Posts

Showing posts with the label मराठी

अनोळखी ओळख

खुप वर्षे झाली आज लिहीन नंतर लिहीन असं म्हणता म्हणता आज योग आला लिहायचा हे... अनोळखी ओळख बोरिवलीच्या 'श्री गणेश' बिल्डिंग मधला तळ मजला, बंद घर... काचा फुटलेल्या, त्या घरा समोर खेळायचो आम्ही मुलं, चेंडू जायचा आत एका घरात, कित्येकदा तो गेलेला चेंडू मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न, ते प्रयत्न करत करत आत डोकावायचो... पूर्वी दरवाज्याच्या वर एक आडवी खिडकी असायची त्यातून की कुठून तरी आठवत नाही पण आत शिरलेलो, प्रचंड धूळ जळमटे वगैरेंनी श्रीमंत झालेलं ते घर!  मालक आर्किटेक्ट किंवा तसल्याच काही क्षेत्रात असावा. सुबक टुंबदार (फोम बोर्ड / थर्माकोलचे) बंगले आठवतात! आजूबाजूला छान छोटी छोटी झाडे, पार्किंग मध्ये गाडी...  आणि चेंडू हातात... बाहेर मित्र वाट बघतायत न मी त्या छोट्या बंगल्यांकडे बघत बसायचो. कोणालाही सांगितलं नाही की मी काय पाहायचो आत, आत चेंडू जायची वाट बघायचो! गेला की मी जाणार आत हे ठरलेलं. नंतर कळलं की मालक अमेरिकेत वगैरे असतो, फ्लॅट आहे पडूनच. नंतर आम्ही मुंबई सोडलं, आता ह्या गोष्टीला २९/३० वर्ष होतील. ते घर आहे तसेच राहीलं आहे मनात, ती धूळ बंगल्यावरची... काय कडक फिनिश! तो जो काय मा...

पांघरूण

भयंकर झोप येत असते, हा देह त्या पलंगावर स्वतः ला खिंडीत ढकलून दिल्या सारखा कोसळतो... आणि महा भयंकर कंटाळा येतो ते पांघरूण घ्यायला... नीट घडी करून पायाखाली असलेले! कोण देणार का ते पांघरूण अंगावर...  आता झोप आणि माझ्यात कटुता निर्माण व्हायला सुरुवात ते पाय मध्यस्थी करू पाहतात, पण ते हात थोडीच आहेत, हातांचा न्यूनगंड न मनाचा आळशीपणा तसाच! पाय मात्र लढा देणे सोडत नाहीत, अर्धी खिंड जिंकली... घुडघ्यापर्यंत पांघरूण येतं!  १० मिनिटांच्या ह्या ओढाताणीत झोपेचा खून होतो... पुढचे १/२ तास पांघरूण अंगावर असून ही निद्रा नाराज महोत्सव चालू असतो! शेवटी नकळत कधीतरी निद्रा देवता प्रसन्न होते!  सकाळी जाग येते तेव्हा पुन्हा त्याच पांघरुणाचे ऋण पलंगाखाली धारातीर्थी झालेले असते! ह्या पांघरुणाला कोणीतरी अक्कल द्या रे... तंत्रज्ञान इतकं पुढं गेलं, पण ह्या विषयात कोणी काहीच केलं नाही अजून ही!  निषेध निषेध निषेध समस्त झोपमोडी संघटना सदस्य #सशुश्रीके ह्यांच्याकडून बेअक्कल पांघरूण समाजाचा त्रिवार निषेध

खेळ आठवणींचा!

आठवणी नेहमी मागे असतात  मी नेमका उलटा, आठवणींच्या मागे मी असतो    एखाद्या प्रसंगी कुणाची ना कुणाची आठवण येतेच म्हणजे आता नसलेली व्यक्ती,  आजी आजोबा बाबा काही जुने मित्र  मग ते सल्ले ही देतात  'रिऍक्ट'ही होतात  आठवणींत असलेलले हावभाव, त्यांचे संवाद  तो साऊंडबोर्ड वाजतो तडीक जाम मजा वाटते! उदाहणार्थ... मॅच चालू असेल शेवटच्या टप्प्यातली  काही कमी बॉल्स मध्ये अशक्य वाटणारी धावसंख्या असेल  तर नेहमी बाबांची आठवण येते,  ते अगदी शेवटच्या बॉल पर्यंत आशा ठेऊन असायचे.  असे अनेक परत परत घडणारे प्रसंग येतात आयुष्यात  त्या त्या क्षणी तो तो माणूस येऊन डोकवून जातो  #सशुश्रीके