Posts

Showing posts from June, 2019

Father's day

Image
Father's day होता म्हणे काल, काय आहे ना... माझ्यासाठी जवळपास रोजचं आहे हे, आजूबाजूला इतक्या वस्तू आहेत, मनात आठवणी इतक्या आहेत... त्यात तो गाड्यांचा / छायाचित्र काढायचा छंद! अगदी पदोपदी आहेत बाबा माझ्याबरोबर... कळत नकळत अखंड बाबांच्या आजूबाजूलाच असतो मी, काल नेमका हा जागतिक दिवस असताना बाबांबद्दल काही लिहिलं नाही ह्याची रुखरुख नको म्हणून लिहितोय आता. जे आहे ते आहे.. विसरलो! त्यात मॅच होती... हो हो मॅच च्या पण आठवणी आहेत. काय लिहू काय नको असं झालय आता. असो... बाबा सगळ्यांनाच असतात, कोणी जवळ असतात कोणी लांब असतात, शेवटी बाबा ते बाबाच... आपण लहान असतानाचे बाबा आणि मोठेपणातल्या बाबांचा आपला प्रवास कसा घडतो ह्याबद्दल विचार केला की प्ले बटण आणि पुढे सरकणारी कैसेट आठवते... ती A साईड आणि मग B साईड! काय तुम्ही समजायचात त्यांना आणि काय त्यांचा मनात असेल, हे सगळं आता बाप झाल्यावर कळतं, कैसेट संपल्यावर! 😢 आणि ती कैसेट परत ऐकायची असेल तर इजेक्ट नावचं बटण देवाने काढून घेतलेलं असतं, आली का पंचाईत! 😤मग काय करा रिवाईंड... ऐका ती साईड B! द रिअल साईड ऑफ लाईफ. रट्टा मारून डोळ्यातून पाणी काढणारे

निवांत गरीब स्वच्छ जॉर्जिया

Image
निवांत गरीब स्वच्छ जॉर्जिया - भाग १ माझ्या बाबतीत सिनेमा नाटक असो किंवा कुठला काँसर्ट... तिकिटं घ्यायची आणि प्रत्यक्षात टायटल / सुरुवात आल्याशिवाय जे तिकीट घेतलय त्या इव्हेन्टचा विचारच करायचा नाही, कारण काय!? वेळच नाही... असं काहीसं ह्या जॉर्जिया ट्रिप बद्दल पण घडलं. बायकोने अचानक मित्रांशी बोलता बोलता ईद सुट्ट्यांना दर वर्षी प्रमाणे दुबईतच बसण्या पेक्षा कुठेतरी जाऊ ह्यावर चर्चा झाली आणि मी आणि नीलम सुरश्री पण "हो हो जाऊ की" चा 'मिले सूर मेरा तुम्हारा' सारखं केलं न लगेच आणि बघता बघता जॉर्जियाचा प्लान झाला पण... तिकिटं, रहायचे प्लॅनिंग... कुठे फिरायचं काय बघायचं सगळं काही बायको न सुरश्री नीलम ने ठरवलं, मी आपला हं हं करत संभाषण / काहीही निर्णय घ्यायचे टाळत होतो... आणि मग तो दिवस आला! आता उद्या जायचं आहे, मला कधीची फ्लाइट आहे हे पण माहीत नव्हतं, लाज वाटली म्हणून गूगल वर 'माय नेक्स्ट फ्लाइट' असे शोधले तेव्हा कळलं सकाळी ९:५०ला उड्डाण आहे आणि त्यासाठी लवकर उठून शार्जाला निघायचं आहे, ह्या विचाराने झोप येईना, मग काय सकाळी उठायच्या वेळेला झोपायची स्वप्न