Posts

Showing posts from August, 2017

कहाण्या WW2 च्या

Image
• नाझींनी केलेल्या लाखो लोकांच्या अत्याचारा पैकी ही एक बाई ,  सुदैवाने वाचलेली, तिचे अनुभव आणि तिच्या मुलांकडून आणि मग नातवंडांकडून तिच्या बद्दल झालेले कौतुक खरच पाहण्यासारखं आहे! एके दिवशी आपल्या मुलाला तिने ही कहाणी सांगितली, 'मला सर्वात छान वाढदिवस भेट काय मिळाली असेल!?' मुलगा सांगत होता, काय असेल नेमकं... एखादा ड्रेस, अमुक तमुक. तर तिने हा किस्सा सांगितला... ती होलोकोस्टच्या एका कैंपात असताना तिची एक मैत्रण दिवसभर गायब होती, त्यावेळी एखादं ओळखीचं असणं म्हणजे फारच दुर्मिळ, आई वडील बहिणी भाऊ सगळे वेगळे झालेले असायचे, असो... दिवसभर गायब असलेल्या आपल्या मैत्रिणीबद्दल तिला काळजी वाटू लागली, आणि त्यावेळी कुठलीही व्यक्ती अशी गायब होणे म्हणजे 'मरणे' असाच अर्थ असायचा, पण ६च्या आसपास ती मैत्रीण भेटली, म्हणाली 'आज लेबर कॅम्प मध्ये जास्त काम केलं, आणि एक जास्तीचा ब्रेड मिळवला, तुझा वाढदिवस होता ना, तुला ब्रेड द्यायचा होता मला...' अस म्हणत तिने ब्रेड हातात दिला माझ्या. हे बघताना ऐकताना खड्डा पडला हो! लोकांना काय काय पाहावं करावं लागतं आयुष्यात, आपण खरच कि...

Prahaar: The Final Attack - 1991

Image
धडकन, जरा रुक गयी है, कही जिंदगी बह रही है... काय सुंदर गाणं, आणि जबरदस्त सिनेमा! पाहून नक्कीच डोळ्यातून पाणी आणणारा.. पीटर डिसोझा आणि मेजर चौहान! ह्या दोघांमधलं चित्रपटाच्या मध्यंतरा आधीचं नातं, गुरु-शिष्य, तणावाच्या प्रसंगातही हसवायला लावणारे ट्रेनिंग, त्यात काही न विसरण्या सारखे संभाषण... डूब भाई डूब, मध्येच प्रत्यक्ष अँटी-टेररिस्ट ऑपेरेशन मुळे पाय गमावणारा पीटर, आणि तेव्हाचा तो 'स्लो-मो' सीन! केवळ कमाल, मध्यंतरानंतचा मेजर चौहान... हतबल डिसोजा कुटुंब, स्थानिक गुंडांनी केलेला छळ, हे सर्व पाहून मूठ आवळली जाते नकळत! मला हे माहीत नव्हतं की खुद्द नाना पाटेकरने दिग्दर्शित केला आहे, हे कळल्यावर अजून एकदा पहावासा वाटतोय 'प्रहार' ... Prahaar: The Final Attack - 1991 #सशुश्रीके      धडकन, जरा रुक गयी है, कही जिंदगी बह रही है पलकों में यादों की डोली, भीतर खुशी हंस रही है ये खुशी तुम हो, तुम ही तुम मेरी जानम करू ऐतबार चेहरों के मेले में, चेहरे थे गुम एक चेहरा था मैं, एक चेहरा थे तुम जाने क्या, तुम ने दे दिया मुझ को जहां मिल गया होठों पर बा...

तो हरवलाय...

जाड भिंगाचा चश्मा, दोरीने डागडूजी करून गळ्यात अडकवलेला... पूर्ण पांढरे केस,२-३एमएम वाढलेली दाढी, ती पण पूर्ण पांढरी... मळलेला फूल बह्यांचा शर्ट, अखूड राखाडी प्यांट, समोरचे बहुतेक अर्धे दात गैरहजर, स्लीपर्स झीजून कागद झालेल्या, दुपारच्या भर उन्हात तो साठीतला जीव अजुन ही दिसतो, "भंगार बाटलेय, भंगार बाटलेय" १०-१२ वर्ष झाली असतील... तेव्हा पासून बघतोय,  त्या दोन-तीन च्या भर उन्हात  "भंगार बाटलेय, भंगार बाटलेय" आमच्या घरी मी वीकेंडलाच सापडायचो, तेव्हा दुपारची आवरावरी व्हायची महिन्या दोन महिन्यातून,  मी आमच्या इथे येणाऱ्या चार पाच भंगारवाल्यांपैकी ह्या भंगारवाल्याचा आवाज नीट ओळखायचयो,  थांबवायचो... नको ते सामन बाजूला ठेवत,  आणि पाहिजे त्या सामानाचं वजन करत.. "२० रुपये होतात सह्येब..." तेवढ्यात आई यायची...  मग २० चे २५ व्हायचे. नंतर मी दुबइत गेलो,  आता वर्षातून एक-दोनदाच जमतं, पण तेव्हाही हा भंगारवाला दिसतोच! ३-४ वर्षांपूर्वी त्यानी आइला एक पत्र दिलेले, आइला सांगितलं की मी आलो की मला हे द...पेपर मध्ये पब्लिश करायला सांगा,  (त्यानी मला ८ वर्षांपुर्वी वि...