तो हरवलाय...

जाड भिंगाचा चश्मा, दोरीने डागडूजी करून गळ्यात अडकवलेला... पूर्ण पांढरे केस,२-३एमएम वाढलेली दाढी, ती पण पूर्ण पांढरी... मळलेला फूल बह्यांचा शर्ट, अखूड राखाडी प्यांट, समोरचे बहुतेक अर्धे दात गैरहजर, स्लीपर्स झीजून कागद झालेल्या, दुपारच्या भर उन्हात तो साठीतला जीव अजुन ही दिसतो, "भंगार बाटलेय, भंगार बाटलेय"

१०-१२ वर्ष झाली असतील... तेव्हा पासून बघतोय,  त्या दोन-तीन च्या भर उन्हात  "भंगार बाटलेय, भंगार बाटलेय"

आमच्या घरी मी वीकेंडलाच सापडायचो, तेव्हा दुपारची आवरावरी व्हायची महिन्या दोन महिन्यातून,  मी आमच्या इथे येणाऱ्या चार पाच भंगारवाल्यांपैकी ह्या भंगारवाल्याचा आवाज नीट ओळखायचयो,  थांबवायचो...

नको ते सामन बाजूला ठेवत,  आणि पाहिजे त्या सामानाचं वजन करत.. "२० रुपये होतात सह्येब..." तेवढ्यात आई यायची...  मग २० चे २५ व्हायचे.

नंतर मी दुबइत गेलो,  आता वर्षातून एक-दोनदाच जमतं, पण तेव्हाही हा भंगारवाला दिसतोच!

३-४ वर्षांपूर्वी त्यानी आइला एक पत्र दिलेले, आइला सांगितलं की मी आलो की मला हे द...पेपर मध्ये पब्लिश करायला सांगा,  (त्यानी मला ८ वर्षांपुर्वी विचारलेले की कुठे काम करता!?  तेव्हा मी सकाळ पेपर्स मध्ये होतो) आणि आईने मला आठवणीने दिले ही...  काहीतरी सामजिक संदेश वगैरे होता...  मी तेव्हा सकाळ मधे काम करत नसलो तरी ओळखीचे होते काही, विचार केला की देऊ त्यांना, तो कागद इथे दुबइत आला, आता कुठाय काय माहीत...  हरावलाय नक्कीच!

खंत आहे...  गेले ३-४ वर्ष खंत आहे ह्या गोष्टीची. मागच्याच आठवड्यात गेलेलो पुण्यात, मात्र तेव्हा नाही झाली भेट... आठवडाभरच गेलेलो म्हणा! असो...

तो हरवलाय... म्हणजे i hope की फक्त हरवलाय :(

#सशुश्रीके |  ९ डीसेंबर २०१४

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!