कहाण्या WW2 च्या

• नाझींनी केलेल्या लाखो लोकांच्या अत्याचारा पैकी ही एक बाई
सुदैवाने वाचलेली, तिचे अनुभव आणि तिच्या मुलांकडून आणि मग नातवंडांकडून तिच्या बद्दल झालेले कौतुक खरच पाहण्यासारखं आहे!

एके दिवशी आपल्या मुलाला तिने ही कहाणी सांगितली, 'मला सर्वात छान वाढदिवस भेट काय मिळाली असेल!?' मुलगा सांगत होता, काय असेल नेमकं... एखादा ड्रेस, अमुक तमुक. तर तिने हा किस्सा सांगितला...

ती होलोकोस्टच्या एका कैंपात असताना तिची एक मैत्रण दिवसभर गायब होती, त्यावेळी एखादं ओळखीचं असणं म्हणजे फारच दुर्मिळ, आई वडील बहिणी भाऊ सगळे वेगळे झालेले असायचे, असो... दिवसभर गायब असलेल्या आपल्या मैत्रिणीबद्दल तिला काळजी वाटू लागली, आणि त्यावेळी कुठलीही व्यक्ती अशी गायब होणे म्हणजे 'मरणे' असाच अर्थ असायचा, पण ६च्या आसपास ती मैत्रीण भेटली, म्हणाली 'आज लेबर कॅम्प मध्ये जास्त काम केलं, आणि एक जास्तीचा ब्रेड मिळवला, तुझा वाढदिवस होता ना, तुला ब्रेड द्यायचा होता मला...' अस म्हणत तिने ब्रेड हातात दिला माझ्या.

हे बघताना ऐकताना खड्डा पडला हो! लोकांना काय काय पाहावं करावं लागतं आयुष्यात, आपण खरच किती चांगलं जीवन जगत आहोत! 

प्रत्येक वस्तूची किंमत कमी जास्त असते, परिस्थिती किंमत ठरवते!

https://www.youtube.com/watch?v=AXlbU5ZENy0&sns=em

__________________________________________________________

• अजून एक मजेशीर (नसलेला) अनुभव... छळ छावणीत येणाऱ्या प्रत्येक माणसाचे कपडे काढायला लावायचे, आणि ते कपडे एका ठिकाणी गोळा करून जुन्या कैद्यांना एक काम द्यायचे, त्या कापड्यांमधल्या किमती वस्तू गोळा करायच्या आणि जमा करायच्या, हिरे, सोनं, घड्याळं, दागिने किलो किलो नी जमा व्हायचं आणि हो पैसे ही, पण काही उपयोग नाही, त्या सर्वांची किंमत शून्य होती, किंमत होती फक्त अंगावर असलेल्या कपड्यांना आणि दिवसातून एकदा मिळणाऱ्या माफक जेवणाला, असो...

त्या सर्व कापड्यांमधून सर्वात महत्वाची गोष्ट मिळायची त्या होत्या वेगवेगळ्या देशातील नोटा! नोटा मात्र कागदाच्या त्यामुळे त्यांचा मोठा फायदा व्हायचा.. काशासाठी तर *'टॉयलेट पेपर'* आम्ही विविध देशाच्या नोटांनी आमची गरज भागवली आहे!

हे सांगताना तिला हसू आलं, आणि माझा चेहरा मात्र 😧 _असा_ झाला.
__________________________________________________________


विश्व युद्ध बद्दल बडबड करताना पर्ल हार्बर चा विषय निघाला, मित्र (मो. आरम) म्हणाला ९११ जसं घडवून आणलं अमेरीकेनी तसच पर्ल हार्बरही.. त्यांना पाहवत नाही रे, त्यांचं एक वेगळं जग आहे.. भांडण झाली की त्यांना मध्यस्थी चा आव आणून नुसता धंदा करायचा असतो... क्सक्सक्स बनतात त्यांचे नागरिक आणि त्यांबरोबर तमाम जगाचेही! आणि अजून एक ... युद्धासाठी जर्मन लोकांना अमेरिकाच पुरवत होते फ्युअल ... असं का बरं ? आपल्या शत्रूलाच मदत करून आपल्याच सैनिकांवर गदा!
अमेरिकेसाठी जग ही खुली बाजारपेठ आहे, त्यांना धंदा करायचा असतो! आणि आपण सगळे गिर्हाईक.

https://libcom.org/library/allied-multinationals-supply-nazi-germany-world-war-2
__________________________________________________________

• एका अमेरिकन सैनिकाला युद्ध कैदी केले होते नाझींनी, अधिक माहिती मिळावी म्हणून नाझींनी काही विशेष लोकांना निवडले होते, त्या अमेरिकन सैनिकाला प्रश्न विचारला गेला, कुठे राहतोस अमेरिकेत... जर्मन असून अगदी स्पष्ट अमेरिकन इंग्लिश उच्चार... त्याचे हे स्पष्ट अमेरिकन इंग्लिश ऐकून अमेरिकन सैनिक आश्चर्यचकित झाला

अमेरिकन सैनिकाने सांगितले - उत्तर-पूर्व अमेरिकेत. नाझी ने अजून खोलात विचारले - उत्तर-पूर्व अमेरिकेत कुठे... प्रश्नावर प्रश्न... आणि ही विचारपूस अगदी त्याच्या गावापर्यंत जिथे तो राहतो तिथपर्यंत गेली... आणि त्या गावाचे वैशिष्ठय काय वगैरेची माहिती ही त्या नाझी माणसाला होती! हे सर्व चालले असताना प्रश्न जसे वाढत होते तसे आश्चर्याने अमेरिकन सैनिकाचे रक्त जणू गोठत चाललेले!

सांगण्याचं तात्पर्य - हिट्लरची दूरदृष्टी कसली अफाट होती!.. *अशी ही वेळ येईल जेव्हा मी अमेरिकेवर पण राज्य करीन!*
महत्वाकांक्षा - दूरदृष्टी, अचूक, वेगवान... पण फारच क्रूर... त्यासारखा माणसाचा जन्म परत होऊ नये!

(Ref. THE WAR Documentary 5th EP) http://www.imdb.com/title/tt0996994/

__________________________________________________________

• स्टेलीनग्राडच्या लढाईतला एक किस्सा

९०० दिवस चाललेल्या ह्या लढाईत जर्मनीने सुरुवातीला मस्तच आगेकूच केली, पण विसरले की रशिया किती मोठा देश आहे, आणि स्टालीन पण हिटलर इतकाच क्रूर आहे! कल्पना करवणार नाही इतकं 'डिसिप्लिन' रेड अर्मिवर थोपलं गेलेलं...

काय झालं, एका सैनिकाची तातडीने गरज होती त्यामुळे ऑर्डर घेऊन रेड आर्मी ऑफिसर आला एका बंकर मध्ये, तिथे युद्धातून नुकताच परतलेला एक सैनिक होता... ऑर्डर्स ऐकताच त्याने स्पष्ट नकार दिला, म्हणाला "मी नाही येणार, मी आत्ताच आलोय, मी कपडे पण नाही चढवलेत... मी प्रमाणापेक्षा जास्त थकलोय!" ऑफिसर म्हणाला "तुला म्हणायचंय काय, नाही म्हणजे काय?? गपचूप कपडे घाल आणि चल माझ्या बरोबर"

हे संभाषण असच २मिनिटे चाललं असेल... ऑफिसर ने त्याने 'सुविनीयर' म्हणून ठेवलेल्या जर्मन बंदुकीने ने सैनिकाच्या डोक्यावरून एक गोळी झाडली, परत तोच प्रश्न आणि परत तेच उत्तर... लढाईच्या वेळी न पाळणाऱ्या सैनिक विरुद्ध जे होतं तीच झालं...

सैनिक ऐकत नाही कळल्यावर ऑफिसर ह्यावेळी मात्र सैनिकाच्या थेट डोक्यात गोळी घातली. आणि त्याच बंकर मधल्या एका सैनिकाला त्याला खड्डा खणून मेलेल्या सैनिकाला पुरण्याचे आदेश दिले!

युद्ध वाईट, आणि त्यात हिटलर आणि स्टालीन सारखे 'डिक्टेटर' म्हणजे महा भयंकर!




#सशुश्रीके 

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!