Posts

Showing posts with the label sashishreeke

व्योमकेश (ब्योमकेश) बक्षी...

Image
स्वप्नात दिसलेला एकदा... खूप प्रयत्न केला त्याने मला 'कलक्त्याला ये एकदा!' वगैरे सांगून, पण नाही... पुणे सोडवेना, इथे खून वगैरे ते पण रहस्यमय वगैरे अशक्यच, झोपेच्या वेळेत १-४दुपारी शक्य आहे, पण कोण सोडणार दुपारची झोप, आणि झालाच जर खून, तर कोण ठेवणार लक्ष... असो विषय भरकटत आहे! तर सांगायचं असं की हा रजीत कपूर! जणू ह्या रोल साठीच बनलेला, त्यानंतर च्या सर्व भूमिका त्याने केल्या असतील खास, पण... पण ही व्योमकेश मधली सरलता, सहज पणा... त्याचं ते हसणं, गू ढता खुलवणं, जरा फारच भारी! त्यात लहानपणी पाहिलेली मालिका, आठवत नाही म्हणून परत पाहिलेली दूरदर्शन वरच, मग आता युट्युब वरून, म्हणजे एक एपिसोड निदान ३दा तरी नक्कीच पाहिलाय... सुरुवातच काय खास शीर्षक वादनाने, कोणीतरी झपाटलाय खुनी ला पकडायला, पण प्रत्यक्षात मात्र थंड डोक्याचा, उंच, शिडशिडीत... कमालीचा हुशार आपला देशी जासुस! व्योमकेश नंतर खूप आले गेले... त्यावर हिंदी सिनेमा पण आला... वेगळा होता, छान संगीत, जरा हटके... पण मालिकेतली सरलता गाठता आली नाही, 'एक्शन' ला बाजूला ठेऊन व्योमकेश बक्षी मालीकेनी जी मजल मारल...

जूनं ते सोनं!

Image
हा फोटो पाहिला आणि एकच आलं मनात...   जूनं ते सोनं ! जुने  # Walkman किंवा कुठले ही # Portable cassette player पाहिले आत्ता की काय वेगळच वाटतं! Side A/B Head साफ करा, # Cassette जाम झाली की pencil ने नीट करा... नाजूक # Earphones ना सांभाळा, सारख्या batteries बदला... किंवा rechargeable batteries charge करत बसा, मग नंतर नंतर advance level आले... दोन्ही side cassette न काढता # Play करता यायला लागले, २ च्या ऐवजी एकाच batteryवर काम व्हायला लागले, Manual # equalizer मग # Pop #R ock # Jazz # Clas sical सारखे #P resets येऊ लागले! आणि मग # CD आता # usb , त्यातल्या त्यात cd players ने जराशी धूम केली, पण portable cassette players नी आपल्या सारख्या #Music lovers च्या मनात एक घर केलं, त्या घराचं रूपांतर बंगल्यात केलं... आणि आता ते घर स्वप्न होतं की काय असं वाटू लागलय! जुन्या गोष्टींमध्ये एक कमालीची शक्ती असते, जसं आयुष्यात काही नवीन घडावं, यावं असं वाटतं तीतकच हे असं जुनं परत यावं नवीन करकरीत होऊन असं वाटतं, आणि जगात अश्या गोष्टीही आहेत ज्या जुन्या अ...

खरा इतिहास आणि सादर केलेली कहाणी... ह्यांचा उत्तम मेळ म्हणजे 'NARCOS' मलिका. (Series Review)

Image
खरा इतिहास आणि सादर केलेली कहाणी ह्यांचा उत्तम मेळ म्हणजे 'NARCOS' मलिका.   खरा इतिहास आणि सादर केलेली कहाणी ह्यांचा उत्तम मेळ म्हणजे #NARCOS मलिका. अमेरिकेत गुन्हेगार साक्षीदाराला गायब करतो, कोलम्बियात 'पाब्लो' ने कोर्टच गायब केलं! - 'स्टीव्ह मर्फी.' आता हा पाब्लो कोण न हा स्टीव्ह कोण! सांगतो सांगतो... तर हा पाब्लो आहे ना तो खलनायक आहे मालिकेचा, मालिकाचे नाव आहे 'नार्कोस'... (अमली पदार्थांची निर्मिती/तस्करी करणारे ते 'नार्कोस') त्या पाब्लोच्या मागे लागलेला पोलीस म्हणजे स्टीव्ह आणि त्याचा सहकारी पण आहे एक हावी नावाचा, दोघे DEA agent . दोघे मिळून त्या पाब्लोला पकडायला जे शक्य असेल ते सर्व करत असतात, अगदी शेवट पर्यंत! असं सगळं आहे बघा, म्हणजे पोलीस आणि गुन्हेगार ह्यामधली झकाझकी, पण ह्यात वेगळं काय असा प्रश्न पडला असेल! तर वेगळेपण असय की ही कथा सत्य कथेवर आधारित आहे, जवळपास ५ ते १०% भाग रेकॉर्डेड चित्रफितींचा वापर करून सादर केलेला आहे, फारच डोकेबाज पद्धतीने तेव्हाच्या बातम्या आणि काही खाजगी चित्रफीती वापर करून वास्तविकता अजून प्रभावीपणे दाखवण्...

#बाबा तू...

Image
बाबा तू... एक हिरो होतास तू, एक व्हिलन पण होतास तू, जसा हसवायचास तू, तसा रडवायचास पण तू. किती तरी दूर राहून जवळ होतस तू, एखाद्या सेलिब्रीटी सारखा जणू, भासलास तू. माझ्या हट्टांना क्वचितच 'नाही' म्हणालास तू, स्वतःचं दुःख कधीच सांगितलं नाहीस तू. आणि मग... फारच लवकर सोडून गेलास तू! तू परत ये रे तू... एकदा भेटू, एकदा हातात हात दे तू... एकदा मिठी मार तू, एकदा काही तरी चमत्कार घडव तू! कारण बाबा तू... तू माझा हिरो होतास, आज ही आहेस तूच. नक्की परत ये तू... तुझ्या साठी अजून ही तोच समीर, कोणी वाढू दिलाच नाही जणू... अजून ही बालिश, तोच गोरा घारा, तुझ्या कैमेराचा तारा! तू माझे काढलेले शेकडो फोटो... ते बघताना नेहमी दिसतोस केमेऱ्या मागचा तू! बघ बरं... तो शेवटचा रोल का निगेटिव्ह सोडलायस तू

तो हरवलाय...

जाड भिंगाचा चश्मा, दोरीने डागडूजी करून गळ्यात अडकवलेला... पूर्ण पांढरे केस,२-३एमएम वाढलेली दाढी, ती पण पूर्ण पांढरी... मळलेला फूल बह्यांचा शर्ट, अखूड राखाडी प्यांट, समोरचे बहुतेक अर्धे दात गैरहजर, स्लीपर्स झीजून कागद झालेल्या, दुपारच्या भर उन्हात तो साठीतला जीव अजुन ही दिसतो, "भंगार बाटलेय, भंगार बाटलेय" १०-१२ वर्ष झाली असतील... तेव्हा पासून बघतोय,  त्या दोन-तीन च्या भर उन्हात  "भंगार बाटलेय, भंगार बाटलेय" आमच्या घरी मी वीकेंडलाच सापडायचो, तेव्हा दुपारची आवरावरी व्हायची महिन्या दोन महिन्यातून,  मी आमच्या इथे येणाऱ्या चार पाच भंगारवाल्यांपैकी ह्या भंगारवाल्याचा आवाज नीट ओळखायचयो,  थांबवायचो... नको ते सामन बाजूला ठेवत,  आणि पाहिजे त्या सामानाचं वजन करत.. "२० रुपये होतात सह्येब..." तेवढ्यात आई यायची...  मग २० चे २५ व्हायचे. नंतर मी दुबइत गेलो,  आता वर्षातून एक-दोनदाच जमतं, पण तेव्हाही हा भंगारवाला दिसतोच! ३-४ वर्षांपूर्वी त्यानी आइला एक पत्र दिलेले, आइला सांगितलं की मी आलो की मला हे द...पेपर मध्ये पब्लिश करायला सांगा,  (त्यानी मला ८ वर्षांपुर्वी वि...