खेळ आठवणींचा!

आठवणी नेहमी मागे असतात 
मी नेमका उलटा, आठवणींच्या मागे मी असतो 
 

एखाद्या प्रसंगी कुणाची ना कुणाची आठवण येतेच
म्हणजे आता नसलेली व्यक्ती, 
आजी आजोबा बाबा काही जुने मित्र 

मग ते सल्ले ही देतात 
'रिऍक्ट'ही होतात 
आठवणींत असलेलले हावभाव, त्यांचे संवाद 
तो साऊंडबोर्ड वाजतो तडीक

जाम मजा वाटते!
उदाहणार्थ...
मॅच चालू असेल शेवटच्या टप्प्यातली 
काही कमी बॉल्स मध्ये अशक्य वाटणारी धावसंख्या असेल 
तर नेहमी बाबांची आठवण येते, 
ते अगदी शेवटच्या बॉल पर्यंत आशा ठेऊन असायचे. 

असे अनेक परत परत घडणारे प्रसंग येतात आयुष्यात 
त्या त्या क्षणी तो तो माणूस येऊन डोकवून जातो 

#सशुश्रीके 


Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!