Posts

Showing posts from March, 2016

हल्ली मी DD न्यूजच बघतो...

हल्ली मी DD न्यूजच बघतो, जाहिराती नसतात, मर्डर/ऍक्सिडेंट/बलात्कार च्या बातम्या नसतात, ठळक म्हणजे फक्त ठळक बातम्याच! आत्ता पण लावलाय नेमकी उर्दू भाषा बातमीपत्र लागलंय, उर्दू भाषा मस्तच, पण गझल पुरतीच, उर्दूत बातम्या ऐकल्या की 'धमकी' फीलिंग येतं संस्कृत बातम्या ऐकायला मजा येते, श्लोकांतून बातम्या बाहेर येतायत असे काही तरी वाटतं! उर्दू तुन RSS बद्दल कौतुक ऐकताना काय 'सकून' मिळतोय! वाह... काल 'इतर' बातम्यांमध्ये ऐकले की 'काही' इसम RSS ची तुलना ISIS शी करतायत! हसू का रडू कळेना हो!!! पण डीडी ने कात टाकली असं म्हणता येत नाही. अजूनही तेच ते निर्विकार चेहर्यानी बातम्या सांगणारे! कुठून शोधून आणतात कळत नाही. पण आजच्या भडक न्यूज चॅनलपेक्षा हेच गुळमूळीत डीडी बरं वाटतं!

दुष्ट दुष्काळ

परळी वैज्यनाथ दर्शन झाले, आता अंबेजोगाईला जाऊन जोगेश्वरी देवीचे दर्शन घ्यायचे होते, आई आणि मी देवळाच्या समोरच्याच एका स्टॉल वर उत्तप्पा/डोसा खाल्ला, मस्तच होता! बरोबर पाण्याची बाटली होतीच त्यामुळे 'मिनरल वॉटर' टेबलावर होतं तसंच राहिलं, जरा गम्मत वाटली... दुबईत 'मिनरल वॉटर' बघायची सवय आहे हॉटेलांमध्ये, पण इथे स्टॉल लावलेल्या छोट्या हॉटेलात पण तोच प्रकार पाहून जरा वेगळं वाटलं. असो, आता अंबेजोगाईला जाऊन दर्शन घ्यायला आम्ही मोकळे, पण त्याआधी आईच्या पौरोहित्य क्लास मधल्या एका मुलीच्या आई वडिलांकडे भेट द्यायची होती, साधारण ४५-५०मिनिटे लागतात परळीहुन अंबेजोगाई एसटीने... साधारण १२च्या सुमारास आम्ही त्यांच्याकडे गेलो, घरात गेल्यावर मस्तपैकी खुर्चीवर बसल्यावर हायसं वाटलं, कारण त्या एसटीचे टायर जणू लोखंडाचे आणि सस्पेन्शन जणू रबरी... आणि परत स्टेशनहुन चालत रस्ता शोधत शोधत जवळ जवळ अर्धा तासाची पायपीट झालेली! रस्त्यात डाळिंबेवाला दिसला... एक किलो डाळिंबे घेऊन आम्ही घर शोधत शेवटी पोहोचलो. वय असेल ६०-६५च्या आसपास, काकूंचा एकही केस पांढरा नाही आणि काकांचा एकही केस काळा नाही, हे आ...