'राधानगरी'
'राधानगरी' मुंबापुरीमधल्या बोरीवलीच्या 'श्रीगणेश' मधून त्र्यांणव साली पूण्यनागरीत आम्ही राहायला आलो, मॉडेल कॉलनीत, मस्त हिरवागार परिसर! प्रसिद्ध चित्रकार रवी परांजप्यांच्या घरा समोर पोस्ट ऑफिस आणि त्या पोस्ट ऑफिसच्या लगतचीच 'राधानगरी' नावाची तीन मजली इमारत, त्यातच आम्ही श्री.भगवान रबडेंकडून एक वन बीएचके विकत घेतला आणि आमचे 'पुणेरी' जीवन सुरु झाले. खिडकी उघडली की गुलमोहराची थंडगार हिरवी सावली आणि त्यात त्याची लाल फुले आणि शेंगा डोकावत! त्या हिरव्या गर्दीत समोरच्या पोस्ट ऑफिस आणि बैडमिंटन कोर्टचा १०-२०% भाग दिसत असे, पावसाळ्यात तर हा सगळा परिसर इतका 'कूल' दिसायचा... आपलं यूरोपच ते! काही गमतीदार क्षण आठवतायत त्यातला एक ठळक पणे आठवतो तो हा.. एक भंगारवाला आणि एक केळीवाली रोज दुपारी त्याचा 'बिझनेस' करायला यायचे, त्यांची जाहिरात ते स्वतःच्या 'सिग्नेचर' शैलीत करीत, भंगारवाला इमारतीच्या एका बाजूला आणि केळीवाली दुसऱ्या, पण भिन्न रास्त्यावर असूनही त्यांची ती ओरडण्याची अचूक वेळ असा काहीसा 'रीझल्ट' देऊन जाई --- 'भंगा...