगस्ट २०१९
---
निवांत गरीब स्वच्छ जॉर्जिया - भाग १२
आमची पायपीट सुरु झाली परत, 'बोटानिकाल गार्डन'ला. युट्युब वर पाहिलं होतं, त्यामुळे इतकी उत्सुकता नव्हती... गार्डन सारखं गार्डन! त्यात काय बघायचंय, पण 'गो विथ द फ्लो' वगैरे म्हणत केबल कार पाशी... हो तीच आदल्या दिवशी पकडलेली... परत सर्व तेच, न थांबता चालू राहणारी... अन्वयाची धम्माल, फोटो काढत सगळं सेम सेम पण आता भर दुपारी. जाम गरम होत होतं, आणि त्यात आता गार्डन मध्ये चालायचं होतं हा विचार करूनच थकायला झालेलं! साधारण पावणे चार वाजता आम्ही पोचलो 'मदर ऑफ जॉर्जिया' पाशी, निमुळत्या पायऱ्या उतरत एका छोट्या चेक पॉईंट पाशी आलो, तिथे तिकीट घ्यावे लागते हे माहीत नव्हतं, मग काय सगळ्यांची तिकीटे घेतली, आणि सुरु सफर... चहूबाजूला हिरवळ, आणि पायवाट... ठरावीक अंतरांवर बसायला बाकडी, काही झाडांवर त्यांची नावे, माहिती/इतिहास... आरामात ४-५ किलोमीटर चा पल्ला असावा, जवळपास ४५ मिनिटांनी आम्ही एका ठिकाणी येऊन थांबलो... चौकच होता, पण गाड्यांचा रस्ता नाही... इतकच. पर्यटक फक्त, काही समूहात आलेले काही जोडपी, कुटुंब.
"एक झरा आहे" हे अमृता आम्ही इथे आल्यापासून सांगत होती, आम्ही जिथे थांबलो तिथून काहीच अंतरावर आहे... ही माहिती ही तिने दिली, पण नीलम आणि माझा उत्साह इतका रसातळाला गेलेला की 'आता बास्स' ह्या वाक्यावर आम्ही बाकड्यावर विराजमान झालो, ते पुढचे १०मिनीटे उठलोच नाही. सुरश्री आणि अन्वयाही कंटाळल्या होत्या चालून चालून, हिरवळ होती त्यामुळे उन्हाचा तडाखा कमी होता पण पायपीट झाल्यामुळे जरा 'मोराल' कमी झालेला. पाणी, मग ते बडीशोप वालं सरबत प्यायलं... तितक्यात १५मिनिटे गायब झालेली अमृता आली, म्हणाली "जा जा.. जवळच आहे! मस्त आहे धबधबा!..." आवाज तर येत होता.. अगदी बाजूलाच प्रवाह पण दिसत होता, नीलम काही उत्साह दाखवे ना, मी मनात विचार केला इतक्या लांब आलो आहोत तर जरा अजून चालू न बघूच कसा आहे! त्यात अमृता जाऊन आलेली, माझे पाय तयार केले मी... कदम कदम बढाए जा च्या तालावर पुढचे ७-८ मिनिटे घालवली.
धबधब्याचा आवाज! मस्तच... काय ग्रेट मोठा वगैरे नव्हता... पण पुलाच्या अगदी मधोमध, सूर्याच्या किराणामधून चमकणारा तो धबधबा डोळ्यांना मस्त भावला! काही १०-१२ पर्यटक होते काही पाण्यात काही माझ्यासारखे. मुलं तर पेटलेली पाण्यात! मी ही थोडं धाडस केलं आणि पाण्यात पाय टाकला... अहाहा... काय जबरदस्त थंड पाणी! सगळा थकवा काही सेकंदात गायब!!! त्या छोट्या छोट्या थंड दगडांवर अनवाणी पाय आणि आजूबाजूचा हिरवा परिसर, दुपार आणि संध्याकाळच्या मधली वेळ! झक्कासच एकदम, मग विचार आला अन्वयाला घेऊन आलच पाहिजे! झटकन वळालो, सुखावलेले पाय कोरडे करत नीलम, सुरश्री आणि अन्वयाला सांगायला गेलो, त्यांना अक्षरश: खेचूनच आणलं, आणि त्यांनी जेव्हा तो धबधबा/झरा पहिला! अन्वया तर आनंदाने नाचू लागली... पाण्यात खेळायचं ह्या विचारानेच ती वेडी होते, इथे तर अख्खा लहान तलाव होता, आम्ही दोघे मस्त उभे राहिलो, आता गर्दी वाढत चाललेली, काही अटी उत्साही मुलं वेड्यासारखी सूर वगैरे मारत होती, काहींना लागत ही होतं, काही पर्यटक अक्षरशः मोठ्या दगडांवर झोपलेले पाण्यात पाय सोडून. एकूणच कमाल वातावरण होते. साधारण ५:३० ला 'परत जाऊ आता' असा आवाज आला... अन्वयाची 'ना ना' ही सुरु झाली मग! सगळ्यांना जावंसं वाटत नव्हतच पण जावं ही लागणार होतं, त्यात गर्दीही वाढत चालली होती, मुलांची पाण्यात सूर मारण्याची खाज आता कोपरे/घुडगे फुटेपर्यंत गेलेली, हे सर्व पाहून अमृता म्हणाली 'आता निघूच!' मग काय निराशतेचे हावभाव करत अन्वया अमृता आणि सुरश्री परतीच्या वाटेला निघाले. मी आणि नीलम जरावेळानी येतो असं सांगत 'चिल' मारत बसलो! आम्ही परत निघणार तेव्हा काही जोडपी आलेली, बरोबर फोटोग्राफर्सही... कुठल्यातरी लग्नसमारंभ आटपून वगैरे नक्कीच! कारण टिपीकल ब्लॅक सूट... पांढरा रस्त्यावर ओघळणारा मुलींचा ड्रेस वगैरे! आणि १-२ नाही चांगली ४-५ कपल्स! गर्दी होतीच आता ह्यांचीही भर पडली त्यात. आम्ही काढता पाय घेतला शेवटी. बॅक टू टॉप आता, परत पायपीट!
सशुश्रीके । ०६ ऑगस्ट २०१९
Wah masta lihila ahes nehami pramane
ReplyDeleteखूप सुंदर लिहिले आहे..
ReplyDelete😁👌👌
ReplyDeleteGmadlobt (thank you)
Deleteमाहद-लो-बाह (दोन्ही ह सेमी सायलन्ट)