हल्ली मी DD न्यूजच बघतो...

हल्ली मी DD न्यूजच बघतो, जाहिराती नसतात, मर्डर/ऍक्सिडेंट/बलात्कार च्या
बातम्या नसतात, ठळक म्हणजे फक्त ठळक बातम्याच! आत्ता पण लावलाय नेमकी उर्दू
भाषा बातमीपत्र लागलंय, उर्दू भाषा मस्तच, पण गझल पुरतीच, उर्दूत बातम्या
ऐकल्या की 'धमकी' फीलिंग येतं संस्कृत बातम्या ऐकायला मजा येते, श्लोकांतून
बातम्या बाहेर येतायत असे काही तरी वाटतं!

उर्दू तुन RSS बद्दल कौतुक ऐकताना काय 'सकून' मिळतोय! वाह...
काल 'इतर' बातम्यांमध्ये ऐकले की 'काही' इसम RSS ची तुलना ISIS शी करतायत! हसू का रडू कळेना हो!!!

पण डीडी ने कात टाकली असं म्हणता येत नाही. अजूनही तेच ते निर्विकार चेहर्यानी बातम्या सांगणारे!
कुठून शोधून आणतात कळत नाही. पण आजच्या भडक न्यूज चॅनलपेक्षा हेच गुळमूळीत डीडी बरं वाटतं!

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!